Top Post Ad

भारतीय संविधानाची मूल्यव्यवस्था व प्रत्यक्ष उपयोगिता विषयावर सम्बोधि अॅकेडमीचे जनजागृती अभियान


 संबोधी IAS Academy , मुंबई-ठाणे (मंगेश ज्ञानेश्वर बोरकर ,संचालक)  यांच्या वतीने 26 नोव्हेंबर ते 5 डिसेंबर 2020 दररोज रात्री 9 ते 10.30 वाजता झूम अँप्लिकेशनवर " भारतीय संविधानाची मूल्यव्यवस्था व प्रत्यक्ष उपयोगिता" या विषयाला केंद्रस्थानी ठेऊन विविध विषयांवर  12 व्याखाने Online आयोजित करण्यात आली होती . 

      पहिल्याच दिवशी मा. कालीचरण खरतडे सर (IAS ,तेलंगणा) यांनी संविधानाच्या उद्देशिकेचा नागरिकांच्या कल्याणासाठीचा व्यावहारिक अर्थ समजावून सांगितला . पुढील प्रत्येक दिवशी  मा. मंगेश बोरकर सर यांनी मूलभूत अधिकार, प्रा.चित्रा लेले (SNDT महाविद्यालय, चर्चगेट,मुंबई) यांनी "महिला सक्षमीकरण', मा. नागपाल लोहकरे (उप संचालक, APEDA,हैदराबाद) यांनी "कृषीक्षेत्र व विकास योजना" , मा.सुभाष कांबळे (अधिकारी, कर्नाटक) यांनी "आरोग्य योजना व सध्यस्थिती" , मा. डॉ. हेमंत तिरपुडे (PF आयुक्त, सोलापूर) यांनी "आरक्षण धोरण " तसेच "कामगार कायदे"या दोन विषयावर अतिशय उपयुक्त मार्गदर्शन केले .

        पुढे मा. उमेश सोनवणे (उपआयुक्त, सामाजिक न्याय, मुंबई) यांनी 'सामाजिक न्याय" विषयावर, मा. किर्तीवर्धन किरतकुडवे(उपशिक्षणाधिकारी, मनपा, मुंबई) व निसार खान (प्रशासकीय अधिकारी, मनपा) यांनी "शिक्षणाचा अधिकार " विषयावर, मा. धनंजय वंजारी(सहआयुक्त, आयकर, नागपूर) यांनी "उद्योग शक्ती,राजनैतिक लोकशाही व आर्थिक न्याय" या विषयावर मार्गदर्शन केले .

     शेवटच्या दिवशी 5 डिसेंबर रोजी मा. Dr. किशोर मानकर सर (भारतीय वनसेवा, नागपूर) यांनी "मूलभूत कर्तव्य तसेच पर्यावरण संरक्षण" आणि मा. मंचक इप्पर (IPS, DCP, Zone -1,पिंपरी-चिंचवड) यांनी "कायदा व सुव्यवस्था" या विषयावर व्याखान दिले . 

      संपूर्ण देशातून एकत्र आलेल्या सहभागी मान्यवरांच्या तसेच संबोधी IAS Academyमध्ये UPSC (IAS/IPS) / MPSC स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थीची सुद्धा प्रतिक्रिया  शेवटी घेण्यात आल्या. 

      सदर व्याखाने हिंदी भाषेतून ठेवलेली होती त्यामुळे उतरांखंड, उत्तरप्रदेश, मध्य प्रदेश, तेलंगाणा, कर्नाटक, गुजरात व बहुतांश महाराष्ट्राच्या सर्वच जिल्ह्यातील विद्यार्थी तसेच विविध क्षेत्रातील भारतीय नागरिक  दहाही दिवसांसाठी उपस्थित होते . एकूण 500 ते 600 लोकांनी या दहा दिवसांत उपस्थिती नोंदविली .  सदर संविधानमिशन गतिमान करण्यासाठी या मिशन मध्ये सामील होण्याचे आवाहन तसेच विविध स्पर्धा परीक्षांच्या परिपूर्ण तयारीसाठी संबोधी करीअर अकॅडमीच्या You Tube channelला Subscribe करण्याचे व संबोधीच्या online उपक्रमांचा फायदा घेण्याचे आवाहन आयोजकांनी केले .


 मंगेश ज्ञानेश्वर बोरकर- संचालक
संबोधी IAS Academy, Mumbai- Thane
Whatsapp :- 8108016455 / 8097076670

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com