Trending

6/recent/ticker-posts

एमपीएससीची परीक्षेसाठी कोणताही विद्यार्थी अपात्र ठरणार नाही- मुख्यमंत्री

एमपीएससीची परीक्षेसाठी कोणताही विद्यार्थी अपात्र ठरणार नाही-  मुख्यमंत्रीमुंबई
एमपीएससीची परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी राज्यात जोर धरू लागली होती. अखेर महाआघाडी सरकारने एमपीएससी परीक्षा पुढे ढकलण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेऊन ही घोषणा केली आहे. या निर्णयानंतर मराठा समाजातील विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. दरम्यान, रविवारी होणारी परीक्षा पुढे ढकलण्यात आली असून, कोणताही विद्यार्थी अपात्र ठरणार नसल्याचेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. यापूर्वी कोविड-१९ महामारीच्या पार्श्वभूमीवर ही परीक्षा लांबणीवर टाकण्यात आली होती. त्यानंतर ११ ऑक्टोबर रोजी ही परीक्षा आयोजित करण्यात आली होती. ती आता पुन्हा पुढे ढकलण्यात आली आहे. खासदार उदयन भोसले यांनीही एक फेसबुक पोस्ट लिहून ‘एमपीएससी’ची परीक्षा पुढे ढकलावी असे म्हटले होते. मराठा समाजातील विद्यार्थ्यांच्या हितासाठी ही परीक्षा पुढे ढकलावी अशी मागणी संभाजीराजेंनीही केली होती.  अखेर राज्य सरकारने ११ ऑक्टोबरला होणारी परीक्षा पुढे ढकलली आहे. राज्यातील २ लाखांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांसाठी ही महत्त्वाची बातमी आहे.


यावेळी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, '11 ऑक्टोबर रोजी महाराष्ट्रात एमपीएसची परीक्षा होती. पण, कोरोनाचे संकट अजूनही काही प्रमाणात आहे. त्यामुळे आम्ही एक सारासार विचार केला. विद्यार्थ्यांना अभ्यासाला वेळ मिळाला पाहिजे हा विचार आम्ही केला त्यामुळे आम्ही ही परीक्षा पुढे ढकलत आहोत. परीक्षा कधी होणार याचा निर्णयही लवकरच घेतला जाईल,' असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केले. 'एमपीएसच्या परीक्षेची तारीख सध्या आम्ही पुढे ढकलली आहे. पण, यापुढे जी तारीख ठरेल त्या तारखेत बदल केला जाणार नाही. मराठा समाजाकडूनही आम्हाला परीक्षा पुढे ढकला अशी विनंती केली होती. आता जे विद्यार्थी परीक्षेला पात्र आहेत तेच विद्यार्थी जेव्हा परीक्षा जाहीर होईल तेव्हा त्या परीक्षेसाठी अपात्र ठरणार नाही,' असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.


राज्य सरकारच्या प्रमुख नेत्यांची बैठक शुक्रवारी पार पडली. या बैठकीत विद्यार्थ्यांच्या दृष्टीने हा निर्णय झाला. ११ ऑक्टोबर रोजी महाराष्ट्रात ‘एमपीएससी’ची पूर्व परीक्षा होती. मात्र कोरोना आणि लॉकडाऊनचे संकट होते. काही प्रमाणात अजूनही आहे. त्यामुळे आम्ही एक सारासार विचार केला. विद्यार्थ्यांना अभ्यासाला मिळाला पाहिजे हा विचार आम्ही केला त्यामुळे आम्ही ही परीक्षा पुढे ढकलत आहोत. परीक्षा कधी होणार याचा निर्णयही लवकरच घेतला जाईल, असेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी जाहीर केले.


 


 

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या