Top Post Ad

यांच्या विषाने मरतो बहुजन सारा....


महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशातील एकूण सर्वच आघाडीच्या पक्षातून एका ठरावीक समाजाचे वर्चस्ववादी नेतृत्वच दिसून येते. ही वस्तुस्थिती आहे. प्रत्येक पक्षामध्ये बहुजनांचे नेतृत्व संपविण्याचे जणू कारस्थानच आखले आहे. ऐनकेन मार्गाने बहुजन नेतृत्व नेस्तनाबूत कसे होईल याकडेच सर्व प्रस्थापित पक्षांचा कल आहे.  बहुजन नेते जो पर्यंत प्रस्थापितांची तळी उचलतात तोपर्यंतच त्याचं नेतृत्व सर्वमान्य असतं. पण सामाजिक बांधिलकी स्विकारून प्रस्थापितांच्या ध्येय-धोरणाविरोधात जाऊन जेव्हा ते बहुजनवादी चेहरा दाखवतात तेव्हा मात्र त्यांना अलगद बाजूला केले जाते.  

2014 च्या विधानसभा निवडणुकांपूर्वी भाजपच सरकार आलं तर मुख्यमंत्रीपदासाठी तत्कालिन विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते विनोद तावडे आणि सभागृहनेते होते एकनाथ खडसे या दोघांतच स्पर्धा दिसत होती. मात्र या स्पर्धेतून दोघेही कधी बाद झाले ते त्यांनाही कळले नाही.  एकनाथ खडसे, पंकजा मुंडे, विनोद तावडे, प्रकाश मेहता ही प्रकरणे म्हणजे बहुजन नेतृत्व नेस्तनाबूत करणेच असे म्हटल्यास वावगे ठरू नये. सत्ता आल्यानंतर स्वाभाविकच या नेत्यांना पदाची स्वप्न दिसू लागली. मात्र सत्ता आणण्यासाठी यांचा वापर केला जातो आणि सत्ता आली की यांना कडीपत्त्याप्रमाणे बाहेर फेकले जाते हे कळतं पण अद्यापही वळत नाही अशी बहुजन नेत्यांची स्थिती आहे.

सत्ता आल्यानंतर काहीही झालं तरी मुख्यमंत्रीपदाच्या स्पर्धेत असण्रायांना जागा दाखविण्याचा निर्णय फडणवीस यांनी घेतलाच होता. त्यानुसार त्यांनी पावले टाकण्यास सुरुवात केली. त्यांनी सर्वात आधी खडसे यांचे विरोधक आणि जिह्यातील नेते गिरीश महाजन यांना महत्व दिलं. दुसरीकडे मराठा आरक्षण प्रश्नावर आधी विनोद तावडे लक्ष घालत होते, पण ही जबाबदारीही फडणवीस यांनी महाजन यांच्यावर सोपवली. पक्ष कोणताही असो, मुख्यमंत्रीपदाच्या स्पर्धेत असण्रायांना जागा दाखविण्याचे प्रकार घडलेले आहेत. देशभर राजकारणात अशी अनेक उदाहरणे सापडतील. तेव्हा फडणवीस मुख्यमंत्री होताच मुख्यमंत्रीपदाची आशा बाळगण्रायांचे पंख छाटणार हे स्वाभाविकचं होतं. त्यांनी आधी तावडे, पंकजा मुंडे यांच्याकडे महत्वाची खाती तर दिली पण नंतर एक एक खाते कमी करीत गेले.

पंकजा मुंडेची चिक्की घोटाळ्यात चौकशी लावली तर तावडे यांना त्यांच्या खात्यात फारसी संधीच ठेवली नाही. वर्षभरातच त्यांनी खडसे यांचा गेम केला. खडसे यांना थेट पाकिस्तानमधून दाऊदचा फोन आला होता, अशा बातम्या पेरण्यात आल्या. खडसे यांनी ताकद दाखविण्याचा प्रयत्न केला तर सरळ पोलीस कारवाई करण्याची तजवीज फडणवीस यांनी करुन ठेवली होती, त्यासाठी दाऊदच्या फोनचं प्रकरण चर्चेत ठेवण्यात आलं होतं. पोलीस खातं फडणवीस यांनी आपल्याकडे ठेवलं होतं. लाचलूचपत खात्याने खडसे यांच्याविरोधात दोन गुह्यांची नोंद केली, ही बाब फडणवीस यांच्या सहमतीशिवाय शक्य नव्हतीच. शिवाय फडणवीस यांचे पाठिराखे या नेत्यांच्याविरोधात कुजबूज मोहिमच चालवत होते. त्यासाठी फडणवीसांनी मिडीयाचाही पुरेपूर वापर केला. पुढे 2019च्या निवडणुकीत तर खडसे, तावडे यांचं तिकटीच कापण्यात आलं तर पंकजा मुंडे यांचा पराभव करण्dयाची योजना आधीच तयार होती. मुळात सत्तास्थानी कोणताही पक्ष असला तरी इथली एकंदरीत सर्वच व्यवस्था परंपरेने प्रस्थापित असलेल्या एक विशिष्ट वर्गाच्या हाती आहे. कोणाला कुठे बसवायचं आणि कुणाला कुठून बाजूला फेकायचे हे आधीच ठरलेले असते. मग त्या दिशेने हालचाली सुरु होतात. 

बहुजन नेतृत्व हा प्रकारच मुळात इथल्या प्रस्थापित व्यवस्थेला मान्य नाही. मग तो अंमलात येणं तर दूरची गोष्ट.  
ही परिस्थिती केवळ भाजपमध्येच नाही तर काँग्रेसमध्येही दिसून येते. सुशिलकुमार शिंदे यांना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावर किती काळ बसवण्यात आले हे आपण पाहिलंच आहे.  महाराष्ट्रात आजपर्यंत किती बहुजन मुख्यमंत्री झाले.  स्वातंत्र्यानंतर सर्व समावेशक राज्यघटना आपण स्वीकारली, सर्वांना समान अधिकार हे तत्व स्वीकारलं तरी प्रत्यक्षात मात्र आजही तथाकथित उच्च जातींचा पगडा राहिलेला आहे. राजकारण फक्त तथाकथित वरिष्ठ जातींची मत्तेदारी राहू नये, म्हणून सर्वसमावेशक  राजकीय संघटनांवर क्रांतिबा जोतिराव फुले, शाहू महाराज, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारख्या महापुरुषांनी भर दिला. यातून बहुजनवादी राजकारणाची सुरुवात झाली,  मात्र हा वारसा पुढे त्यांच्या अनुयायांनी चालविला नाही. वर्चस्ववादी चळवळ आणि त्यातून निर्माण झालेली राजकीय जागृती बहुजन नेत्यांना टिकवता आली नाही.

पुरोगामी भूमिका घेण्राया अनेक नेत्यांना काँग्रेसने आपल्या जाळ्यात ओढलं.  काही स्वत:च नादी लागले तर काहींना ऐन केन प्रकरणी यामध्ये समाविष्ट व्हावे लागले. काँग्रेसने बहुस्तरसत्ताक रणनिती अवलंबून बहुजन जातीच्या वरच्या घटकांना सत्तेत गौण वाटा देऊन अडकवलं, मागासवर्गीय महामंडळ किंवा समाज कल्याण खाते अशी पदे त्यांच्यासाठीच राखून ठेवण्यात आली. मात्र समाज कल्याण खाते हाताशी असूनही या नेत्यांनी समाजाचं काय भलं केलं हा स्वतंत्र अभ्यासाचा विषय आहे. स्वार्थानी बरबटलेल्या बहुजन नेत्यांनी प्रस्थापित वर्चस्वाला पर्याय उभा करण्याचा प्रयत्न कधीच केला नाही. पुरोगामी भूमिका घेणारे पक्ष भाजपच्या विरोधात राजकीय भूमिका घेतात पण ते प्रस्थापित वर्चस्ववादी विचारधारेच्या विरोधात संघर्षच करत नाहीत.

अल्पसंतुष्ट आणि स्वार्थाने बरबटलेले अनेक बहुजन हे नेहमीच प्रस्थापित वर्चस्ववादी पक्षांच्या नादी लागलेले आहेत. आर्थिक आणि राजकीय फायद्यासाठी स्वत:ची एखादी संघटना आणि राजकीय पक्षा काढायचा आणि तो या पक्षांचा मांडलिक करायचा ही नितीच बहुजनांना मारक ठरली आहे. ही मंडळी आंबेडकरी विचारधारेत वावरतांना दिसत असली तरी त्यांची सांस्कृतिक मुळं ही बुरसटलेल्या पारंपारिक आणि तत्सम विचारधारा असलेल्या पक्षात असल्याने या बहुजनांना पर्यायी राजकारण अद्यापही शक्य झालेलं नाही. याला अपवाद फक्त उत्तर भारतात कांशीराम यांनी केलेला यशस्वी प्रयोग. पण त्यांच्यानंतर तोही लयास गेला. महाराष्ट्रात तर हा प्रयोग होऊच शकला नाही, त्यामुळे प्रस्थापित वर्चस्वाला आव्हान देऊन नव्याने उभे राहण्याची ताकद सध्या कोणातच नाही अशीच परिस्थिती दिसत आहे.  

 - शेखर कांबळे , नवी मुंबई

-----------------------------

कोण नडले बहुजनांना?

कोण नडले  शिवरायांना..?  राज्याभिषेक करतांना सनातनी ब्राह्मण नडले.
गागाभट्ट ला 50 हजार होन देऊन तोंडघशी पाडले. ब्राह्मण करतात कावा हे नेहमीच 
ध्यानात ठेवा,  सांगून गेले जिजाऊंचे शिवा...!

कोण नडले छत्रपती संभाजी महाराजांना...?  अनाजी पंत सारखे सनातनी ब्राह्मण नडले .
शत्रू औरंगजेबाला महाराजांना पकडून दिले , बदल्यात मोगलाई ऐवजी मराठेशाही ला ब्राम्हणांच्या
पेशवाईत रूपांतरित केले .

जेव्हा मुघलांच्या काळात हिंदूंवर कर होता जिझिया तेव्हा ब्राह्मण म्हणाले आम्ही हिंदू नाही,
आम्ही तर विदेशी मुलुखाचे .आपण दोघे शासक आहोत.
येथील हिंदू आपले गुलाम आहेत. यांना नव्हता कर जिझिया कर .

कोण नडले तुकाराम महाराजांना ...? म्हाईम भट सारखे सनातनी ब्राह्मण  नडले .
इंद्रायणीत गाथा बुडवल्या . तुकारामांना ठार केले ,
पुरावा नष्ट करण्यासाठी एक बोभाटा केला - "तुकाराम सदेह वैकुंठाला गेले".

कोण नडले महात्मा फुलेंना ...? सनातनी ब्राम्हण नडले .
प्रत्येक पावलोपावली भिडले . शाळा बंद व्हावी म्हणून शाळेत
साप, विंचू, पालींना सोडले . फुले म्हणाले हे विश्वासपात्र नसतात ,लक्षात ठेवावे .

कोण नडले सावित्रीमाई यांना...?  सनातनी ब्राह्मण नडले .
स्त्रियांना शिक्षण मिळूच नये  म्हणून चिखल, शेण,दगड गोटे हाणले .
हे बहुजन -शिक्षण विरोधी असतात हे मनी असू द्यावे

कोण नडले स्वामी रामस्वामी पेरियार यांना...?  सनातनी ब्राह्मण नडले .
काशी येथे ब्राह्मण भोज पंक्तीतून हाकलून लावले . पेरियार म्हणाले यांच्या पेक्षा साप बरा ,
यांच्या विषाने मरतो बहुजन सारा .

कोण नडले शाहू महाराजांना...? एका शुल्लक सनातनी ब्राह्मण पुजाऱ्याने महाराजांना शुद्र म्हटले .
वेदोक्त प्रकरण गाजले  यांची मक्तेदारी नष्ट करा महाराज गर्जले .

कोण नडले डॉ.आंबेडकरांना...? सनातनी ब्राह्मण नडले .
जन्मापासून मरेपर्यंत, व मरणोत्तर ही नडले , 
शेवटी  बाबांनी सांगितले यांच्या हातून कोणतेही कार्य करू नका .
शिका,संघटित व्हा,संघर्ष करा . क्रांती, प्रतिक्रांतीचा इतिहास लक्षात ठेवा !

सर्व बहुजन महापुरुष यांचा इतिहास वाचा, यांना कोण नडले..?
आता कोण नडत आहेत ...? पुढे कोण नडतील हे आपल्या मुलांवर बिंबवत रहा...

आताचेच  उदाहरण तपासून पहा...

गोपीनाथ मुंडे, एकनाथ खडसे...हे सत्र पूर्वीपासून चालत आहे.
कारण बहुजन समाज अजूनही अंधश्रध्ये अंधश्रद्धेपोटी , 
दुध पाजून सापाला पाळत आहे .

सनातनी ब्राह्मण यांचे हत्यार, म्हणजे भ्रम, अंधश्रद्धा, भीती.
देवापेक्षा यांनी मोठी केली भीती . म्हणूनच गुलाम होतात बहुजन समाजाची माथी...!

म्हणून भयमुक्त व्हा,भटमुक्त  व्हा विज्ञानवादी व्हा,
भ्रममुक्त व्हा ब्राम्हणांच्या हातून कोणतेही कार्य करू नका ...
स्वतः चे मालक स्वतः व्हा .
एक वाक्य नेहमीच लक्षात राहू द्या 'जे होईल ते पाहिले जाईल'
तेव्हाच भीती, अंधश्रद्धा निघून जाईल .

मनिषा तुलसांडे  (नांदेड)

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com