ठाणे पोलीसांचे रक्तदान शिबीर संपन्न


 ठाणे
कोवीड - १९ या साथीच्या आजारामुळे महाराष्ट्रातील रूग्णालयांमध्ये उपचार घेत असलेल्या रूग्णांना रक्ताचा मोठया प्रमाणात तुटवडा जाणवत असल्याने महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी जनतेला मोठया प्रमाणात रक्तदान करण्याचे आवाहन केले आहे. या आवाहनास सकारात्मक प्रतिसाद देत व नागरीकांना रक्तदान करण्यासाठी प्रेरणा मिळावी म्हणून विवेक फणसळकर, पोलीस आयुक्त, ठाणे शहर यांचे संकल्पनेतुन ठाणे पोलीसांचे रक्तदान शिबीर सिध्दी हॉल येथे  सामान्य रूग्णालय, ठाणे जिल्हा,  छत्रपती शिवाजी रूग्णालय, कळवा व  ब्लडलाईन चॅरीटेबल ट्रस्ट यांचे सहकार्यातुन १६ डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आले होते. या रक्तदान शिबीराला एकनाथ शिंदे, पालक मंत्री, ठाणे जिल्हा तथा नगरविकास, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपकम) मंत्री, महाराष्ट्र राज्य यांनी भेट दिली व रक्तदाते यांचे मनोबल उंचावले. 

तसेच पोलीस दलाने कोवीड -१९ चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केलेल्या प्रशंसनीय कामगिरीनंतर  मुख्यमंत्री यांचे आवाहनाला प्रतिसाद देत पोलीसांनी आयोजित केलेले हे महाराष्ट्रातील प्रथम रक्तदान शिबीर असल्याने ठाणे पोलीसांचे कौतुक केले. या रक्तदान शिबीरासाठी  सुरेश कुमार मेकला, पोलीस सह आयुक्त, ठाणे शहर हे उपस्थित होते. या रक्तदान शिबीराचे नियोजन  प्रविण पवार, अपर पोलीस आयुक्त, प्रशासन, ठाणे शहर व गणेश गावडे, पोलीस उप आयुक्त, मुख्यालय-२, ठाणे शहर यांनी केले. या रक्तदान शिबीरामध्ये मोठया संख्येने पोलीस अधिकारी व अंमलदार तसेच महिला पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी रक्तदान करून सामाजिक बांधीलकीची जाणीव करून दिली. 

सदर रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यासाठी  सुभाष ढवळे, पोलीस निरीक्षक, मानवी संसाधन विभाग व  सुभाष माने, राखीव पोलीस निरीक्षक, मुख्यालय, ठाणे व पोलीस अंमलदार यांनी मोलाची कामगिरी बजावली. सामाजिक बांधीलकीची जाणीव जपत भविष्यात देखील ठाणे पोलीस आयुक्तालयाचे विविध पोलीस परिमंडळाचे स्तरावर रक्तदान शिबीरे घेण्याचा मानस मा. पोलीस आयुक्त, ठाणे शहर यांनी व्यक्त केला.  कोवीड - १९ या साथ रोगाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी ठाणे शहर पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी आपला जीव धोक्यात घालून अत्यंत मोलाची कामगिरी बजावली.   या आजाराचा ठाणे आयुक्तालयातील १८७७ पोलीस अधिकारी व अंमलदार यांना प्रादुर्भाव झाला. त्यातील एकुण ३२ पोलीस अधिकारी व अंमलदार यांना जीव गमवावा लागला. तर एकुण १८२३ पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी कोरोनावर मात केली. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 🙏दैनिक प्रजासत्ताक जनता नियमित वाचनासाठी

for latest updates...

Follow this link to join our WhatsApp group:

https://chat.whatsapp.com/Cf2s55RAfdQ0yVYSelRURA