ग्रामपंचायत हद्दीत नियमबाह्य जमीन खरेदी-विक्री - कायदेशीर कारवाईची मागणी.

विंधणे ग्रामपंचायत हद्दीत नियमबाह्य जमीन खरेदी विक्री 

संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी. 

 


 

उरण
उरण तालुक्यातील मौजे विंधणे ग्रामपंचायत हद्दीतील बोरखार, धाकटी जुई, खालचा पाडा, नवापाडा येथे  गोरगरीब शेतकऱ्यांची फसवणूक करून अनेक विविध कंपन्यांनी शेतकऱ्यांकडून जागा खरेदी करून सदरचे जागा दुसऱ्यांना नियमबाह्य पद्धतीने विकत असून सदर विविध कंपन्यांवर व संबंधितांवर कायदेशीर कारवाई करावी, नियमबाह्य पद्धतीने चाललेले खरेदीविक्री व्यवहार बंद करावेत अशी मागणी भूमी बचाव शेतकरी सामाजिक संघटना उरण यांनी एका लॆखी निवेदनाद्वारे उरणचे तहसीलदार भाऊसाहेब अंधारे यांच्याकडे केली आहे.

 

उरण तालुक्यातील विंधणे ग्रामपंचायत हद्दीतील बोरखार, धाकटी जुई, खालचा पाडा, नवापाडा या गावातील शेतकऱ्यांनी आपल्या जमिनी कवडीमोल किंमतीने विविध कंपन्यांना विकल्याचे समजते. त्या कंपनीनकडून नियमबाह्य पद्धतीने जमिनीची बॅनरबाजी करून लोकांची फसवणूक करून लोकांना आकर्षित करण्याचे काम सदर कंपन्यांकडून करण्यात येत आहे. ते नियमबाह्य आहे. त्यासाठी कंपन्यांनी शासनाचे कोणतेही परवानगी घेतलेले दिसत नाही.

 

सदरचा व्यवहार कंपन्यांकडून राजेरोसपणे नियमबाह्य पद्धतीने होत असून शासनाचे सर्व नियम पायदळी तुडविले जात आहेत असा आरोप तहसीलदार यांना देण्यात आलेल्या लेखी निवेदनाद्वारे भूमी बचाव शेतकरी सामाजिक संघटनेने  केला आहे. बेकायदेशीर व नियमबाह्य चाललेले हे काम, खरेदीविक्री व्यवहार त्वरित बंद करावेत व संबंधितांवर कायदेशीर कारवाई करावी असे निवेदन संघटनेच्या वतीने उरणचे तहसीलदार भाऊसाहेब अंधारे व उरण पोलीस ठाणे येथे देण्यात आले.यावेळी संघटनेचे अध्यक्ष अजित म्हात्रे, उपाध्यक्ष -तेजस डाकी, सचिव -प्रजीव म्हसकर, कार्याध्यक्ष -दीपक भोईर, ऍड धीरज डाकी, पृथ्वीराज ठाकूर आदी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
 

 


 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 🙏दैनिक प्रजासत्ताक जनता नियमित वाचनासाठी

for latest updates...

Follow this link to join our WhatsApp group:

https://chat.whatsapp.com/Cf2s55RAfdQ0yVYSelRURA