क्रांतिकारक परिवर्तन होणार आहे, त्याचे ड्रायव्हिंग फोर्स रिपाईंच असणार - श्याम गायकवाड

क्रांतिकारक परिवर्तन होणार आहे
त्याचे ड्रायव्हिंग फोर्स रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच असणार - श्याम गायकवाड

 

शहापूर
आंबेडकरी चळवळीचे जेष्ठ नेते दिवंगत भगवान (नाना) गोपाळ गायकवाड यांचे दिनांक ६ नोव्हेंबर २०२० रोजी दुःखद निधन झाले असून त्यांचा पुण्यानुमोदन कार्यक्रम रविवार दिनांक १५ नोव्हेंबर २०२० रोजी सकाळी ११ वाजता त्यांचे रहाते घरी शारदा निवास शहापूर येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (सेक्युलर) राष्ट्रीय अध्यक्ष श्याम गायकवाड, राष्ट्रीय नेते सुरेश सावंत यांच्या सह शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थतीत  संपन्न झाला. त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून बोलतांना श्याम गायकवाड म्हणाले की मला अजूनही आशा आहे की रिपब्लिकन पक्ष उभा राहील आणि या देशात जे काही क्रांतिकारक परिवर्तन होणार आहे त्याचे ड्रायव्हिंग फोर्स रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच असणार आहे. 

 


 

भगवान गायकवाड यांना आदरांजली वाहताना श्याम गायकवाड म्हणाले की भगवान गायकवाड यांनी फुले- आंबेडकरी चळवळीचे अनेक गट बदलले परंतु फुले आंबेडकरी चळवळीचा परीघ सोडून कधी प्रतारणा केली नाही त्यांनी आपले घर कधीच सोडले नाही त्यांचे मी त्यांचे कौतुक करतो परंतु ज्यांनी फुले आंबेडकरी पक्ष सोडून प्रतारणा केली त्यांचे कौतुक कधीही होता काम नये. असे म्हणत त्यांनी सांगितले की मला अजूनही विश्वास आहे फुले-आंबेडकरी चळवळीचे १० घरे झाले असतील परंतु ते एक होतील, समता सैनिक दल निर्माण होईल.

 

मला अजूनही आशा आहे की रिपब्लिकन पक्ष उभा राहील आणि या देशात जे काही क्रांतिकारक परिवर्तन होणार आहे त्याचे ड्रायव्हिंग फोर्स रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच असणार आहे. रिपब्लिकन पक्षाला काही धोरण आहेत, तत्वज्ञान आहे, सीलॅबस आहे. तो सीलॅबस सांगतो की तुमचे नक्की शत्रू कोण आहेत. या देशातले आर. आर. एस. वादी, भाजपा, जातांध आणि मनुवादी विचाराचे सगळेच्या सगळे तुमचे शत्रू आहेत. हा किमान विचार आहे आंबेडकरी चळवळीचा, हा विचार ज्यांना माहीत आहे त्यांच्याकडून व्यवहाराची आशा आहे.  हा देश वाचवायचे काम फक्त आणि फक्त फुले-आंबेडकरी विचारच करू शकतो. 

यावेळी शहापूर येथील आंबेडकर चौकाचे प्रणेते दिवंगत भगवान (नाना) गोपाळ गायकवाड यांचे जीवनावर अनेक कार्यकर्त्यांनी प्रकाश टाकत त्यांना आदरांजली वाहिली व शहपूरातील एका धगधगत्या निडर नेत्याच्या जाण्याने आंबेडकरी चळवळीत मोठी पोकळी निर्माण झाली असल्याचे सांगितले. यावेळी ठाणे जिल्ह्यातील फुले- आंबेडकरी चळवळीतील शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. 

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या