बीआरएसपीचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.सुरेश माने यांचा ठाणे दौरा, १८ ऑक्टोबरला ठाण्यात बैठक

बीआरएसपीचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.सुरेश माने यांचा ठाणे दौराठाणे
बहुजन रिपब्लिकन सोसालिस्ट पार्टीचे  राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.सुरेश माने ठाणे दौऱ्यावर येत असून यावेळी ठाणे, पालघर व रायगड जिल्यातील पक्ष संघटनेच्या कार्याचा आढावा घेणार आहेत,  १८ ऑक्टोबर रोजी ठाणे पूर्व येथील सिद्धार्थ नगर जुना कपडा मार्केट जवळील बुद्ध विहार सभागृहात दुपारी २ ते ५ या वेळेत सदर बैठक होणार आहे. तसेच यावेळी अनेक कार्यकर्ते बीआरएसपीमध्ये प्रवेश करणार असल्याचे पक्षाकडून सांगण्यात आले आहे. 


बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीला १० ऑक्टोबर २०२० रोजी पाच वर्षे पुर्ण झाली. मागील पाच वर्षात पक्षाने जे ध्येय अंगिकारले होते त्याच क्रमानुसार पक्षाची राजकीय, सामाजिक, कृतिशिल भूमिका राहिली आहे.  आजपर्यंत पक्षाने अनेक महत्वाच्या विषयावर आणि नागरिकांच्या मुलभूत समस्या निवारण्याकरिता आंदोलने केली. पक्षाच्या कार्याचा झंझावात तसाच तेवत ठेवून येणाऱ्या काळात राजकीय स्थितीत परिपूर्णतेने कार्यरत रहावे या उद्देशाने संपूर्ण महाराष्ट्रात डॉ.सुरेश माने यांचा झंझावात सुरु आहे. ठाणे जिल्ह्यासह पालघर रायगड जिल्ह्यातील कार्यकर्त्यांना पुढील काळात पक्षाच्या ध्येय धोरणाची माहिती करून देण्यासाठी सदर बैठक आयोजित करण्यात आली आहे.  या आढावा बैठकीस तिन्ही जिल्ह्यातील सर्व कार्यकर्त्यांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन पक्षाच्या वतीने करण्यात आले आहे. 


शेतकरी, शेतमजूर, कामगारांचे प्रश्न याचबरोबर आदीवासी  बांधवांचे पुनर्वसन, शैक्षणिक बेरोजगारांचे प्रश्नासोबतच गोरगरीब, दलित जनतेच्या प्रश्नांवर सातत्याने आंदोलने केली. याबाबत राज्यशासनासच नव्हे तर केंद्र शासनास देखील लेखी निवेदने पाठवून समस्या निवारण्याकडे लक्ष वेधण्याचे काम करण्यात आले. सत्तेच्या राजकारणात टिकून राहण्यासाठी निवडणुका लढवणे हे महत्वाचे असे. म्हणूनच लोकसभा, विधानसभा सह अगदी भंडाऱ्याची पोटनिवडणूक लढवून एक घटक पक्ष म्हणून मान्यता मिळवली. निवडणूक कशा प्रकारे लढवायची हा राजकारणाच्या रणनितीचा हा भाग असतो. घटक पक्ष म्हणून स्वत:च्या अजेंड्याशी , ध्येय धोरणांशी कोणत्याही प्रकारची तडजोड न करता आपले अस्तित्व अबाधित ठेवत जनतेच्या समस्या सोडविण्यास आजही सरकारला भाग पाडण्याचे प्रयत्न केले जात आहे. सदर बैठकीत याविषयी अधिक विस्तृतपणे कार्यकर्त्यांना डॉ.माने मार्गदर्शन करणार आहेत. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 🙏दैनिक प्रजासत्ताक जनता नियमित वाचनासाठी

for latest updates...

Follow this link to join our WhatsApp group:

https://chat.whatsapp.com/Cf2s55RAfdQ0yVYSelRURA