मुंबई
देशात, शेतकऱ्यांच्या कायद्या विरोधात प्रचंड आंदोलन दिल्लीच्या सीमेवर सुरू आहे. हे आंदोलन राष्ट्रीय असून सर्व राज्यातील शेतकरी यात सहभागी होत आहेत व समर्थन देत आहेत. मंगळवार 22 डिसेंम्बर रोजी हजारो शेतकरी बांद्रा येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जमून बी के सी मधील रिलायन्स कार्यालयावर मोर्चाने जाणार आहेत. अंबानी व अदानी यांच्या सेवा व उत्पादने यांच्यावर बहिष्कार घाला असे आवाहन जनतेला करण्यात येत आहे.
हा मोर्चा मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाजवळून जाणार आहे. त्यामुळे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून, तसेच शिवसेना पक्षाचे पक्ष प्रमुख म्हणून व आपल्या घरावरूनच ते जिल्हाधिकारी कार्यालयावर जाणार आहेत त्यामुळे कलानगरच्या दरवाज्यावर शेतकऱ्यांचे स्वागत करावे व त्यांना शुभेच्छा द्याव्यात. हे आपल्या सरकारच्या धेारणाला अनुसरून हेाईल असे अशी विनंती अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समिती व जन आंदोलनांची संघर्ष समिती – महाराष्ट्र या राज्यातील तील दोन मुख्य समित्यांच्या वतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्राद्वारे करण्यात आली आहे. विधिमंडळात बोललात ते प्रत्यक्ष कृतीतून व्यक्त करावे, जेणेकरून शेतकऱ्यास नैतिक धैर्य व समर्थन मिळेल. अशा आशावादही पत्राद्वारे व्यक्त करण्यात आला आहे.
धुळे येथून हजारो शेतकरी दिल्ली आंदोलनास सहभागी होण्यासाठी जाणार आहेत त्यांना शुभेच्छा देण्यासाठी अनेक कार्यकर्ते राज्याच्या सिमे पर्यंत जाणार आहेत असे जन आंदोलनांच्या संघर्ष समिती तर्फे विश्वास उटगी यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात जाहीर केले आहे.
नवीन कृषी कायद्याविरोधात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाचा आज 25 वा दिवस आहे. शेतकऱ्यांनी रविवारी अपील केली की, 27 डिसेंबरला जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी रेडिओवर 'मन की बात' करतील, तेव्हा सर्वांनी आपल्या घरात थाळ्या वाजवाव्यात. भारतीय शेतकरी यूनियनचे जगजीत सिंग डल्लेवाला म्हणाले की, शेतकऱ्यांनी 25 ते 27 डिसेंबरपर्यंत हरियाणामध्ये सर्व टोल प्लाजा फ्री करण्याचा निर्णय घेतला आहे. तिकडे, यूपीच्या गाजीपूर बॉर्डरवर आंदोलन करत असलेल्या शेतकरी नेत्यांनी गाझियाबाद अॅडिमिनिस्ट्रेशनला 24 तासांचा अल्टीमेटम दिला आहे. त्यांनी आरोप लावला आहे की, राज्यातून येणाऱ्या शेतकऱ्यांचे ट्रॅक्टर-ट्रॉली जप्त करण्यात येत आहेत. जर हा प्रकार तात्काळ थांबवला नाही, तर हायवेची दुसरी लेनही बंद केली जाईल. कृषी कायद्यांचा विरोध करणारे शेतकरी आज शहीद दिवस पाळला. या दरम्यान आंदोलनस्थळी आणि संपूर्ण पंजाबमध्ये शहीद शेतकऱ्यांचा श्रद्धांजली वाहण्यात आली. अनेक विशेष कार्यक्रम घेतले. भारतीय किसान युनियनचे मुख्य सचिव राम त्यागी यांनी ही माहिती दिली.
0 टिप्पण्या