सामाजिक न्याय विभागाच्या कारभारावर तीव्र नाराजी
माजी सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले
मागील वर्षभरापासून सामजिक न्याय विभागाची अवहेलना आणि कोणत्याही योजनांची अंमलबजावणी होत नाही हे पाहुन मनाला दुक्ख होत आहे.बाबासाहेब आंबेडकर यांनी ज्या हेतूने या विभागाची स्थापना केली होती ते पाहता हा विभाग सगळ्यात महत्वाचा विभाग होता.परंतू हळू हळू या विभागाचे जातिनिहाय विभाजन करण्यात आले आणि सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग हा फक्त अनुसूचित जाती पुरता मर्यादित करण्यात आला.यात दिव्यांग आणि समाजातील शोषित वंचिताला न्याय देण्याची क्षमता असूनही या विभागाकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा अस्पृष्या सारखा असल्याचं लक्षात येते.
डा.आंबेडकरंची सामाजिक न्यायाची संकल्पना अत्यंत व्यापक होती.परंतू या व्यापक कल्पनेला गोठवन्याचे काम मागील सत्तर वर्षात झाले. पुर्वी अनु जाती, महिला विकास,अनु जमाती विकास, इतर मागास वर्ग, अपंग विकास,निराधार, जेष्ट नागरिक,व मानव विकासाच्या सगळ्या बाबी या विभागात समाविष्ट होत्या.हळूहळू जातीनिहाय सगळे विभाग वेगळे करण्यात आले आणि सामजिक न्याय हा शब्द फक्त भाषणापुरता मर्यादित राहिला.
महामंडळाची स्थिती: हळू हळू समाजातील तरुणांच्या हाताला काम देण्याच्या दृष्टीने महात्मा फुले विकास महामंडळ,लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ,संत रविदास चर्मकार विकास महामंडळ, अपंग विकास महामंडळ,ओबीसी विकास महामंडळ, वसंतराव नाईक विकास महामंडळ, अण्णासाहेब पाटील विकास महामंडळ,अश्या समाज निहाय महामंडळाची स्थापना करण्यात आली परंतु या मंडळांचा योजनांचा फायदा समाजातील तरुणांना व्हावा तसा झाला नाही याची खदखद लोकांमध्ये दिसून येते.या महामंडळाचा राजकीय कारणांनी फायदा करण्याचे काम काही लोकांनी केलं.सरकारने बजेटमध्ये निधीची तरतूद केली असं मोठ्यांना मोठ्याने लोकांपुढे बडेजाव केला. भाषणात उल्लेख केला. परंतु वित्त विभागाकडून या महामंडळांना निधी दिला गेला नाही.सरकार हमी घ्यायला तयार नाही.महामंडळ कागदावरच राहिली.बेरोजगार तरुणाला त्याच्या उद्योगासाठी निधीच मिळाला नाही.त्यासाठी मी खुप झागड़लो.एकदा खुप उद्गिन् होऊन राजिनामा सुद्धा दिला होता.पण माझे हे दुक्ख कुणाला दिसले नाही.मी ज्या पक्षात राहून हे सगळे करीत होतो त्यामूळे मला कुणाची साथ मिळत नव्हती.पण मी स्वतासाठी काही केले नाही.माझी सगळी धडपड समाजासाठीच होती.
एकदा परम पूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते, मला माझ्या शिकल्या सवरल्या लोकांनीच दगा दिला! त्याची प्रचीती आता येऊ लागली आहे! सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव हे साधारणता अनुसूचित जाती जमाती प्रवर्गाचेच असतात परंतु सगळ्याच मागासवर्गीय प्रवर्गातील आयएएस अधिकारी कधीतरी एकत्र येऊन समाजाचा विकास कसा करता येईल यासाठी योजनांची अंमलबजावणी कशा रीतीने करता येईल याबाबत त्यांच्यात उदासीनता पाहायला मिळते! प्रत्येक अधिकारी मी कसा मोठा होईल याबाबतच विचार करताना दिसतो! त्यामुळे आपल्या मागण्यांसाठी लढणारा एकजीव आंबेडकरी समाज निर्माण न होता तुकड्या-तुकड्यात विभागलेला सुशिक्षित आंबेडकरी समाज आज पाहायला मिळतो.ष्प्रत्येक घरात एक नेता निर्माण झालेला दिसतो. त्यामुळे समाजाचे मूळ प्रश्न हे बाजूलाच पडलेले असतात.आज 90 टक्के सुशिक्षित अनुसूचित जातीच्या लोकांमध्ये प्रचंड बेरोजगारी पाहायला मिळते.याबाबत कधीतरी समाजातील सगळ्या पक्ष पक्षात विभागलेली नेतेमंडळी आणि स्वतला उच्चभ्रू समजणारी आयएएस अधिकारी मंडळी आणि उच्चपदस्थ अधिकारी एकत्र येऊन याबाबत मंथन करतील का हा खरा प्रश्न आहे!
प्रत्येकच स्वतला खरा आंबेडकरवादी म्हणून घेण्यात धन्यता मानतो.समाज अजूनही गावा खेड्यांमध्ये झोपड्यांमध्ये दारिद्र्य आणि उपासमार यातच माझा भीम परत जन्माला येईल का? या आशेने दिवस काढतोय! आता आरक्षण संपविले आहे!अनुसूचित जातीची मते वेगळी करून काही सनातन विचाराचे लोक बाबासाहेबांच्या स्वप्नांना चकणाचूर करीत आहेत.मागील काही निवडणुकीमध्ये याची प्रचिती आलेली आहे. तरीपण समाज अजूनही गाढ झोपेत आहे. जी काही चांगली काम करण्याचा कोणी प्रयत्न केला तर स्वतला बुद्धिवादी म्हणून घेणारे समाजातील काही अधिकारी त्याला विरोध करतात! मी कसा योग्य आहे हे दाखवण्याचा प्रयत्न करतात!कधी कधी मला प्रश्न पडतो, क्ष्लंडनमधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे घर घेणे असेल किंवा इंदू मिल या ठिकाणी बाबासाहेबांचं स्मारक उभारण्याचे काम असेल चिचोली येथील स्मारकाचं काम असेल किंवा चोखामेळा वसतिगृह बांधण्याचं कामाला मंजुरी देणेअसेल किंवा जिथे जिथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे कार्य आहे अशा सर्व स्थळांचा विकास करण्याचं काम असेल किंवा विदेशात प्रज्ञावंत विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याचा काम असेल किंवा बार्टीच्या माध्यमातून नागरी परीक्षेसाठी दिल्ली येथे प्रशिक्षण देण्याचं काम असेल अशी असंख्य कामे करताना समाजाचा विकास हा एक ध्येय जपुन कामे करीत होतो!
अनेक लोकांना माझी ही कामे पाहिली गेली नाहीत.काही लोक भीमा कोरेगाव येथील जमीन संपादन करताना खुप विरोधात गेली..तीन महिने शिल्लक असताना मंत्रीमन्डळातून मला कमी करण्यात आले.तरीपण कुणी फारसे बोलले नाहीत!मला त्याचे दुःख नाही,परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रशिक्षण व संशोधन केंद्र पुणे व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर क्ष्समता प्रतिष्ठान नागपूर यासारख्या चांगल्या संस्थांना बळकटी देणे आणि समाजाच्या हितासाठी त्यांच्या माध्यमातून योग्य काम करावे व्हावे या हेतूने या संस्थांची निर्मिती करण्यात आली! परंतु काही अधिकारी या संस्थानाच संपवण्याचा डाव करत आहेत,हे मात्र अत्यंत वेदना दायक चित्र आहे! हे अधिकारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या रक्ताचे स्वतला म्हणून घेतात मात्र आपल्याच योजनांचा खात्मा करण्याचे काम करतात हे अत्यंत दुर्दैवी चित्र पाहून आज खूप दुःख होत आहे.शेवटी आपलेच हात आणि आपलीच कुरहाड!
0 टिप्पण्या