पत्री पुलाच्या भव्य गर्डरसाठी रेल्वे सुरक्षा आयुक्तांनी दिले ना हरकत प्रमाणपत्र


पत्री पुलाच्या ७०० मेट्रिक टन वजनाच्या भव्य गर्डरसाठी रेल्वे सुरक्षा आयुक्तांची एनओसी कल्याण
कल्याण पूर्व-पश्चिमेला जोडणारा आणि शिळ-कल्याण-भिवंडी रस्त्यावरील वाहतुकीसाठी महत्त्वाचा असलेल्या पत्री पुलाच्या तब्बल ७०० मेट्रिक टन वजनाच्या आणि ७६.६ मीटर लांब गर्डरच्या लाँचिंगसाठी रेल्वे सुरक्षा आयुक्तांनी विक्रमी वेळेत ना हरकत प्रमाणपत्र दिले असून या गर्डरच्या लॉंचिंगसाठी पुलाचे काम करणाऱ्या राईट्स कंपनीने मध्य रेल्वेकडे दोन दिवसांच्या मेगा ब्लॉकची मागणी केली आहे. 


लांबी ७६.० मी. व रुंदी १०.५ मी. इतकी भव्यता असलेल्या या गर्डरपैकी १ मीटरपर्यंत गर्डरच्या लॉंचिंगचे यशस्वी मॉक ड्रिल सोमवारी करण्यात आले. या प्रसंगी  मध्य रेल्वेचे विभागीय व्यवस्थापकतसेच कामाशी संबंधित अभियंते व अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. हैदराबाद येथील ग्लोबल स्टील कंपनी येथे या गर्डरचे काम करण्यात आले आहे  अशा कामासाठीच्या ना हरकत प्रमाणपत्रासाठी बराच मोठा कालावधी जातोपरंतु कामाचे महत्त्व ओळखून सुरक्षा आयुक्तांनी एका आठवड्याच्या आत ना हरकत प्रमाणपत्र दिल्यामुळे एक मोठा अडथळा दूर झाला आहे,  राईट्सने २१ आणि २२ नोव्हेंबर या दोन दिवशी प्रत्येकी ४ तासांच्या ब्लॉकची मागणी केली असून त्यासाठी देखील  मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांकडे खासदार श्रीकांत शिंदे पाठपुरावा करत असल्याची माहिती मिळत आहे.


 


डोंबिवलीतील सुतिकागृहाच्या जागी होणार
मल्टी स्पेशालिटी रुग्णालय आणि मॅटर्निटी होम


डोंबिवली
 डोम्बिवली येथील बंद अवस्थेतील सुतिकागृहाच्या पुनर्विकासासाठी सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर अखेर या सुतिकागृहाच्या जागी मल्टी स्पेशालिटी रुग्णालय आणि मॅटर्निटी होम पीपीपी तत्त्वावर विकसित करण्याचा सविस्तर प्रकल्प अहवाल सोमवारी कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत मंजूर करण्यात आला. यामुळे नागरिकांना अत्यल्प दारात दर्जेदार आरोग्यसुविधा मिळणार आहेत. जुन्या रुग्णालयाच्या जागी दोन नव्या इमारती उभ्या राहणार असून एका इमारतीत अद्यायवत मॅटर्निटी होमतर दुसऱ्या इमारतीत मल्टी स्पेशालिटी रुग्णालय असणार आहे. मॅटर्निटी होम संपूर्ण तयार स्थितीत महापालिकेकडे हस्तांतरित करण्यात येणार असून खासगी रुग्णालयाप्रमाणे सर्व अत्याधुनिक व दर्जेदार सुविधा येथे उपलब्ध असतील


कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीतील आरोग्यसेवा सक्षम करण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू असून अलीकडेच शास्त्रीनगर रुग्णालयात एक्स रेएमआरआय व पॅथॉलॉजी सेवा सुरू करण्यात आल्या आहेत.  डोंबिवली पूर्व येथील सुतिकागृह गेली अनेक वर्षे बंद अवस्थेत आहे. येथील इमारतही धोकादायक बनल्यामुळे या रुग्णालयाचा पुनर्विकास करावायासाठी गेली तीन वर्षे सातत्याने यासंदर्भात पत्रव्यवहार करून व अनेक बैठका घेऊन या पुनर्विकासाचा प्रश्न अखेर मार्गी लागला होता. पालकमंत्री एकनाथ शिंदेतत्कालीन व विद्यमान आयुक्ततसेच महापौर यांच्या पातळीवर केलेल्या पाठपुराव्यानंतर महापालिकेने पीपीपी तत्त्वावर पुनर्विकासाचा निर्णय घेतला होता. त्यानुसारनवीन रुग्णालयाचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यात येऊन सोमवारी तो सर्वसाधारण सभेत मंजुरीसाठी ठेवण्यात आला. सर्वसाधारण सभेने मंजुरीची मोहोर उमटवल्यामुळे आता पुनर्विकासाचा मार्ग मोकळा झाला आहे.


  

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 🙏दैनिक प्रजासत्ताक जनता नियमित वाचनासाठी

for latest updates...

Follow this link to join our WhatsApp group:

https://chat.whatsapp.com/Cf2s55RAfdQ0yVYSelRURA