Top Post Ad

हत्येतील प्रमूख आरोपींवर तात्काळ अॅट्रासिटी गुन्हा दाखल करण्यासाठी जाती अंत संघर्ष समितीचा मोर्चा

 मुंबई- 
सांताक्रूझ पूर्व हनुमान टेकडी येथे राहण्राया 21 वर्षाच्या आकाश जाधव या दलित समाजातील तरुणाचा याचा खून झाला.  मात्र 10 दिवस उलटून गेले तरी जाधव हत्येतील प्रमूख आरोपींना अटक झाली नाही आणि  अॅट्रासिटी गुन्हा दाखल झाला नाही. 21 वर्षाच्या आकाश जाधव या  तरुणाला त्याच वस्तीतील नकुल इंगावले, रोहित चव्हाण, कुणाल इंगावले, भीम, हर्षल शिर्के, पांड्या, बाभई या मुलांनी किरकोळ बाचाबाचीवरुन  2 नोव्हेंबर रोजी पहाटे दिड वाजता बेदम मारहाण केली. त्यावेळी आकाश बेशुद्ध पडला, नाकातोंडातून, डोळ्यातून रक्त आले. नंतर त्याला महापालिकेच्या कुपर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. जवळपास 17 नोव्हेंबर पर्यंत तो अॅडमिट होता. नंतर प्रकृती बिघडल्याने त्याला सायन रुग्णालयात हलविण्यात आले व तेथे ऑपरेशनही करण्यात आले. तोपर्यंत वाकोला पोलिसांनी कुटुंबियांनी सांगूनही बेदम मारहाणीचा गुन्हाही दाखल केला नव्हता. 
सामाजिक दबावानंतर 22 नोव्हेंबरला गुन्हा दाखल केला व आरोपींना किरकोळ कलमांखाली नावाला अटक करुन जामिनावर सुटका केली. ज्या दिवशी मारहाणीची घटना घडली त्या दिवशी आरोपींनी आकाशच्या कुटूंबियांनाही धमकावले, जातीवाचक शिवीगाळ केली, बहिणीशी धक्काबुक्की केली, दारावर लाथा मारल्या. तसेच सार्वजनिक नळावरील पाणी घेण्यासही मनाई केली. हा सारा अन्याय कुटुंबियांनी आरोपीं विरोधात तक्रार करताना सांगण्याचा प्रयत्न केला असताना, पोलिसांनी वरील गंभीर बाबींची नोंद एफ.आय.आर.मधे घेतली नाही व आरोपींना वाचवायचेच काम केले. असल्याचा आरोप कुटुंबियांनी केला आहे.  आकाशला केलेली मारहाण एवढी जबर होती की अखेर दि.4 डिसेंबरला पहाटे त्याचा मृत्यू झाला.पण मृत्यू नंतरही पोलिस आरोपींना अटक न करता त्यांना वाचवायचेच काम करीत आहेत. यामागे येथील लोकप्रतिनिधीचा हात असल्याचा संशय जाधव कुटुंबियांनी व्यक्त केला आहे. 
आकाशच्या मृत्यूनंतर पोलिसांनी तातडीने आरोपींवर 302 व अॅट्रासिटीचा गुन्हा दाखल करुन त्यांना अटक करणे आवश्यक होते. तसेच व्हिडिओ रेकॉर्डिंग करून पोस्टमार्टेम करायला हवे. परंतु पोलिसांनी वरील सर्व गोष्टी करण्यास राजकीय दबावामुळे टाळाटाळ केली.आणि कुटुंबियांवर दबाव आणून प्रकरण आपसांत मिटवा वाढवू नका असा दबाव आणायचा प्रयत्न केला असल्याचा आरोप येथील सामाजिक कार्यकर्त्यांनी केला. या घटनेनंतर स्थानिक लोकांमध्ये असंतोष पसरला परिणामी  येथील  तिनशे- चारशे कुटुंबांनी या घटनेचा निषेध करण्यासाठी पोलिस स्टेशनला धडक दिली. 
मोर्चाच्या शिष्टमंडळाशी बोलतांना परिमंडळ 8 चे पोलीस उपयुक्त मंजुनाथ शिंगे यांनी आरोपीना तात्काळ अटक केली जाईल आणि इतर योग्ये ती कारवाई करण्यात येईल. गुहेगारांना 302 कलमाखाली अटक करण्यात येईल तसेच पीडित कुटुंबाला सरक्षण देण्यात येईल तसेच इतर योग्य मागण्यांचा विचार केला जाईल असे आश्वासन दिले. तसेच रात्री उशिरा डि.सी.पी.ंनी आरोपींवर 302 चांगले गुन्हा दाखल करण्याचे लेखी पत्र दिले. पण अॅट्रासिटीचा गुन्हा मात्र नोंदविला नाही.  
परंतु 302 कलम लाऊनही अद्याप एकाही आरोपीला अद्याप अटक करण्यात आलेली नाही. आरोपी हे सत्ताधारी पक्षाशी संबंधित असल्यानेच पोलिस राजकीय दबावामुळे अटक करण्यास व अॅट्रासिटीचा गुन्हा नोंदविण्यास टाळाटाळ करीत आहेत असे मत जाती अंत संघर्ष समितीचे स्पष्ट केले आहे.  
स्थानिक पोलिसांच्या या वर्तनाविरोधात जाती अंत संघर्ष समितीने मुंबई पोलिस आयुक्त यांना  5 डिसेंबर रोजी लेखी तक्रार दिली आहे व त्या तक्रारींच्या प्रती, महाराष्ट्राचे गृहमंत्री, अनुसूचित जाती जमाती आयोग, नोडल ऑफिसर. अनुसूचित जाती जमाती, सामाजिक न्याय विभाग आदींना दिल्या आहेत. सदर प्रकरणी जे स्थानिक पोलिस अधिकारी आरोपींना वाचविण्यासाठी प्रयत्न करीत आहेत त्यांना तातडीने निलंबित करून त्यांच्यावरही अॅट्रासिटी अॅक्टच्या कलम 4 अन्वये गुन्हा दाखल करून सहआरोपी करावे अशी मागणी जाती अंत संघर्ष समितीचे राज्य निमंत्रक शैलेंद्र कांबळे व राज्य सदस्य सुबोध मोरे करीत आहेत. तसेच पीडित कुटुंबियांना शासनाने अॅट्रासिटी अॅक्टच्या तरतुदीनुसार तातडीने आर्थिक मदत देण्यात यावी. अशी मागणही  करीत आहोत.या संदर्भात तातडीने अटक न झाल्यास व अॅट्रासिटीचा गुन्हा दाखल न केल्यास या विरोधात जाती अंत संघर्ष समितीला तीव्र आंदोलन करेल असा इशारा दिला असल्याची माहीती  शैलेंद्र कांबळे, सुबोध मोरे यांनी दिली.  
  हत्येतील प्रमूख आरोपींना त्वरीत अटक व अॅट्रासिटी गुन्हा दाखल करण्यासाठी आणि पोलिसांनी असहकार विरोधात बौद्धाजन पंचायत समिती आणि जाती अंत संघर्ष समिती आणि विविध आंबेडकरी संघटनांच्या वतीने हा काढण्यात आला, असे कॉम्रेड सुबोध मोरे यांनी सांगितले. बौद्धाजन पंचायत समितीचे महासचिव लक्ष्मण भगत, गट प्रतिनिधी गणेश खैरे आणि जाती अंत संघर्ष समितीचे महाराष्ट्रचे  प्रमुख कॉम्रेड सुबोध मोरे, कॉम्रेड शैलेंद्र कांबळे यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला होता. सारनाथ बुध्दविहार , हनुमान टेकडी ते वाकोला पोलीस ठाणे असा आक्रमक मोर्चा काढण्यात आला.  या निषेध  मोर्चात मोठ्या संख्येने सामील झालेल्या महिलांनी खुन्यांना अटक करा, अट्रोसिटी गुन्हा दाखल करा. वाकोला पोलीस असहकार बदल जोरदार घोषणा दिल्या. यावेळी विविध आंबडेकर संघटना आणि पक्षांच्या नेत्यांनी मोर्चाला संबोधित केले.  
 संघटनांच्या शिष्ठमंडळात बौद्धाजन पंचायत  मितीचे महासचिव लक्ष्मण भगत, गट प्रतिनिधी गणेश खैरे आणि जाती अंत संघर्ष समितीचे महाराष्ट्रचे  प्रमुख कॉम्रेड सुबोध मोरे, कॉम्रेड शैलेंद्र कांबळे, रिपाईचे तालुका अध्यक्ष, रघुनाथ कांबळे, वंचित बहुजन बहुजन पक्षाच्या महिला नेत्या प्रमिला मर्चंडे, मृत आकाशची आई सुप्रिया जाधव, बहिण अक्षता जाधव, भागुराम  सकपाळ आदी सहभागी होते. मोर्च्यात मोठ्या संख्येने लोक सहभागी  झाले होते.  मृत आकाश जाधव  यांच्या खुन्यांना आरोपींना 302 कलमाखाली पोलीस अटक करावी,  अॅट्रासिटीचा गुन्हा दाखल करावा, पीडित  कुटुंबांना तात्काळ 50 लाख रुपयांची मदत करावी, त्यांना रोजगार द्यावा. तसेच अनेक न्यायिक मागण्या शिष्टमंडळने निवेदन मार्फत परिमंडळ 8 चे पोलीस उपयुक्त मंजुनाथ शिंगे यांच्याकडे केल्या आहेत.  शिंगे यांच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. आहे. मात्र इतके दिवस उलटूनही अद्याप कोणत्याही आरोपीला अटक करण्यात आलेली नाही. आरोपी मोकाट फिरत असून पुढे जाधव कुटुंबियांना धोका झाल्यास याला जबाबदार कोण असा प्रश्न येथील जनता विचारत आहे.  न्याय नाही मिळाला तर आनंदराज आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत मोठे आंदोलन केले असा इशारा  मोरे यांनी दिला आहे.  

टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com