Top Post Ad

त्याचप्रमाणे आज बाळ जांभेकर यांना महत्व देण्याचा उद्देश

भारत जो इंग्रजाणी एकत्र केला आणि नकाशा बनवला. 29 जानेवारी 1780 साली भारतात पहिले वृत्तपत्र इंग्रजीत कलकत्ता येथे जेम्स ऑगस्टस हिक्की या महान व्यक्तीने प्रकाशित केले. इस्ट इंडिया कंपनीच्या गैरव्यवहाराना वाचा फोडण्यासाठी हे वर्तमानपत्र काम करीत होते.  

त्यानंतर खालील ठिकाणी वृत्तपत्र सुरु झाले.
मद्रास... 1785 / मुंबई... 1789 / बंगाल... 1816 बंगालीभाषा  /  बंगाल... 1822 फार्शी भाषा-राजाराम मोहन रॉय
बंगाल...... 23 मे 1818 समाचार दर्पण /  युपी........ 15नोव्हें 1858  सोमप्रकाश / बंगाल....... 1868 तत्वबोधी अमृत बाजार , 1923 फॉरवर्ड,  1946 स्वाधीता 

मुंबईत सुरु झालेले..
सत्यवादि........ 1851 / सत्याग्रह....... 1919 / हरीजन........ 1933 / यंग इंडिया..    1919  इंग्रजीगुजराती

पत्रकार मित्रानो भारतात वृत्तपत्र सुरु झाल्यानंतर 52 वर्षा नंतर 6जानेवारी 1832 बाळ जांभेकर यांनी दर्पण सुरु केले होते. आणि यात काही मोठी कामगिरी आहे असे मला वाटत नाही. कारण 52 वर्षात भारतात बराच बदल झालेला होता. पोस्ट, तार, प्रिंटिंग यात प्रगती झालेली होती. बाळ जांभेकर हे बामण उच्च वर्गातले, पारंपरिक शिक्षणात वर्चस्व असलेला समाज. जो समाज मुस्लिम राजे, इंग्रजांचा सरकारी कारभार पाहणारा मुनीमजी. आपले उदरनिर्वाचे साधन सांभाळून यांनी वर्तमानपत्र काढले. केवळ प्रसिद्धीकरिता. दर्पणकाराने कधीही इंग्रजांना विरोध केला का? सामाजिक सुधारणा करणारे विषय मांडले का? बहुजनांनचे अन्यायाचे प्रश्नावर वाचा फोडली का तर उत्तर मायनस येते. 

ज्याप्रमाणे डॉ. आनंदीबाई पूर्वी  रखमाबाई राऊत या माळी समाजातील डॉक्टर झाल्या आणि रुग्णांची सेवाही केली. शिक्षणासाठी नवऱ्याला सोडले. घटस्फोट घेतला पण आज नाव कोणाचे घेतले जाते कोणाला प्रसिद्धी दिल्या जाते . बामनेतर पत्रकारिता सुरु होते "दीनबंधू " पासून कृष्णराव भालेकर 1जानेवारी 1877पासून. "दिनमित्र "गणपतराव पाटील 1888, "तरुण मराठा "शाहू महाराज यांनी प्रेरणा देऊन दिनकरराव जवळकर,  "कैवारी "1928 दि. जवळकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर : मुकनायक 31 जानेवारी 1920, बहिषकृत भारत 1927, जनता  1930, प्रबुद्ध भारत 1956 या पत्रकारितेमुळे समाज घुसळून निघाला.अन्यायाला वाचा फुटली.क्रांती सुरु झाली. म्हणून आम्ही म्हणतो बाळ जांभेकरानचा "दर्पण "  पत्रकार दिन हा होऊ शकत नाही.विचार करा.
 जे पत्रकार बाळ जांभेकर यांचा पत्रकार दिन साजरा करतात,  त्यांना पत्रकार कोणी बनवले व आज ते पत्रकार कोणा मुळे आहेत हेच त्यांना कळत नाही. ज्यांना लिहायला, वाचायला बंदी होती. शस्त्र,  शास्त्र, संपत्ती याची बंदी होती याची माहिती या डोक्यात मेंदू नसलेल्या पत्रकारांना नाही असे वाटते. इंग्रज या देशात आले नसते तर या जांभेकर यांनी तरी पेपर काढला असता का?  आणि फुले, शाहू, बाबासाहेब नसते तर तुम्ही पत्रकार झाले असते का?  आपली बुद्धी तपासून घ्या. लग्नातून पळालेले गोसावीला शिवरायांच्या गुरुस्थानी अर्थात डोक्यावर आणून बसवले. त्याचप्रमाणे आज बाळ जांभेकर यांना महत्व देण्याचा उद्देश

बाबा रामटेके   [12:32 PM, 1/6/2021]

-------------------------------------------------

त्यांनी स्त्री वेशात भूमिका केली तर ते #बालगंधर्व असतात, बहुजनांच्यापैकी कुणी तशी भूमिका केली तर तो #नाच्या असतो. संडासच्या खिडकीतून उडी मारुन 15 फुटावरच्या किनाऱ्यावर पोहत जाऊन पकडला गेलेला आणि 8 वेळा माफी मागणारा त्यांचा तो #स्वातंत्र्यवीर असतो ,आणि डोळे काढले, चामडी सोलली तरी औरंगजेबाच्या फितुर सरदारांची नावे न सांगणारे #संभाजीराजे, त्यांच्यामते बदफैली व व्यसनाधीन असतात.   सिनेमाच्या पडद्यावर अंगप्रदर्शन करत चोचीत चोच घातलेले सिन देणाऱ्या त्यांच्या नट्या त्या #सिनेतारका असतात, तर चापुनचोपुन नऊवारी नेसुन अभिनयाची नजाकत पेश करणाऱ्या तमाशातील बहूजन स्त्रीया ह्या #कलावंतीण असतात. त्यांनी लग्नाआधी एकत्र राहिले तर ते #लिव्हइनरिलेशनशिप असते, आणि हेच जर बहुजन करत असतील तर यालाच #बाई_ठेवणे बोलतात. ते करतात ते #उदात्त_प्रेम असते आणि तुम्ही आम्ही करतो ते #लफडे असते.  

#भावार्थ :- सामाजिक मान्यतेच्या कसोट्या ठरवण्यासाठी वापरले जाणारे मापदंड आपले नाहीत. ते मापदंड आपण ठरवत नाही तोवर कुणीही माफीवीर इथे स्वातंत्र्यवीर ठरवला जाईल. 
    अंदमानात काळ्यापाण्याची शिक्षा भोगलेले 114 मराठी कैदी होते हे सगळे तिथेच मेले, पण ब्रिटीशांना शरण गेले नाहीत. ते खरे स्वातंत्र्यवीर...
#टीप:- स्वातंत्र्यवीर हा आपल्यासाठी नॉन इश्यू आहे. फक्त फरक लक्षात आणून देण्यासाठी हा लेख प्रपंच.
:- सौ.स्वाती अशोकराव बनकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com