Top Post Ad

 बिरसा मुंडा कृषि क्रांती योजनांचा लाभ घेण्याचे कृषि व पशुसंवर्धन समिती सभापतींचे आवाहन

 बिरसा मुंडा कृषि क्रांती योजनांचा लाभ घ्यावा
 सभापती, कृषि व पशुसंवर्धन समिती संजय निमसे आणि
 मुख्य कार्यकरी अधिकारी डॉ. रुपाली सातपुते यांचे आवाहन


ठाणे
 आदिवासी शेतक-यांच्या उत्पन्नात  वाढ करुन त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी बिरसा मुंडा कृषि क्रांती योजना (क्षेत्रांतर्गत/क्षेत्राबाहेरील) सन २०२०-२१ मध्ये ठाणे जिल्हयात राबविण्यासाठी शासनाने मान्यता दिलेली आहे.  या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज दाखल करण्याची सुविधा सन २०२०-२१ या आर्थिक वर्षामध्ये उपलब्ध करुन देण्यात आलेली असून इच्छुक शेतक-यांनी  महा डीबीटी  पोर्टलचे https://mahadbtmahait.gov.in/ या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज  नोंदणी करावी. असे आवाहन  कृषि व पशुसंवर्धन समिती  सभापती संजय निमसे आणि मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. रुपाली सातपुते   यांनी केले आहे.
अर्ज नोंदणीसाठी जातीचे प्रमाणपत्र, ७/१२ , ८अ उतारा , आधारकार्ड , बँक खाते क्रमांक, तहसिलदारांचा उत्पन्नाचा दाखला तसेच ग्रामसभेचा ठराव इत्यादी प्रमाणपत्रांची आवश्यकता  आहे. शेतक-यांनी ऑनलाइन अर्ज केल्यानंतर आवश्यक सर्व मूळ कागदपत्रासह आपला प्रस्ताव  आपणाशी संबधीत पंचायत समिती कार्यालयामधील कृषि अधिकारी यांचेकडे वेळेत स्वहस्ते सादर करावा व अर्जाची  पोहोच घ्यावी. 


 


































































अ.क्र.



बाब



उच्चतम अनुदान मर्यादा (रुपये )


   



नवीन विहीर



२,५०,०००/-





जुनी विहीर दुरुस्ती



५०,०००/-





ईनवेल बोअरिंग



२०,०००/-





वीज जोडणी आकार



१०,०००/-





शेततळयाचे प्लॅस्टिक अस्तरीकरण



१,००,०००/-





सूक्ष्म सिंचन संच     अ) ठिबक संच



५०,०००/-



 



                            ब) तुषार संच



२५,०००/-





परसबाग



५००/-





पंपसंच (डिझेल/विदयुत)



२००००/-  (१० अश्वशक्ती पर्यंत)





पीव्हीसी /एचडीपीई पाईप



३००००/-



                 या योजनांतर्गत वरील बाबींचा समावेश असला तरी या योजनेचा लाभ पॅकेज स्वरुपात देय आहे असे एकूण तीन पॅकेज असून पैकी एका पॅकेजचा लाभ देय राहील.
         नवीन विहीर पॅकेज – सदर पॅकेज अंतर्गत लाभ घेणा-या शेतक-यांना नवीन विहीर वीज जोडणी आकार सुक्ष्म सिंचन संच (ठिबक/तुषार), पंपसंच, पीव्हीसी /एचडीपीई पाईप, परसबाग या बाबींचा लाभ देय आहे. तथापी  यापूर्वी कोणत्याही शासकिय योजनेतून लाभार्थ्याने नवीन विहीर या बाबीचा लाभ घेतलेला नसावा.
         जुनी विहीर दुरुस्ती – सदर पॅकेज अंतर्गत लाभ घेणा-या शेतक-यांना जुनी विहीर दुरुस्ती, वीज जोडणी आकार, सुक्ष्म  सिंचन संच (ठिबक/तुषार), पंपसंच, पीव्हीसी/ एचडीपीई पाईप, परसबाग  या बाबींचा लाभ देय आहे. तथापी यापूर्वी कोणत्याही शासकीय योजनेतून लाभार्थींन विहीर घटकाचा लाभ घेतलेला नसावा.
         शेततळयाचे अस्तरीकरण - सदर पॅकेज अंतर्गत लाभ घेणा-या शेतक-यांना शेततळयाचे प्लॅस्टिक अस्तरीकरण, वीज जोडणी  आकार, सुक्ष्म सिंचन संच (ठिबक/तुषार), पंपसंच, पीव्हीसी /एचडीपीई पाईप, परसबाग, या बाबींचा लाभ देय आहे. तथापी यापूर्वी कोणत्याही शासकिय योजनेतून अशा लाभार्थीने नवीन विहीर , जुनी वहीर दुरुस्ती अशा घटकाचा लाभ घेतलेला नसावा.
         ज्या शेतक-यांनी यापूर्वीच शासकिय योजनेतून विहीर घेतली असेल अथवा स्वखर्चाने विहीर बांधली असेल अशा शेतक-यांना वीज जोडणी आकार, सुक्ष्म सिंचना संच (ठिबक/तुषार) पंपसंच, पीव्हीसी पाईप/एचडीपीई पाईप, परसबाग  यासाठी अनुदान देय राहील.


  या योजनेसाठी लाभार्थी पात्रतेचे निकष
  बिरसा मुंडा  कृषि क्रांती योजनेकरीता लाभार्थीकडे  अनुसूचित जमाती प्रवर्गातील सक्षम  प्राधिका-यांने  दिलेले जात प्रमाणपत्र असणे बंधनकारक आहे.
  नवीन विहीर या बाबीचा लाभ घ्यावयाचा असल्यास लाभार्थी कडे किमान ०.४० हेक्टर जमीन क्षेत्र असणे आवश्यक . इतर बाबींचा लाभ घेणा-या शेतक-याकडे किमान ०.२० हेक्टर क्षेत्र असणे आवश्यक.
  या योजनांतर्गत लाभ घेण्यासाठी सर्व बाबींसाठी कमाल क्षेत्र मर्यादा ६.०० हेक्टर आहे.
  शेतक-याच्या नांवे जमीनधारणेचा ७/१२ दाखला व ८अ उतारा असणे आवश्यक आहे. (नगर पंचायत , नगरपालिका, महानगर पालिका क्षेत्रातील लाभार्थी वगळून)
  लाभार्थी कडे स्वत:चे आधारकार्ड असणे आवश्यक आहे.
  लाभार्थीचे स्वत:चे बॅक खाते त्याच्या आधारकार्डाशी संलग्न असणेआवश्यक आहे.
  बिरसा मुंडा कृषि क्रांती योजनेअंतर्गत परंपरागत वन निवासी (वन अधिकार मान्यता ) अधिनियम २००६ नुसार वनपटटेधारक शेतक-यांना प्राधान्य आहे.
  लाभार्थींचे  सर्व मार्गाने मिळणारे वार्षीक उत्पन्न  रु १,५०,०००/- पेक्षा जास्त नसावे तसा तहसिलदार यांचेकडून सन २०१९-२० चे उत्पन्नाचा दाखला असणे आवश्यक  आहे .


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com