जेएनपीटी सेझ प्रकल्पामध्ये सुमारे सव्वा लाख रोजगार उपलब्ध होणार असल्याचा दावा

 जेएनपीटी सेझ प्रकल्पामध्ये सुमारे सव्वा लाख रोजगार उपलब्ध होणार असल्याचा दावा


उरण
जेएनपीटीत आंतरराष्ट्रीय दर्जाच्या उभारण्यात येत असलेल्या सेझ प्रकल्पाला वीजपुरवठा करण्यासाठी स्वतंत्र ५०  मेगावॉट वीज निर्मितीचे सबस्टेशन उभारण्यात येत आहे. २७७ हेक्टर क्षेत्रात अत्याधुनिक सेझ प्रकल्प निर्मितीचे काम जेएनपीटीने सुरू केले आहे. केंद्र सरकारच्या नौकानयन मंत्रालयाच्या सागरमाला योजनेतून सुमारे ५००० कोटी खर्चुन हा जेएनपीटी सेझ प्रकल्प उभारण्यात येत आहे. नव्याने सुरू होण्याच्या मार्गावर असलेले नवी मुंबई एअरपोर्ट, डीएफसी रेल कॉरेडॉर, ट्रान्स हार्बर लिंकशी हा अत्याधुनिक सेझ प्रकल्प जोडला जाणार आहे. सुमारे 50 कोटी खर्चुन उभारण्यात येत असलेल्या सबस्टेशनमुळे सेझमधील व्यावसायिकांना अगदी कमी दरात वीज पुरवठा करणे शक्य होणार आहे.  येत्या डिसेंबर अखेरपर्यंत है सबस्टेशन कार्यान्वित होणार असल्याची माहिती जेएनपीटी अधिकाऱ्यांनी दिली.


 या प्रकल्पामध्ये देशी-विदेशी कंपन्यांकडून हजारो कोटींची गुंतवणूक केली जाणार आहे .तसेच या जेएनपीटी सेझमध्ये सुमारे सव्वा लाख रोजगारही उपलब्ध होणार असल्याचा दावा करण्यात येत आहे. या  प्रकल्पाला वीज पुरवठा करण्यासाठी जेएनपीटी मार्फतच 50 मेगावॉट वीजनिर्मिती क्षमतेचे सबस्टेशन उभारण्यात येत आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून हे वीजनिर्मिती सबस्टेशन उभारण्यात येत आहे.  या प्रकल्पासाठीच पहिल्यांदाच ओव्हर हेड लाईनचा वापर करून वीज निर्मिती केंद्र उभारण्यात येत आहे.या उभारण्यात येत असलेल्या सबस्टेशनमुळे सेझमधील व्यावसायिकांना 12 ते 13 रुपये प्रति युनिट इतक्या कमी दरात वीज पुरवठा करणे शक्य होणार आहे. तसेच सबस्टेशन उभारणीमुळे वीजपुरवठाही खंडित होणार नसुन अखंडपणे सुरळीतपणे सुरू राहणार आहे.यासाठी सबस्टेशन एमएसईबीसोबत टायप करण्याचे जेएनपीटीचे प्रयत्न सुरू आहेत. कोरोनामुळे या सबस्टेशन उभारण्याचे काम लांबणीवर पडले होते. मात्र सध्या जलदगतीने सुरू असलेल्या कामामुळे सबस्टेशन उभारण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे.यामुळे सेझ प्रकल्पाला वीजपुरवठा करण्यासाठी स्वतंत्र 50 मेगावॉट वीज निर्मितीचे सबस्टेशन येत्या डिसेंबर अखेरपर्यंत कार्यान्वित होईल असा विश्वास जेएनपीटी अधिकाऱ्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे.टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad