Top Post Ad

आधूनिक पेशवाई संपविण्याची गरज

 
स्वातंत्र्यपूर्व काळापासून ते आजमितीपर्यंत या देशाचा इतिहास पाहिला तर आपल्या लक्षात येईल की या देशाला क्रांतिकारकांचा व हुतात्म्यांचा वारसा लाभलेला आढळून येतो. देशाप्रमाणे म्हणा किंवा आपल्या स्वाभिमानी अस्तित्वासाठी आजपर्यंत या देशात अनेक जण हुतात्मे झाले. परंतु जे लोक हुतात्मे झाले, त्यांच्या नावाने ठिकठिकाणी स्मारक उभी करायची आणि केवळ काही ठराविक दिवशी त्यांच्याप्रति कृतज्ञता व्यक्त करुन त्या स्मारकांना पुष्पहार अर्पण करावयाचे एवढेच. तीनशे पासष्ट दिवसांपैकी एक दिवस म्हणण्यापेक्षा काही तास त्या ठिकाणी व्यतित करायचे बाकी उरलेले दिवस हे ठिकाण म्हणजे कावळ्या कबुतरांचे शौचालयाचे ठिकाण झाल्dयाचे आपणांस पहावयास मिळते. अशाच प्रकारचा काहीसा प्रकार हा आपणांस भीमाकोरेगाव क्रांतिस्तंभाबाबत पहावयास मिळेल. ही बाब आपल्या लक्षात आणून दिल्याबद्दल कदाचित आपणांस थोडासा राग येईल. परंतु त्या रागातून सुद्धा काही निष्पन्न होणार नाही हेही एक सत्य आहे. कारण आजच्या घडीला आमच्यातील स्वाभिमान मेलेला आहे. 

महार एक वेळ जिद्दीला पेटला म्हणजे मरेल परंतु मागे हटणार नाही. इतकी शुर व स्वावलंबी जात जर का या देशात कोणती होती नव्हे तर आजही असेल तर केवळ महार व मांग; पण असे असतांना आज लोकशाही तत्वानुसार राज्यकारभार करणाऱया ये देशात दोन्ही जाती आपले अस्तित्व, आपला मुळ हक्क, आपल्dया स्वाभिमनाला संपविण्याचा प्रयत्न करीत असणाऱया जातीयवादी शासन व राज्यकर्त्यांच्या कारवाईपुढे गुडघ्यात मान  घालून व तोंडात मृग गिळून गप्प बसलेले पाहून मन हेलावून जाते. व याच जातींच्या शौर्याचे प्रतिक असलेल्dया भीमा नदीच्या काठावर वसलेल्dया कोरेगावच्या ठिकाणी  बहादुरीची साक्ष असलेला व ज्यांच्या शौर्यापुढे ज्या इंग्रजांनी या देशावर दिडशे वर्ष राज्य केले ते सुद्धा नतमस्तक झाले. या जातीचे शौर्याचे प्रतिक म्हणून आपल्dया कारकिर्दीत त्यांनी स्वत क्रांतिस्तंभ उभारला. हा इतिहास वाचतांना आश्चर्याचा धक्का बसतो. व मन भूतकाळात घडलेल्dया घटनेचा आडावा घेण्यासाठी मन त्या दिशेने वाटचालीस प्रारंभ करते. 

खरं पाहता 1 जानेवारी 1818 ही दिवस भारताच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहला गेला पाहिजे होता. परंतु तसे घडले नाही. या बाबीचा विचारच कधी इथल्या सुशिक्षीत समाजाने केला नाही. इंग्रजांनी या देशावर आक्रमण करुन एक एक राज्य जिंकण्याचा ज्यावेळी सपाटा लावला होता. त्यावेळी महाराष्ट्रात जातीयवादी पेशव्यांचे राज्य होते. जे केवळ मनुवादी संस्कृतीने दिलेल्या वर्णवर्चस्ववादी संस्कृती जोपासण्यात स्वतला श्रेष्ठ समजत होते. अशा परिस्थितीत सुद्धा देश प्रेमाने भारावलेली ही जमात या देशाचे रक्षण इंग्रजापासून व्हावे केवळ या भावनेतून पेटून उठले व त्यावेळी पेशव्यांच्या राजवटीतील दुसरा बाजीराव पेशवा याकडे जाऊन देशाच्या अस्मितेसाठी इंग्रजांच्या विरुद्ध आपण शस्त्र उचलण्यास व वेळ पडल्यास जिवाची बाजी लावण्यास सुद्धा मागे पाहणार नाही अशी ग्वाही दिली. परंतु या देशातील आमच्या स्वतच्या अस्तित्वाबद्दलचा सवाल करताच वर्णवर्चस्व व जातीयवादाचा टेंभा मिरविणाऱया पेशवाईने उत्तर दिले की सुईच्या अग्रभागावर थरथरत उभ्या राहणाऱया धुळीच्या कणा इतके स्थान देखिल तुम्हाला दिले जाणार नाही. असे तिरस्काराचे बोल ऐकून आपले स्वतचे अस्तित्व अबाधित राखण्यासाठी मुळ नागवंशीय असणाऱया या बहादुर शिपायांनी आपला सरदार सिदनाक याच्या नेतृत्वाखाली इंग्रजांच्या बाजुने लढण्याचा निर्धार करुन केवळ 500 सैनिक व 300 घोडेस्वारांच्या मदतीने पेशव्यांचे 25,000 सैनिक, 5000 घोडेस्वारांना पराजित करुन आपल्dया पराक्रमी शौर्याचा इतिहास दाखवून दिला. 

शिवाजी महाराजांच्या काळानंतर जेव्हा मराठी राज्याची सुत्रे ब्राम्हण पेशवे यांच्या हाती गेली तेव्हा त्यानी धर्माच्या नावाखाली अस्पृश्य जातीवर अत्यंत कडक असे निर्बंध लादले. इंग्रजांच्या राजवटीत  हिंदू समाजाचा एक हिस्सा असूनही महार मांग आदी समाजाला सैन्य भरती पासून दूर लोटले. हिंदू समाजाकून मिळत असणाऱया या अपमानास्पद वागणूकीला आपले यादेशातील मुळ स्थान कोणते हे दाखवून देण्यासाठी या विरांनी गोऱया ब्रिटीशांना सहकार्य केले. परकियांनी या ठिकाणी येऊन आपल्dया चाणाक्ष दृष्टीने येथील समाजव्यवस्थेचे अवलोकन करावे. समाजातील कच्चे दुरावे हेरावे व नेमके ते हाती घेऊन त्यांच्या बळावर येथे आपली सत्ता प्रस्थापित करावी हा या देशाचा दुदैवी इतिहास आहे. परंतु त्यापेक्षा  दुदैव मोठे हे आहे की येथील समाज धुरींणांना आपल्या समाजव्यवस्थेतील हे अवगूण दुर करण्याचे कधीच सुचले नाही. परकीयांची सत्ता वाढविण्यासाठी याच समाजातील जे जे घटक परकियांना उपयोगी पडले ते घटक स्वराज्य किंवा स्वदेशीयांचे राज्य ही बलिष्ठ करु शकले नसते काय? परंतु अस्पृश्य आदी जातींना शुद्र लेखून त्यांच्या गुणांची कदर येथील समाज नेतृत्वाने कधी केलीच नाही. 

1 जाने.1818ला भीमानदीच्या काठी केरगावात उभ्या असलेल्या या क्रांतीस्तंभाला आदरांजली वाहण्यासाठी स्वत डॉ.बाबासाहेब आंबेडकर नियमीतपणे उपस्थित रहात असत. त्यांच्या पश्चात सुद्धा ज्या समाजाने बाबासाहेबांना स्विकारले त्या समाजातील बरेचसे लोक त्या ठिकाणी जाऊन या शुरविरांना आदरांजली अर्पण करतात. आणि घरी परततात.  परंतु जेव्हा जेव्हा भीमा कोरेगाव येथे या अविस्मरणिय क्षणानिमित्त जमा होणारी गर्दी पाहिल्यानंतर याच समाजातील शौर्याचे प्रतिक असणाऱ्या क्रांतिस्तंभाला पाहिल्यानंतर आजच्या बौद्धांचे पूर्वजच श्रेष्ठ म्हणाले लागेल. कारण बाबासाहेबांनी 1956 साली दिलेल्या बौद्धधम्मानंतर  व बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणानंतर या समाजातील अन्यायाविरुद्ध लढण्याची शक्ती संपल्याचे जाणवते. आजचा केवळ धर्मांतरीत झालेला बौद्ध खऱया अर्थाने बुद्धापासून दूरच आहे असे खेदाने म्हणावे लागेल. कारण मुळ बौद्ध संस्कृतीची प्रतिक असलेल्या या देशातील, राष्ट्रातील अथवा आपल्dया घराजवळील असणाऱया बौद्ध लेण्यांवर जातीयवादी संघटनांकूडन काही गुप्त व काही ठिकाणी उघडपणे होत असलेल्dया विकृतीकरणाच्या  बाबतीत कोणीही आजचा बौद्ध आपल्या पूर्वजांसारखी हालचाल करित नाही. अशाच प्रकारच्या षंड वृत्तीमुळे जातीयवाद्यांच्या कारवाया दिवसेंदिवस लेण्यांच्या विकृतीबाबत अतिक्रमणाबाबत वाढल्या असल्याचे आपणांस पहावयास मिळते. 

आपल्या अस्तित्वाचे प्रतिक जपण्याच्या आमच्या प्रयत्नांना सहकार्य करणे सुद्धा यांना न जमावे ही बाबच मुळी लज्जास्पद आहे. स्वतच्या अस्तित्वासाठी स्वातंत्र्यपूर्व काळातच ज्या आपल्dया पूर्वजांनी वर्णवर्चस्ववादी शृंखलेच्या बेड्या तोडून इथल्dया पेशवाईला सळो कि पळो करुन सोडले, आपल्या शौर्याची साक्ष दिली हा इतिहास आठवता आजची त्यांचीच अवलाद मात्र षंड निघाली असे खेदाने म्हणावेसे वाटते. रमाबाई आंबेडकर नगर हत्याकांड घडवणारा नराधम मनोहर कदम आजही उजळ माथ्याने फिरत आहे. अगदी दोन वर्षापूर्वी कोरेगाव भीमा संघर्षाला दोनशे वर्षे पूर्ण झाल्याच्या कार्यक्रमाला गालबोट लावणारे मनुवादी संभाजी कुलकर्णी-भीडे, मनोहर एकबोटे आजही पुन्हा अशाच कारवाया करायला मोकळे हिंडताहेत. आम्ही मात्र न्यायालयाचे दरवाजे ठोठावत आहोत. महाराष्ट्र बंद करून प्रशासनाला हादरे देऊनही शेवटी आमच्यावरच कारवाई ही आहे आधूनिक पेशवाई. मंदीर, सभा, आंदोलन, मोर्चे सुरु असताना केवळ विजयस्तंभाला अभिवादन करणाऱ्यांवरच १४४ कलम लागू संचारबंदी लागू अशा या पेशवाईला आता कधी मातीत गाडणार...

... अरूणा नारायण

अहमदनगरटिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com