संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकरी मोठ्या प्रमाणात अडचणीत - सचिन सावंत

संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकरी मोठ्या प्रमाणात अडचणीत - सचिन सावंतठाणे


आज संपूर्ण महाराष्ट्रातील 1 कोटी 36 लाख शेतकरी मोठ्या प्रमाणात अडचणीत आला असून या शेतकरी,कामगारांवर होत असलेला अन्याय काँग्रेस पक्ष म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात पोहोचविण्याचे काम आपण सर्वानी मिळून केले पाहिजे असे स्पष्ट प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी केले. ते ठाण्यातील काँग्रेस आढावा बैठकीत बोलत होते.   ठाणे शहर(जिल्हा)काँग्रेस कमिटीच्या पदाधिका-यांची आढावा बैठक नुकतीच वागळे इस्टेट येथील सेन्ट लाॅरेन्स स्कूल मध्ये पार पडली या बैठकीत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत,प्रदेश काँग्रेस उपाध्यक्ष सुभाष कानडे,प्रदेश काँग्रेस सरचिटणीस मनोज शिंदे,सुमन अग्रवाल,ठाणे जिल्हा प्रभारी तारिक फारूकी,प्रदेश सचिव  मेहूल व्होरा,के.वृषाली आदी मान्यवर उपस्थित होते. 


भारतातील संपूर्ण शेतकरी,कामगार, शोषितांचा आवाज पूर्ण देशभरात पोहोचवण्याचे काम काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून चालू असून काँग्रेस कार्यकर्त्यानी एक महत्त्वाची जबाबदारी म्हणून या कार्याकडे बघितले पाहिजे असे आवाहन यावेळी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव व कोकण विभागाचे प्रभारी बी.एम.संदिप यांनी केले. तर ठाणे काँग्रेस अध्यक्ष अँड.विक्रांत चव्हाण म्हणाले, संपूर्ण महाराष्ट्रातून सर्वाधिक स्वाक्षरी ठाण्यातील काँग्रेस पदाधिकारी संकलित करून आपणाकडे सूपूर्त करेल अशी ग्वाही दिली. महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष सुभाष कानडे,प्रदेश सरचिटणीस मनोज शिंदे यांनीही याप्रसंगी मार्गदर्शन केले.
               याप्रसंगी व्यासपिठावर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अँड विक्रांत चव्हाण,माजी जिल्हाध्यक्ष अनिल साळवी,माजी महापौर नईम खान, माजी गटनेते संजय घाडीगावकर,सेवादल काँग्रेस अध्यक्ष शेखर पाटील,महिला काँग्रेस अध्यक्षा शिल्पा सोनोने,प्रदेश सदस्य राम भोसले,प्रदिप राव,राजेश जाधव,सुखदेव घोलप,डाॅ.जे.बी.यादव,मोहन तिवारी,सन्नी थाॅमस,माधुरी शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.  बैठकीचे नियोजन स्थानिक ब्लाॅक काँग्रेस अध्यक्ष डाॅ.अभिजीत पांचाळ यांनी केले होते.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 🙏दैनिक प्रजासत्ताक जनता नियमित वाचनासाठी

for latest updates...

Follow this link to join our WhatsApp group:

https://chat.whatsapp.com/Cf2s55RAfdQ0yVYSelRURA