क्राईम रिपोर्टर वेल्फेअर असोसिएशन तर्फे अनाथालय व वृद्धाश्रमास मदतीचा हात

लोणावळा 
 क्राईम रिपोर्टर वेल्फेअर असोसिएशन व क्राईम बॉर्डर गेल्या अनेक वर्षापासून आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो या उक्तीप्रमाणे आणि चला पेटवू  या दिवे , ज्या ठिकाणी अजूनही अंधार आहे हे स्लोगन घेऊन सदर एनजीओ कार्यरत आहे .एनजीओ मार्फत महाराष्ट्रातील विविध ठिकाणी असलेल्या संस्था, आश्रम, वाड्या-वस्त्या, आदिवासी पाडे ,वीट भट्टीवरील मुले ,मुली ,शाळेतील विद्यार्थी अशा विविध गटात येणाऱ्या सर्वांसाठी क्राईम रिपोर्टर वेल्फेअर असोसिएशन व क्राईम बॉर्डर कार्य करीत आहे.

सदर एनजीओच्या पुणे जिल्हा महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा  सौ. चित्रा उर्फ श्रावणी कामत यांनी क्राईम रिपोर्टर वेल्फेअर असोसिएशन च्या राष्ट्रीय अध्यक्ष सौ. सीमा वखरे यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक जिल्ह्यातील लासलगाव येथे असलेल्या जय जनार्धन अनाथालय व वृद्धाश्रमास मागच्या महिन्यात भेट देऊन तेथील आढावा घेतला असता जय जनार्दन अनाथ वृद्धाश्रमाची स्थापना २००३ साली झाल्याचे समोर आले असून सदर संस्था ही खूप उत्कृष्ट कार्य करत असून संस्थाचालक व तेथील स्वयंसेवक हे निस्वार्थपणे कार्य करीत आहेत. असे त्यांच्या निदर्शनास आले .त्यांनी आत्तापर्यंत अनाथ मुलींचे संगोपन करून ७६ मुलींचे योग्य स्थळ बघून विवाह करून दिले आहेत. त्याचबरोबर ५२ अनाथ मुलांचे ही त्यांनी विवाह लावून दिले आहेत.  सदर संस्था ही अनाथ व  वृद्धांचे संगोपन करत आहेत.  आता हल्ली या आश्रमात ७५ मुले व मुली शिक्षण घेत आहेत.  सदर संस्थेचे संस्थापक परमपूज्य स्वामीवासुदेव नंदगिरी गुरु मौनगिरी महाराज असून सचिव श्री. दिलीप बाबुराव गुंजाळ व व्यवस्थापक सौ.संगीता दिलीप गुंजाळ, श्रीमती संगीता शंकर सोनवणे हे अथक परिश्रम घेत असतात.  

या सर्वांची भेट घेऊन या संस्थेला क्राईम रिपोर्टर वेल्फेअर असोसिएशन व क्राइम बॉर्डर च्या माध्यमातून पुणे जिल्हा महिला आघाडीच्या अध्यक्षा सौ.चित्रा उर्फ श्रावणी कामत यांनी संस्थेच्या वतीने अत्यावश्यक असलेल्या वस्तू येथील मुलींना दिल्या.
येथील मुले व मुली यांनी चांगले शिकून चांगले जीवन जगावे यासाठी संबंधित कार्यरत आहेत.  संस्थेकडे स्वतःची जागा आहे. परंतु मुलांसाठी राहण्यासाठी त्यांना बांधकाम करणे गरजेचे आहे वृद्ध ,अनाथ मुलांचा सांभाळ करण्याकरता समाजातील दात्यांनी पुढे येण्याचे आवाहन  संबंधितांनीसंस्थेच्या वतीने  केले  असून  आश्रमाला भेट देऊन यथा  शक्ती आर्थिक मदत करावी जेणेकरून अनाथ मुलांचे संगोपन व वृद्धांचे संगोपन करणे सोयीचे होईल.

सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी क्राईम बॉर्डर च्या पत्रकार व पुणे जिल्हा महिला आघाडीच्या अध्यक्षा सौ. चित्रा श्रावणी कामत या होत्या तसेच रवींद्र कदम,सुरेखा कदम,स्वप्ना सावंत,जितेश खाडे,पेडिया आदी मान्यवर उपस्थित होते सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ.संगीता गुंजाळ यांनी केले तर दिलीप गुंजाळ यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले. यावेळी क्राईम बॉर्डर व क्राईम रिपोर्ट वेल्फेअर असोसिएशन यापुढेही सदर अनाथालय वृद्धाश्रमास मदत करेल असे सौ. कामत यांनी आपल्या भावना व्यक्त करतांना सांगितले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 🙏दैनिक प्रजासत्ताक जनता नियमित वाचनासाठी

for latest updates...

Follow this link to join our WhatsApp group:

https://chat.whatsapp.com/Cf2s55RAfdQ0yVYSelRURA