ठाणे
आपत्कालीन परिस्थितीचा मुकाबला करण्यासाठी करार पध्दतीने ठोक एकत्रित मानधनावर घेतलेल्या कामगारांना ठाणे महापालिकेने कामावरुन कमी केले आहे. त्यांना पुन्हा त्वरीत कामावर घेण्याचे आदेश देण्याबाबत महाराष्ट्र काँग्रेस कमिटी ओबीसी विभागाचे उपाध्यक्ष सुरेश पाटीलखेडे यांनी ठाणे महानगर पालिकेला पत्र दिले आहे. तसेच विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांची भेट घेऊन त्यांनाही याबाबत निवेदन दिले आहे.
आपल्या निवेदनात त्यांनी कोविड १९ मध्ये महाराष्ट्र शासनाचे अंतर्गत येत असलेल्या राज्यातील (स्थानिक स्वराज्य संस्था) मध्ये ठाणे महानगरपालिका आरोग्य विभागा मार्फत होणाऱ्या रिक्तपदाची (एकुण रिक्त प्रकार ५३) भरती करताना कोविड १९ साठी संकट काळात व आणिबाणीच्या परिस्थितीत स्वत:चा आणि कुटूंबियांचा जीव धोक्यात घालुन जनतेची सेवा आजपर्यंत करीत होते. त्या कोविड १९ महायोद्धांना कार्यरत असलेल्या पदावरच प्राधान्य क्रमाने कायमस्वरुपी नियुक्ती देऊन ठाणे महानगरपालिका आरोग्य विभागात सामावून घेण्यात यावे. ठामपा/मुख्य-१/आवि/३०/२३३८, दिनांक ३१ डिसेंबर २०२० आदेशान्वये कोविड १९ जागतिक महामारीच्या संकट काळात स्वतः आणि कुटूंबियांचा जिव धोक्यात घालुन ठाणे महानगरपालिका आरोग्य विभागात जनतेची सेवा केलेल्या कोविड योद्धांना (कर्मचारी), वॉर्डबॉय, परिचारिका, आया, सफाई कामगार यांना ठोक मानधन तत्त्वावर (उद्रेक व सदृश्य) व आपत्कालीन परिस्थितीचा मुकाबला करण्यासाठी करार पध्दतीने ठोक एकत्रित मानधनावर घेतलेल्या कामगारांना कामावरुन कमी करण्यात आलेल्यांना पुन्हा त्वरीत कामावर घ्यावे तसेच आज रोजी कार्यरत असलेले ठेकेदारी कमी करुन कार्यरत असलेल्या कामगारांना कामावरुन कमी न करता व कमी केलेल्या कामगारांना त्वरित कामावर घेण्यात यावे अशी विनंती आयुक्तांना केली आहे.
0 टिप्पण्या