मुंबईतील कोणत्याही कोळीवाड्यांना SRA प्रकल्प लागू करण्यात येणार नाही

मुंबईतील कोणत्याही कोळी वाड्यांना SRA प्रकल्प लागू करण्यात येणार नाहीनवी मुंबई
गेल्या काही दिवसांपासून मनसे अध्यक्ष राज ठाकरे पुन्हा एकदा Active मोड मध्ये आले आहेत. नवी मुंबई च्या घराचा प्रश्न सोडवल्यानंतर राज यांची आज कोळी बांधवांनी भेट घेतली. मुंबईतील कोणत्याही कोळी वाड्यांना SRA प्रकल्प लागू करण्यात येऊ नये. अशी मागणी कोळी बांधवाचे नेते राजाराम पाटील यांच्यासह कोळी बांधवांच्या शिष्टमंडळाने राज ठाकरे यांना केली होती. त्यानंतर राज यांनी मुंबईतील कोणत्याही कोळी वाड्यांना SRA प्रकल्प लागू करण्यात येणार नाही. अशी ग्वाही कोळी बांधवांना दिली आहे. सरकारने कोळीवाडयांना SRA घोषित करून अपमानित केले. त्यानंतर कोळीवाड्यातून जमिन हक्क मिळावा म्हणून गावठण हक्काची चळवळ सुरु झाली. शिवसेना - भाजपा युती सरकारने कोळीवाडा गावठणे सीमांकित करण्याचा चांगला निर्णय घेतला.


परंतु मुंबईतील मूळ भूमीपुत्र असलेला आगरी कोळी, भंडारी, ईस्टइंडियन , आदिवासी समाजाची एकूण दोनशे गावठणे आहेत. केवळ 72 ते 20 कोळीवाडयांचे सीमांकन करण्यात आले. मात्र महसूल विभागाने मालकी हक्क कागदपत्रे व नकाशे आजही दिली नाहीत. या प्रश्नावर आपण लक्ष घालून सागरपुत्र समाजास न्याय दयावा. अशी मागणी कोळी समाजबांधवांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेऊन केली. राज ठाकरे यांना कोळी बांधवांचे प्रतीक असलेली कोळी टोपी परिधान करण्यात आली. यावेळी आगरी-कोळी समाजाचे नेते राजाराम पाटील, विजय वरळीकर, जयेश आक्रे, भुवनेश्वर धनु, निकोल्स अलमेडा, राजेश्री भांजी, नयना पाटील, हरीलाल वाडकर, अरविंद साने आदी उपस्थित होते.


यावेळी कोळी बांधवांनी निवेदनाद्वारे केलेल्या मागण्या
1.कोळीवाडयाचा हजारो वर्षांचा इतिहास पहाता येथील घरे, मोकळया वापरातील जागा, मासळी मार्केट , जाळी विणण्याच्या जागा, रस्ते, सार्वजनिक वापरातील वस्तू आणि जागा यांना गावठण हक्क आणि विकास यातून मालकी हक्क । प्रॉपर्टीकाई मिळून ) स्वतंत्र विकासाचा अधिकार मिळावा.
2. कोळीवाडे आणि समुद्राचा अधिकार समुद्रावरील व्यवसायाचे अधिकार शासनाने मान्य करावेत. उ.मासळी मार्केट कोळीवाडा आणि गावठणाचा सागरी व्यापार जलवाहतूक, रेती, मासेमारी , मिठागरे हे पारंपारिक अधिकार आहेत. 
3) त्यानुसार मुंबईतील सर्वत्र मासळी मार्केट मधील जागेचा मालकी हक्क आणि विकासाचा अधिकार मासळी विकणाऱ्या महिलांना मिळावा . उदा :- भाऊचा धक्का , ससुनडॉक, मरोळ मार्केट ( सुके व ओले मासे), क्रॉफर्ड मार्केट है मुंबईतील प्रमुख मार्केट आहे.
4.जमिनीवरची शेती तसेच मच्छिमारांच्या समुद्रावरची शेती म्हणजेच मासेमारी जमिनीपमाणे समुद्रातील मासेमारीच्या जागेची मालकी अधिकार सरकारने मान्य कारावा. कोस्टल रोड, शिवडी सीलिंग , शिवस्मारक यात वाधीत होणाऱ्या मच्छिमारांना प्रकल्पग्रस्त घोषित करून नव्या भूसंपादन कायदयाने त्यांचे पुनर्वसन करावे.


5.कृषि खात्याप्रमाणेच मासेमारीला स्वतंत्र मंत्रालय असावे . त्याचे स्वतंत्र आर्थिक अनुदान शासनाने दयावे.कर्ज पुरवठा करावा विकास योजना राबवाव्यात.
6. कोळीवाडे यातिल मातृसत्ता , हुंडा नाकारणारी, एकविरा संस्कृती, खादयसंस्कृती, कोळी नृत्यसंस्कृती, पर्यटकांना आकर्षित करणारी आहे. या परिसराचे भौगोलीक स्थान पुरातत्वीय इतिहास पाहता कोळीवाड्यांचे संवर्धन करून गोवा , मालवण प्रमाणे येथिल पर्यटन उद्योगास भूमीपुत्रांना प्रोत्साहन दयावे. उदा :- वसई विरार, पालघर, रायगड येथील जागेचा पर्यटकांसाठी विचार करावा.
7.मागिल दोन हजार वर्षापासूनचे गॅजेटचे पुरावे देशाचा सागरी व्यापार छत्रपती शिवरायांच्या आरमारातील सागरपुत्र , आगरी-कोळी , कराडी, भंडारी, ईस्टइंडियन यांचे व आदिवासी यांचे स्थान पाहता येथिल भूमीपुत्रांना सागरी व्यापार आणि नौदलांचे प्रशिक्षण देणारे विदयापीठ मुंबईत उभारावे.
8.समुद्रावरील पर्यटन , जलवाहतुक, व्यापार, सागरी पोलीस , नौदल यात भूमीपुत्रांना व्यवसाय आणि नोकरीमध्ये 30 टक्के आरक्षण दयावे.
9.मुंबईत मच्छिमार बांधवांसाठी भव्य कोळी भवन उभारावे
आदी मागण्यांचा निवेदनात समावेश आहे.
यावेळी मागण्यांच्या अनुषंगाने कोळी बांधवांना योग्य व जलद न्याय मिळवून देणार असल्याचे राज ठाकरे यांनी आश्वाशीत केले.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad