आरे कॉलोनी परिसरातील बेकायदेशीर लोजिंग व बोर्डिंगवर तात्काळ कारवाई करा- रिपाइं

बेकायदेशीर लोजिंग व बोर्डिंग तोडाव्यात, अन्यथा आंदोलन. - रिपाइंमुंबई
संबंध मुंबईला पिण्याचे पाणी पुरविणाऱ्या जलाशयाला धोका निर्माण होनार असल्याची भीती निर्माण झाली असल्याने आरे कॉलोनी परिसरातील बेकायदा बांधलेली लोजिंग बोर्डिंग तात्काळ तोडावी अन्यथा मा राज्यपाल भवणासमोर आमरण उपोषण करणार असल्याचे पत्र रिपाइं डेमोक्रॅटिक पक्षाच्या वतीने देण्यात आले आहे. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (डेमोक्रॅटिक) केंद्रीय महासचिव  डॉ राजन माकणीकर व राज्य महासचिव  श्रावण गायकवाड यांनी मा. राज्यपाल, मा. गृहमंत्री स्थानिक पोलीस ठाणे, व पोलीस तथा बृहन्मुंबई आयुक्त व स्थानिक उपायुक्त यांना दिलेल्या पत्रात नमूद केले आहे की, सबंध मुंबईला पिण्याचे पाणी पुरविणारे आरे परिसरात दोन तलाव आजूबासजूला असून याच परिसरात विनापरवाना ग्रीन झोनमध्ये काही लोजिंग बोर्डिंग बांधण्यात आले आहेत. या लोजिंग बोर्डिंगस ना कोणी परवाना दिला ? याचा तपास लावून संबंधीतांवर कायदेशीर कारवाई कारावू व "त्या" दोषी अधिकाऱ्यांचे निलंबन करावे, शिवाय अतिक्रमण झालेले असतानाही कानाडोळा करून अतिक्रमण ना तोडणार्या अधिकाऱ्यांनाही जाब विचारला जावा असे म्हंटले आहे.
 
या ठिकाणी कोणी संशयित सहज व सोप्या मार्गाने मुक्काम करून या जलाशयात विष ओतू शकतो किंवा जलाशय फोडू शकतो किंवा बॉम्ब ने उडवून देऊ शकतो या गोष्टीला नजरंदाज करणे म्हणजे गुन्हा व गुन्हेगाराला बळकटी देने होय. असाही अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. या अनाधिकृत बांधलेल्या लोजिंग बोर्डिंग्स मध्ये बरेच रूम्स आहेत. ज्यामध्ये अनैतिक धंदे होत आहेत. ही अनधिकृत लोजिंग बोर्डिंग 8 दिवसात नाही तोडल्यास उग्र आंदोलन उभे करू. या प्रकरणी मा. राज्यपाल भवन समोर आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा रिपाइं (डेमॉक्रॅटीक) ने दिला आङे.  या प्रकरणात आरे अधिकारी, पोलीस प्रशासन व एस वॉर्ड बृहसन्मुंबई विभागाचे अधिकारी दोषी असून त्यांचे वर कारवाई होणे अत्यंत गरजेचे आहे, अनधिकृत कारवाया ना रोखता कर्तव्यात कसूर केल्या प्रकरणी यांच्यावर कडक कारवाई करण्याचे महत्वाचे वाटते. असेही पँथर माकणीकर यांनी स्पष्ट केले.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 🙏दैनिक प्रजासत्ताक जनता नियमित वाचनासाठी

for latest updates...

Follow this link to join our WhatsApp group:

https://chat.whatsapp.com/Cf2s55RAfdQ0yVYSelRURA