ठाणे पालिकेच्या निरर्थक प्रकल्पांना "मुंबई रेल प्रवासी संघ"चा विरोध

मुंबई
मुंबई रेल प्रवासी संघ गेले 22 वर्षे मुंबई च्या प्रवाश्यांचे प्रश्न प्रशासन आणि सरकार कडे आक्रमक पणे मांडत आली आहे . मुंबई उपनगरीय रेल्वे प्रवासी वाहतूक ही जगातील सगळ्यात जास्त प्रवासी संख्या असलेली तसेच अत्यंत कमी क्षेत्रफळात अतिशय जास्त प्रवासी घनता असल्यामुळे रेल्वेच्या कुठल्याही छोट्या निर्णयाचा लाखो प्रवाश्यांवर लगेच ताण येतो.ठाणे महानगर पालिका ही केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी योजनेत असल्यामुळे एक मोठी विकासाची संधी ठाण्यातील नागरिकांना होती. परंतु फक्त बिल्डर आणि राजकीय दबावाखाली , कुठलाही अभ्यास न करता ह्या पालिकेतील अधिकारी अत्यंत निरर्धक प्रकल्प टॅक्स पेयर्सच्या माथ्यावर मारण्याचा सतत प्रयत्न करत आहे. 

नवीन ठाणे स्टेशन कोणासाठी?
ठाण्यात सध्या सगळ्यात जास्त प्रवासी प्रवास करतात ही वस्तुस्थिती आहे परंतु कळवा ऐरोली लिंक झाल्यावर ट्रान्स हार्बर सेवा ठाण्या ऐवजी कळव्यातून चालू होईल आणि येथील गर्दी 35%नि कमी होईल. असे असताना "कळवा ऐरोली लिंक"साठी रेल्वेला सहकार्य करण्या ऐवजी पालिकेला अत्यंत महत्वाच्या "मनोरुग्णालयाचा" जागेवर डोळा ठेऊन "नवीन ठाणे स्टेशन"ची मागणी रेटवून धरली आहे. ह्यामुळे मध्य रेल्वे तील प्रवास्यांवर अतिरिक्त ताण येण्याची शक्यता आहे तसेच पूर्व द्रुतगती मार्ग सुद्धा ट्रॅफिक वाढू शकते. MRPS ने ह्या अत्यांत चुकीच्या प्रकल्पा विरोधात तक्रार नोंदवली आहे.

ठाणे अंतर्गत मेट्रो?
केंद्र शासना कडून स्मार्ट सिटी च्या माध्यमातून अनेक कोटींचा फंड येणार आहे त्याचा विनियोग ठाण्यातील ट्रॅफिक, अपघात कमी करण्यासाठी वापरायच्या ऐवजी पालिका बिल्डरांच्या दबावाखाली त्यांच्या प्रकल्पाना विक्रीसाठी मदत मिळावी म्हणून गरज नसलेल्या जागेवर "ठाणे अंतर्गत मेट्रो" प्रकल्प आणत होती. गेले अनेक वर्षे भौगोलिक मध्य बिंदू असू ही कळवा, मुंब्रा हे दुर्लक्षित राहिले आहेत तिकडे विकास करायच्या ऐवजी पालिका बिल्डर हित जपत आहे.

अश्या "निरर्धक"  प्रकल्पाची मुंबई रेल प्रवासी संघाने तक्रार केल्यानंतर केंद्र सरकारने हा प्रकल्प गुंडाळला तरी सुद्धा पालिकेला चाप बसलेला नाही. त्यांनी पुन्हा एकदा "लाईट वेट मेट्रोचा" प्रकल्प पुन्हा महत्वाच्या कळवा मुंब्रा ह्या भागाला दुर्लक्षित करत आहे. MRPS ने त्या ऐवजी "पुर्व द्रुतगती मार्ग", नाशिक रोड, जुना आग्रा रोड, ठाणे बेलापूर रोड व्हाया कळवा पूर्व स्टेशन, माजीवडा, भिवंडी बायपास ह्या महत्वाच्या भागांना जोडणारा मार्ग सुचवला आहे. अशी माहिती मुंबई रेल प्रवासी संघाचे सिद्धेश देसाई यांनी दिली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 🙏दैनिक प्रजासत्ताक जनता नियमित वाचनासाठी

for latest updates...

Follow this link to join our WhatsApp group:

https://chat.whatsapp.com/Cf2s55RAfdQ0yVYSelRURA