मीरा भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयाचे लोकार्पण
गुन्हेगारांवर वचक, जनतेत आदरयुक्त भीती राहील असा विश्वास- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
ठाणे
सर्वसामान्य निर्दोष जनतेला पोलिसांची आदरयुक्त भीती आणि गुन्हेगारांना दहशत असे वातावरण पोलिसांनी तयार करून जनतेला दिलासा मिळवून द्यावा. तसेच पोलिसांचा वचक निर्माण करा. सागरी सुरक्षेबरोबरच कायदा व सुव्यवस्था अबाधित राखुन आदर्श , सुरक्षित व गतिमान अशी मीरा भाईंदर वसई विरार आयुक्तालयाची ओळख निर्माण करावी असे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मीरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयाचे ई उद्घाटन झाले. यावेळी ते बोलत होते. या ऑनलाईन सोहळ्यास उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री अनिल देशमुख, पालघर पालकमंत्री दादाजी भुसे, गृह (शहर) राज्यमंत्री, सतेज पाटील, गृह (ग्रामीण) राज्यमंत्री शंभुराजे देसाई, अपर मुख्य सचिव गृहे सीताराम कुंटे, पोलीस महासंचालक, सुबोधकुमार जायसवाल, मीरा भाईंदर वसई-विरार पोलीस आयुक्त सदानंद दाते यांसह ठाणे पालघर जिल्ह्यातील खासदार, आमदार , लोकप्रतिनिधी यांसह पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी मार्गदर्शन करतांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले बरेच दिवसापासुन आयुक्तालयाची मागणी होती.शहरांच्या कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने अत्यावश्यक बाब होती. या शहरांची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढते आहे. येथील स्थानिक जनतेच्या मनात पोलिसांविषयी मित्रत्वाची भावना निर्माण करतांनाच पोलिसांबद्दलचा निर्माण करा. वाईट कृत्य करतांना पोलिसांचे आपल्यावर लक्ष ठेऊन आहेत ही भिती प्रत्येकाला वाटली पाहिजे. जनतेचे रक्षण हे पोलिसांचे प्रथम कर्तव्य आहे. केवळ कर्तव्य म्हणून नव्हे तर एक माणुस म्हणून पोलिसांकडे बघितले जावे. कोरोना काळात त्यांच्या आरोग्याची तसेच कुटुंबियांची काळजी घेण्यात यावी असेही उद्धव ठाकरे यांनी सांगितले. पोलिस आयुक्त म्हणून सदानंद दाते सारख्या सक्षम व जिगरबाज अधिकारी देण्यात आला आहे ते निश्चितच आदर्श कार्य करतील असा विश्वासही मुख्यमंत्री यांनी व्यक्त केला.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले की, कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टिने हे पोलिस आयुक्तालय आवश्यक होते.येथे नेमणूक देतांना स्थानिक कर्मचाऱ्यांना प्राधान्य देण्यात यावे. यामुळे त्यांच्या मानात सुरक्षितेची भावना निमार्ण होईल.मुंबई,पालघर,ठाणे या जिल्ह्यांशी समन्वय ठेवून काम करावे लागणार आहे. तसेच सागरी सुरक्षेला गांभीर्याने घेऊन काम करावे अशा सुचना त्यांनी केल्या.या आयुक्तालयासाठी आवश्यक तो निधी उपलब्ध करुन देण्यात येईल.असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.
कोरोना काळात पोलीस अधिकाऱ्यांच्या मृत्यू झाला आहे.त्याच्या कुटुंबियांना मदत करण्याच्या दृष्टिने योग्य तो निर्णय घेण्याबाबत गृहमंत्री यांना सुचना केली.सामाजिक बांधिलकी म्हणुन पोलीस खुप चांगले काम केले आहे. या सर्व बांधवाचा राज्याला अभिमान आहे.पोलीस बांधवाच्या कुटुंबियांचे योगदान अमुल्य आहे.असेही अजित पवार यांनी सांगितले. कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आयुक्तालयाचा उपयोग होईल असा विश्वास श्री.पवार यांनी व्यक्त केला
गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितले की, कायदा व सुव्यवस्था तसेच सागरी सुरक्षाच्या दृष्टिने हे आयुक्तालय महत्वाचे आहे.आयुक्त सदानंद दाते यांच्या नेतृत्वाखाली आयुक्तालय निश्चित चांगली कामगिरी करण्यात येईल.पुरेसा निधी साधनसामुग्री,मनुष्यबळ, लवकरात लवकर उपलबध करुन देण्यात येईल अतिशय सक्षमपणे आयुक्तालयाचे कामकाज सुरु केले जाईल.अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
वसई विरार व मिरा भाईंदर शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी या आयुक्तालयाने मदत होईल असा विश्वास पालघरचे पालकमंत्री तथा कृषीमंत्री दादा भुसे यांनी व्यक्त केला.
मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये मोठ्या प्रमाणावर सागरी सुरक्षेला प्राधान्य पुढील कामाची दिशा ठरवावी लागणार आहे.आगामी काळात आयुक्तालय सक्षम करण्यावर निश्चित भर देण्यात येईल अशी ग्वाही गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी दिली.
पोलिस महासंचालक सुबोध जायसवाल यांनी प्रास्तविक केले. आभार प्रदर्शन करतांना पोलिस आयुक्त सदानंद दाते यांनी आयुक्तालय गतिमान संवेदनशील कर्तव्यनिष्ठ पध्दतीने काम करेल अशी ग्वाही दिली.
पोलिस आयुक्तालयाविषयी
सदर पोलीस आयुक्तालयात मीरा-भाईंदरमधील ६ आणि वसई- विरार मधील ७ अशी एकूण १३ पोलीस ठाणी आहेत. याशिवाय मीरा-भाईंदरमध्ये खारीगाव आणि काशिगाव अशी २ तर वसई- विरारमध्ये पेल्हार, आचोळे, मांडवी, बोळिंज व नायगाव अशी ५ नवीन पोलीस ठाणी होणार आहेत. आयुक्तालयात ५ डीसीपी असणार आहेत. तर मीरा-भाईंदरमध्ये १ व वसई-विरारमध्ये २ झोन केले जाणार आहेत.
0 टिप्पण्या