विद्यापीठे व महाविद्यालये उघडण्यासाठी एसओपी जारी

सर्व संस्था प्रमुखांना वर्ग उघडण्यासाठी निर्णय घेण्याची परवानगीनवी दिल्ली
 देशात कोरोना महामारीमुळे लावलेले निर्बंध हळूहळू उठवण्यात येत आहेत. त्यानुसार टप्प्याटप्प्याने अनेक गोष्टी सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे. आता विद्यापीठे आणि महाविद्यालये पुन्हा सुरू करण्यासाठी युजीसीने सविस्तर मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. ज्यामध्ये केंद्राचे अनुदान मिळणाऱ्या उच्च शिक्षण संस्था उघडण्यासाठी प्रथम संस्थेच्या प्रमुखांनी तयारी असायला हवी. सर्व संस्था प्रमुखांना वर्ग उघडण्यासाठी निर्णय घेण्याची परवानगी आहे. सर्व उच्च शैक्षणिक संस्था राज्य व केंद्रशासित प्रदेशांच्या निर्णयानुसार वर्ग घेतील. इतर सर्व उच्च शिक्षण संस्था जसे की राज्य विद्यापीठे, खाजगी विद्यापीठे आणि महाविद्यालये यांना राज्य सरकारे आणि केंद्रशासित प्रदेशांनी निर्णय घेण्याचा अधिकार असेल. असे स्पष्ट करण्यात आले आहे.


सोशल डिस्टन्सिंग आणि मास्क वापरणे अनिवार्य असेल. विद्यापीठे आणि महाविद्यालये विविध प्रकारच्या सुरक्षात्मक उपायांचा वापर करून टप्प्याटप्प्याने कॅम्पस उघडण्याची योजना आखू शकतात. यात प्रशासकीय कार्यालये, संशोधन प्रयोगशाळा आणि ग्रंथालये इत्यादींचा समावेश असू शकतो.  संशोधनासाठी आवश्यक ती पावले उचलली गेली आहेत. विज्ञान-तंत्रज्ञान आणि संशोधनात पदव्युत्तर विद्यार्थी सामील होऊ शकतात. कारण संशोधन करणार्‍यांची संख्या तुलनात्मकदृष्ट्या कमी आहे. या संस्थांमध्ये सोशल डिस्टन्सिंग आणि प्रतिबंधात्मक उपाय सहजपणे लागू केले जाऊ शकतात. शिक्षण थेट रोजगाराशी संबंधित आहे, म्हणून अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक काम आणि प्लेसमेंटसाठी संस्थेच्या प्रमुखांच्या निर्णयानुसार प्रवेश घेण्याची परवानगी दिली जाऊ शकते. 


संस्थेत 50 टक्क्यांपेक्षा जास्त विद्यार्थीसंख्या असू नये. कोविड 19 चा प्रसार रोखण्यासाठी आवश्यक मार्गदर्शक तत्त्वे/प्रोटोकॉल पाळावेत. विज्ञान तंत्रज्ञान आणि संशोधन वगळता इतर सर्व कार्यक्रमांसाठी ऑनलाईन वर्ग सुरू राहतील. ऑनलाईन आणि दूरस्थ शिक्षणाला पूर्वीसारखी प्राधान्य देण्यात येणार असून यापुढे प्रोत्साहन दिले जाईल. पूर्वनिर्धारित वेळेत शिक्षकांशी सल्लामसलत करण्यासाठी विद्यार्थी संबंधित विभागांना भेट देऊ शकतात जेणेकरून गर्दी टाळता येईल आणि सोशल डिस्टन्सिंगचे निकष आणि सुरक्षितता प्रोटोकॉल पाळले जातील. जर विद्यार्थ्यांची इच्छा असेल तर ते घरी ऑनलाईन अभ्यास करू शकतात. अशा विद्यार्थ्यांच्या वाचनासाठी ऑनलाइन अभ्यास साहित्य आणि ई-संसाधने सुलभ करण्यासाठी संस्था प्रयत्न करेल.


आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांसाठी प्रवासी निर्बंधामुळे किंवा व्हिसा समस्येमुळे अभ्यासक्रमास येऊ न शकलेल्या विद्यार्थ्यांसाठी संस्थांची योजना असावी. अशा विद्यार्थ्यांसाठी पूर्ण ऑनलाईन शिक्षण झालं पाहिजे. सुरक्षा आणि आरोग्याच्या नियमांचे काटेकोरपणे पालन केल्यास मर्यादित संख्येने वसतिगृहे उघडली जाऊ शकतात. मात्र, खोल्यांमध्ये वसतिगृहांमध्ये एकापेक्षा जास्त विद्यार्थ्यांना राहण्याची परवानगी नाही. कोविड -19 ची लक्षणे असलेल्या विद्यार्थ्यांना कोणत्याही परिस्थितीत वसतिगृहात राहू दिले जाऊ नये. कोणताही शैक्षणिक परिसर पुन्हा सुरू करण्यापूर्वी संबंधित केंद्र किंवा राज्य सरकारने शैक्षणिक संस्था उघडण्यासाठी त्या क्षेत्राला सुरक्षित घोषित केले आहे की नाही याची काळजी घ्यावी. कोविड -19 च्या दृष्टिकोनातून केंद्र आणि राज्य सरकारने जारी केलेल्या सुरक्षा आणि आरोग्याशी संबंधित मार्गदर्शक तत्त्वे आणि आदेशांचे उच्च शिक्षण संस्थांनी पूर्ण पालन केले पाहिजे. असे महत्त्वपूर्ण निर्णय युजीसीने घेतले आहेत. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 🙏दैनिक प्रजासत्ताक जनता नियमित वाचनासाठी

for latest updates...

Follow this link to join our WhatsApp group:

https://chat.whatsapp.com/Cf2s55RAfdQ0yVYSelRURA