रायगड किल्ला पर्यटकांसाठी खुला

रायगड किल्ला पर्यटकांसाठी खुलामहाड
महाड येथील सामाजिक कार्यकर्ते मनोज खांबे यांनी रायगड किल्ला पर्यटकांसाठी खुला करावा अन्यथा आमरण उपोषणाचा इशाराही दिला होता. त्यानंतर प्रशासनाने ही स्थळे खुली करण्याबाबत त्यांना आश्वासन दिले होते. याबाबत रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी रायगड जिल्ह्यातील सर्व पर्यटनस्थळं खुली करण्यात येत असल्याचे आदेश  काढले आहेत.  . दरम्यान, इथे येणाऱ्यांना सोशल डिस्टन्सिंग आणि मास्कचा वापर बंधनकारक असणार आहे. रायगड जिल्‍हयातील सर्व गडकिल्‍ले आणि पर्यटन स्‍थळे तसेच स्‍मारके खुली करण्‍यात आदेश रायगडच्‍या जिल्‍हाधिकारी यांनी काढले आहेत. मागील आठ महिन्‍यांपासून कोरोनाच्‍या प्रादुर्भावामुळे या सर्व ठिकाणी कोणालाही प्रवेश दिला जात नव्‍हता. ही ठिकाणे खुली करावीत अशी मागणी विविध संस्‍था, संघटना, दुर्गप्रेमींकडून केली जात होती. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad