Top Post Ad

शेतकरी व कामगार विरोधी विघेयक विरोधात काँग्रेसचे धरणे आंदोलन

किसान-मजदूर बचाव दिवस
शेतकरी व कामगार विरोधी विघेयक विरोधात काँग्रेसचे धरणे आंदोलन



       ठाणे;भारतीय जनता पक्षाच्या केंद्र सरकारने शेतकरी विरोधी तीन विधेयके संसदेत मंजूर करून घेतलीत तसेच काँग्रेस सरकारच्या कारकिर्दीत कामगारांना सुरक्षा देण्याकामी घैतलेला निर्णय बदलण्याची तयारी चालु केली आहे या विरोधात अ.भा.काॅग्रेस कमिटी व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या वतीने देशभरात 2 ऑक्टोबर रोजी "कीसान मजदूर बचाव दिवस"पाळण्यात आला. ठाणे शहर(जिल्हा)काँग्रेस कमिटीच्या वतीने दि. 2 ऑक्टोबर रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लालबहाद्दूर शास्त्री यांच्या जयंती दिनानिमित्त ठाणे काँग्रेस जिल्हाध्यक्ष अँड विक्रांत चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली तलावपाळी येथील महात्मा गांधी उद्यानात या दोन्ही महान नेत्यांना अभिवादन करून कीसान मजदूर बचाव दिवस पाळण्यात येउन याच ठीकाणी धरने आंदोलन करण्यात आले या आंदोलनात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सरचिटणीस व ठाणे जिल्हा प्रभारी राजेश शर्मा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी ओ.बी.सी विभागाचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश पाटीलखेडे  यांनी उपस्थिती लावली होती. अतिशय शिस्तीत हे आंदोलन करण्यात आले याप्रसंगी विविध पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


केंद्र सरकारने आणलेल्या कृषी कायदे रद्द करावेत या मागणीसाठी काँग्रेस पक्षाने राज्यव्यापी आंदोलनाची सुरुवात केली आहे. या आंदोलनाचा भाग म्हणून आज राज्यभरात किसान मजदूर बचाओ दिवस पाळण्यात आला.  राज्याच्या सर्व जिल्हा व तालुका मुख्यालयी काँग्रेस पक्षाच्या वतीने आंदोलने करण्यात आली. केंद्र सरकारने आणलेले शेतकरी व कामगार विरोधी कायदे रद्द करावेत या मागणीसाठी काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली आहे. महात्मा गांधी जयंती व माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री जयंतीचे निमित्त साधून काँग्रेसने राज्यभरात किसान मजदूर बचाओ दिन' पाळलाव आंदोलन केले. हे कायदे आणून शेतकरी व कामगारांना उद्योगपतींचे गुलाम बनवण्याचा डाव आहे. कृषी कायदयाविरोधातील कॉयसचे जनआंदोलन हा नव स्वातंत्र्य लढाच असल्याचे प्रदेशाध्यक्ष व महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे.


थोरात यांच्या नेतृत्वाखाली लासलगाव जि. नाशिक येथे धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी थोरात म्हणाले की, शेतकरी, कामगार विरोधी कायदे तातडीने रद्द करावे या मागणीसाठी काँग्रेस पक्ष दोन कोटी शेतकऱ्यांच्या सह्या घेऊन काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या मार्फत राष्ट्रपतींना निवेदन देणार आहे. महाराष्ट्रातील या मोहिमेचा शुभारंभ लासलगाव येथे आयोजित धरणे आंदोलन कार्यक्रमात करण्यात आला. राज्यातील प्रत्येक तालुक्यात काँग्रेस कार्यकर्ते शेतकऱ्यांच्या हितासाठी आवाज बुलंद करत आहेत. राज्यभर धरणे आंदोलन करण्यात आले आहे. ही संघर्षाची सुरुवात आहे, शेतकरी हितासाठी आम्ही अखंड कार्यरत राह. मोठ्या संघर्षातून आणि प्रयत्नांतून बाजार समिती आणि हमीभाव ही व्यवस्था उभी राहिली. जुलमी कृषी कायद्यामुळे भाजप सरकार ही शेतकरी हिताची व्यवस्था मोडीत काढत आहे. कंत्राटी शेतीच्या माध्यमातून शेतक-यांना भूमिहीन करून उद्योगपतींचा फायदा करण्याचा भाजप सरकारचा डाव आहे असे थोरात म्हणाले.


 नांदेडमध्ये सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली बैलगाडी लॉग मार्च काढण्यात आला. यावेळी बोलताना अशोक चव्हाण म्हणाले की, केंद्रातील सरकार, हम करोसे कायदा, आम्हाला वाटेल ते नियम करु अशा हुकुमशाही प्रवृत्तीतून त्यानी लोकसभा व राज्यसभेत हे कायदे मंजूर केले आहेत.अशा कायद्याच्या माध्यमातून देशाची लुट करायचे काम सहा वर्षापासून सुरु आहे. ब्रिटिश काळात ईस्ट इंडिया कंपनीने देशाला लुटले तशाच पद्धतीने आता भाजपाच्या रुपाने व्यापारी देशाला लुटत आहेत.


मुंबईतील आंदोलनात मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष मा.खा.एकनाथ गायकवाड, आमदार भाई जगताप यांच्यासह शेकडो पदाधिकाऱ्यांनी भाग घेतला. गुजरातचे प्रभारी खा.राजीव सातव यांनी हिंगोली मध्ये तर अमरावती येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथे महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन करण्यात येणार आले. पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री सुनिल केदार नंदूरबार येथे आदिवासी विकास मंत्री के. सी. पाडवी तर मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी चंद्रपूर येथे काळ्या कायद्याविरोधात आंदोलन केले. गृहराज्यमंत्री सतेज ऊर्फ बंटी पाटील यांनी कोल्हापूर येथे तर कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांच्या नेतृत्वाखाली सांगली मार्केट यार्ड येथे आंदोलन करण्यात आले.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com