फोर्टिस नेटवर्कचा भाग असलेल्या वाशीच्या
हिरानंदानी हॉस्पिटलमधील सर्जन्सनी पार पाडलेल्या शस्त्रक्रियांमुळे
डंपरच्या धडकेत जखमी झालेल्या 42 वर्षीय व्यक्तीला मिळाले जीवनदान
रुग्णाच्या हॉस्पिटलमधील 2 महिन्यांच्या वास्तव्यादरम्यान
रुग्णाला कोव्हिड-19 च्या संसर्गापासून सुरक्षित ठेवण्यामध्येही टीमला यश
नवी मुंबई
कळवा येथे राहणारे 42 वर्षीय रविंद्र गोसावी 14 जूनच्या रात्री आपल्या एका मित्रासोबत मोटारबाइकवरून घरी परतत होते. दुर्दैवाने, भिवंडी महामार्गावर त्यांच्या बाइकला एका कच-याच्या ट्रकची धडक बसली आणि तो ट्रक गोसावी यांच्या शरीराच्या खालच्या भागावरून गेला. या अपघातात गोसावी गंभीर जखमी झाले. आजूबाजूच्या गाड्यांतील लोक आणि पादचा-यांनी त्यांच्या कुटुंबियांना फोन करून झाला प्रकार कळवला. कुटुंबियांनी ताबडतोब घटनास्थळी धाव घेतली व गोसावी यांना एका स्थानिक हॉस्पिटलमध्ये नेले. त्यांची स्थिती गंभीर असल्याने व प्रचंड रक्त वाहून गेल्याने दोन हॉस्पिटल्सनी त्यांना दुसरीकडे घेऊन जाण्याची विनंती केली, त्यामुळे त्यांना भिवंडीवरून नवी मुंबईतील वाशी इथे घेऊन जावे लागले व तिथे त्यांना फोर्टिस हॉस्पिटल्सच्या नेटवर्कचा भाग असलेल्या वाशीच्या हिरानंदानी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.
हॉस्पिटलच्या आपत्कालीन विभागामध्ये दाखल करतेवेळी रुग्णाची प्राणांशी झुंज सुरू होती आणि स्थिती अतिशय गंभीर होती. इमर्जन्सी आणि ट्रॉमा तज्ज्ञांनी वेळ न दवडता प्रकरण हातात घेतले व रुग्णाच्या परिस्थितीची तपासणी केली; रुग्णाच्या हृदयाचे ठोके क्षीण होते व रक्तदाबही नोंदवला जात नव्हता, प्रचंड रक्त वाहून गेले होते व रुग्ण हायपोव्होलेमिक शॉकच्या स्थितीमध्ये गेल्याचे दिसत होते (वेगाने रक्तस्त्राव झाल्याने निर्माण होणारी प्राणघातक स्थिती) टीमने तत्काळ 5 पाइंट्स रक्त रुग्णाच्या शरीरात चढवले व आधी त्यांची प्रकृती स्थिर केली; यानंतर त्यांना कन्सल्टन्ट जॉइंट रिप्लेसमेंट सर्जन डॉ. मनीष सोनटक्के यांच्या देखरेखीखाली हलविण्यात आले व त्यांनी ही परिस्थिती हातात घेतली.
अपघातामध्ये जोरदार धडक बसल्याने रुग्णाच्या डाव्या मांडीच्या हाडांचा चुरा झाल्याचे तसेच तिथली संपूर्ण त्वचा निघून गेल्याचे व नितंबाच्या दोन्ही भागांचे अंतर्गत डिग्लव्हिंग झाल्याचे आढळून आले; डिग्लव्हिंग म्हणजे अशी दुखापत ज्यात त्वचेचे वरचे थर आणि उती त्याखालील स्नायू, जोडणारे टिश्यूज किंवा हाडांपासून फाटून विलग होणे. पेल्व्हिस, जांघेच्या हाडाचे उजवे सॉकेट आणि डाव्या मांडीला अनेक फ्रॅक्चर्स झाल्याचेही स्पष्ट झाले. रुग्णाचे युरीथ्रँड रेक्टमही प्रचंड प्रमाणात चिरडले गेले होते. डॉ. सोनटक्के यांनी एमसीएच प्लास्टिक सर्जन डॉ. औदुंबर यांच्याशी सल्लामसलत करून उपचारप्रक्रियेची आखणी केली.
प्रथम रुग्णांच्या जखमांवर उपचार करण्याचा निर्णय घेण्यात आला; त्यासाठी डिब्रिजमेंट उपचारांच्या माध्यमातून क्षतीग्रस्त टिश्यूज काढून टाकण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली व व्हॅक्युम असिस्टेड क्लोजर (VAC) च्या माध्यमातून ड्रेसिंग करण्यात आले. यावेळी शरीरातून बाहेर पडलेला अतिरिक्त स्त्राव काढून टाकण्यासाठी आणि गंभीर जखमा पुन्हा भरून निघण्यास मदत मिळावी यासाठी सक्शन पंप, ट्युबिंग आणि ड्रेसिंगचा वापर करत उपचारात्मक प्रक्रियेचा अवलंब करण्यात आला. या संपूर्ण प्रक्रियेदरम्यान रुग्णाच्या डाव्या मांडीवर त्वचेचे पुनर्रोपण करण्याआधी 9 वेळा VAC ड्रेसिंग करण्यात आले, त्याचबरोबर 15 पाइंट्स रक्त चढविण्यात आले. सर्जरीनंतर रुग्णाच्या जखमा भरून येऊ लागल्या; तसे डॉक्टरांनी फ्रॅक्चर्स दुरुस्त करण्याच्या दिशेने काम सुरू केले. टीमने रुग्णाच्या मूत्रमार्गामध्ये नळी टाकून मूत्र बाहेर काढण्याची प्रक्रिया सुरू केली. उपचार आणि पुनर्वसनासाठीच्या प्रयत्नांनंतर जवळ-जवळ दोन महिन्यांनी रुग्णाला आता आधाराशिवाय चालता येऊ लागले असून ते आता घरी परतण्यासाठी सज्ज आहेत.
या काळात डॉक्टरांसमोर आणखी एक आव्हान होते ते रुग्णाला कोव्हिड-19 च्या संसर्गापासून दूर ठेवण्याचे. मात्र सुरक्षिततेच्या नियमावलींचे पालन, नियमित देखरेख यांच्या माध्यमातून हॉस्पिटलच्या वैद्यकीय पथकाने हे साध्य करण्यात यश मिळवले.
रुग्णाविषयी बोलताना कन्सल्टन्ट जॉइंट रिप्लेसमेंट सर्जन डॉ. मनीष सोनटक्के म्हणाले, ''दोन महिने आमच्या देखरेखीखाली राहिल्यानंतर श्री. गोसावी आता घरी जाऊ शकतील या गोष्टीचा मला आनंद आहे. अशा प्रकारच्या पॉली-ट्रॉमा रुग्णांच्या बाबतीत जेव्हा शरीराच्या विविध कार्यसंस्थांची हानी झालेली असते तेव्हा आम्ही आधी रुग्णाचा जीव वाचविण्याला प्राधान्य देतो व त्यानंतर अवयव वाचविण्याचा प्रयत्न करतो, मात्र यावेळी अतिशय निग्रहपूर्वक केलेले जखमांचे व्यवस्थापन आणि खुद्द रुग्णाने दाखविलेली जिद्द यांच्या बळावर आम्हाला दोन्ही गोष्टी वाचविता आल्या. रुग्णाने शस्त्रक्रियेला तसेच त्यानंतरच्या पुनर्वसनात्मक उपचारांना चांगला प्रतिसाद दिला, मात्र अजूनही स्नायूंना बळकटी आणण्यासाठी तसेच चाल पूर्ववत होण्यासाठी त्यांना घरच्या घरी किमान एक महिन्यासाठी बरीच फिजिओथेरपी घ्यावी लागणार आहे. या परीक्षेच्या काळामध्ये रुग्णाच्या पत्नीने दिलेल्या पाठिंब्याबद्दल आम्ही त्यांचे अत्यंत आभारी आहोत.''
आपल्याला मिळालेल्या उपचारांबद्दल बोलताना रुग्ण रविंद्र गोसावी म्हणाले, ''मला वाशी येथील फोर्टिस हॉस्पिटलमध्ये आणले गेले आपण उद्याचा दिवस पाहू याचीही आशा मी सोडून दिली होती. पण आता, दोन महिन्यांनंतर मी आपल्या पायांवर घरी परतणार आहे. माझे प्राण वाचविणा-या डॉक्टर्स आणि नर्सेसप्रती मी आणि माझे कुटुंब अतिशय कृतज्ञ आहोत. कोव्हिड-19 च्या संसर्गाचीही मला प्रचंड भीती वाटत होती, पण त्यापासूनही मला सुरक्षित ठेवल्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे.'' ते पुढे म्हणाले, ''या अपघातामध्ये मी माझ्या मित्राला गमावले, त्यांच्या कुटुंबियांच्या दु:खात मी सहभागी आहे.''
रविंद्र आज पुन्हा आपल्या पायावर उभे आहोत. इथवरच्या प्रवासाबद्दल बोलताना डॉ. मनिष सोनटक्के पुढे म्हणाले, ''फ्रॅक्चर आणि जखमा ब-या होण्याच्या बाबतीत रुग्णाची कशाप्रकारे प्रगती होत आहे हे तपासण्यासाठी दर 10 दिवसांनी फॉलो-अप घेणे अनिवार्य असणार आहे. दोन महिन्यानंतर मूत्रमार्गाच्या भागात झालेली दुखापत दुरुस्त करण्यासाठी श्री. गोसावी यांच्यावर आणखी एक शस्त्रक्रिया केली जाणार आहे. मात्र वेळच्यावेळी उपचार मिळाल्याने कोणतेही कायमस्वरूपी अपंगत्व न येता एक चांगले आयुष्य व्यतीत करणे त्यांना शक्य होणार आहे.''
0 टिप्पण्या