Top Post Ad

बौद्ध म्हणणाऱ्यांनी दोन्ही धर्म नासवले 

   बौद्ध म्हणणाऱ्यांनी दोन्ही धर्म नासवले .....  हे विधान काही लोकांना आश्चर्यकारक वाटेल , काहींना वाईट वाटेल , काहींना यात तथ्य आहे असे वाटेल . पण माझ्या मते हे वाक्य खरे आहे .बौद्धांनी दोन्ही धर्म नासवले .

 हिंदूमध्ये असणारा महार समाज ज्याने बौद्ध धम्म स्वीकारला नाही तो काही विशिष्ट प्रसंगी स्वतःला बौद्ध समजतो . मात्र सगळे व्यवहार हिंदू पद्धतीने करतो. या महारांमध्ये खोबरं मिळेल तिकडे चांगभले अशी यांची वृत्ती आहे . हे लोक हिंदूचे सगळे सण , उत्सव मोठया उत्साहात करतात . डॉ .बाबासाहेब आंबेडकरांची जयंती देखील मोठया उत्साहात करतात. यातील काही लोक आर.एस.एस , सनातन , विहिंप , ब्रम्हाकुमारी इ. हिंदूच्या संघटनांमध्ये अतिशय हिरीरीने भाग घेतात .यांच्या घरामध्ये डाॅ.बाबासाहेब  आणि बुद्धांबरोबर हिंदूचे सगळे देव असतात लग्नामध्ये हे लोक बौद्ध पद्धतीने लग्न करतात पण पण लग्न झाल्यानंतर अनेक हिंदू मंदिरांना भेटी देतात , गोंधळ घालतात , बकरी , कोंबडे कापतात एकंदरी हिंदू धर्माची नासाडी करतात. सगळ्यात महत्वाचे म्हणजे हा समाज बहिष्कृत आहे याचा अर्थ यानी हिंदू मंदिराच्या सावलीला पण जायचं नाही, नाही तर यांना पाप लागते म्हणजे ते हिंदूचे नियम पाळत नाहीत आणि बौध्द धम्माचे नियम पण नाहीत .

मुलगी बघायला गेल्यावर काही वेळा मुलग्याला बुद्धीष्ट मुलगी हवी असेल तर महार मुलीकडचे आम्ही बौद्ध आहोत असे सांगतात आणि मुलगा कमवता , गडगंज असेल तर कट्टर बौद्ध आहोत हे दाखवतात याच्या उलट मुलग्याचे आहे मुलगा महार असेल आणि मुलगी दिसायला चांगली, सुशील असेल आणि कट्टर बौद्ध असेल तर मुलाकडचे सांगतात की आम्ही बौध्द आहोत . हा खोटं बोलण्याचा खेळ फक्त चांगल्यासाठी की पैशासाठी हेच कळत नाही.

    कोकणात बौद्ध पध्दतीने आचरण करणारे लोक खूप आहेत आणि काही लोक तर खूपच प्रामाणिक आहेत . मात्र काही घरांमध्ये सगळं बौद्ध पद्धतीने चाललेलं असते आणि आतल्या कोणत्यातरी खोलीत पूर्वीचे कधीचे देव ठेवलेले असतात. तेच विदर्भात कोणतीतरी अम्मा घराघरात दिसते. मुंबई पुणे सारख्या शहरांबाबत न बोललेलच बरं. मुंबई पुण्यात डाॅ.बाबासाहेबांची चळवळ सांगतात आणि गावाकडे जत्रा यात्रा करण्यात पुढे असतात. गाडया वगैरे घेऊन यात्रेला येतात. यांना पंचशील त्रिशरण म्हणता येत नाहीत पण सगळ्यां देवांच्या आरत्या यांना तोंडपाठ असतात . सगळ्यात जास्त कहर म्हणजे पश्चिम महाराष्ट्रात झाला आहे . इथे सगळे सधन असल्यामुळे यांना धम्माचे काय घेणं देणं नाही . एका गावात महारांची ५० कुटुंबे असतील तर दोन किंवा तीन कुटुंबे प्रामाणिकपणे बौद्धपध्दतीने आचरण करणारी असतात.  त्यात  बाकीच्या कुटुंबानी यांना बहिष्कृत केलेले असते याचे कारण हे हिंदूचे देवदेवतांना मानत नाहीत आणि पूजाअर्चा करत नाहीत म्हणून हे बहिष्कृतांनी केलेले बहिष्कृत. त्यात गावकी करणारे महार , नवस बोलणारे , देवापुढे गऱ्हाणे घालणारे , महार पश्चिम महाराष्ट्रात मोठया प्रमाणात आढळून येतात .

   स्वतःला बौद्ध म्हणणारे देखील महाभाग पंचशील , त्रिसरण, पारमिता, वर्षावास पाळताना आढळून येत नाहीत. 22 प्रतिज्ञाचे आचरण कधीच करत नाहीत जे प्रामाणिक आहेत त्याचे अभिनंदन करुन मी पुन्हा म्हणतो की काही बौद्ध म्हणणाऱ्यांनी दोन्ही धर्मात मिलावट केली आहे . अर्थात दोन्ही धर्म नासवले.

 ---   बुद्ध धम्म संघ, सातारा !

         यावर उपाय काय?-   प्रत्येकाने आपआपला धम्म जाणुन घेवुन त्या त्या धम्माचे किवा धर्माचे पालन केले पाहिजे. हिंदू महार मानणार्‍यांनी आपले हिंदूचे सण, उस्तव, जत्रा उघडपणे साजर्‍या कराव्यात, उघडपणे गर्वाने आपण हिंदूच असल्याचे जाहीर करावे, सांगावे.  बौद्ध,नवबौद्ध म्हणणार्‍यांनी  उघडपणे बौद्ध कालगणना, बौद्ध उस्तव-  पौर्णिमा, डाॅ.आंबेडकर जयंती, तिसरण, पंचशील, अष्टशील, दस पारमिता जाणुन घ्याव्यात त्यानुसार आचरण करावे.'उपोसथ, वर्षावास, पुण्यानुमोदन, वाढदिन, गृहप्रवेश,इ. चालीरीतींचे पालन करावे.'  यासाठी बौद्धांनी आपल्या भिक्खुसंघाचे, बौद्धाचार्य, धम्ममित्र, उपासक वर्ग यांचे मार्गदर्शन घ्यावे मात्र हे करताना अगोदर या मार्गदर्शकां कडुन धम्माचे पालन होते का नाही याचे अत्यावश्यक निरीक्षण करावे. अंधानुकरण करु नये.. 
कारण
 बौद्ध म्हणजे ज्ञानी लोक.
बौद्ध म्हणजे विज्ञानवादी लोक..
बौद्ध म्हणजे अनुसरणीय लोक...


" चलो बुद्ध की ओर...! "

अरुणा नारायण (अहमदनगर)
----------------------------------------------------------------------------------------               

प्रतिक्रिया..............

प्रभाकर जाधव (ठाणे)

बौद्ध म्हणणाऱ्यांनी नव्हे, बौद्ध माझी जात, धर्म आहे असे सांगणाऱ्यांनी, दोन्ही धर्म नासावले असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. याचं एकमेव कारण बौद्ध धम्मा मध्ये भगवान बुद्धाच्या शिकवणीप्रमाणे समजून शिकवुन प्रेमाने घडवण्याचा जो समजूतदारपणा आहे. त्याचा घेतलेला हा गैरफायदा आहे. त्या संपूर्ण महार जातीला मुस्लिम धर्म दिला असता तर,  मुळ मुस्लिमांनी  धर्मांतरित  महार मुस्लिमांनी धर्माच्या विरुद्ध काही  धार्मिक उचापती केल्या असत्या तर उध्वस्त केलं असतं. आणि आपण तर याबाबतचे   भाष्यही केलेच नसते. पूर्णतया आपमतलबीपणा ज्या महारांमध्ये आढळतो ते दुर्दैवचं म्हणावे लागेल. मात्र एकीकडे महार व बौद्धांमध्ये देखील असलेले महार. यांच्यापाशी निखळ बौद्ध धम्माचे  आचरण असायला हवे. न की इतर धर्मीयांचे. हे चित्र कदापि न सहन होणारे आहे. परंतु दुसरीकडे बौद्ध धर्माचे आचरण आणि बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्यामध्ये अनेक बांधव कार्यरत आहेत. त्यांच्या कार्याचा लवकरात लवकर प्रभाव निश्चितच दिसून येईल हा आशावाद  प्रत्येक बौद्ध धम्मीयांस असावयास हवा. संपूर्ण भारत बौद्धमय होण्याच्या प्रक्रियेमध्ये संपूर्ण भारतामध्ये. बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार होत आहे. सध्याच्या परिस्थितीमध्ये लोक बौद्ध  धम्माच्या विचाराकडे आकर्षित होत आहेत.टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com