धर्मवीर आनंद दिघे ... म्हणूनच आजही प्रत्येकाला आठवतात
कित्येक वर्षांपूर्वी अनेकांना जीवनाचा आनंद दिसला गवसला बऱ्याच जणांच्या हातातील शस्त्र गळली माझ्या सारखे अनेक हळूहळू नव्हे तर तात्काळ भक्त झाले, भक्ता प्रमाणे भक्ती केली, पूजा केली, रोज स्मरण केलं, आजही करताहेत ते जावून दीड तप उलटूनही, त्यां योगीपुरूषा बद्दल नवरात्री निमित्ताने काही शब्द....
माझा देव सुध्दा दाढीवाला होता तो १६ तास नव्हे २० तास लोकसेवेत व्यग्र असायचा त्याने लग्न नव्हतं केलं त्याने समाजाशी संसार मांडला होता तो बंगल्यात नव्हे साध्या जुन्या घरात रहायचा तो कपडे अतिशय साधे वापरायचा त्याला अंगरक्षक खूप होते, परंतु तो सोबत कुणालाच घ्यायचा नाही त्याचं जेवणा कडे लक्ष नसायचं त्याचं झोपण्या कडे दुर्लक्ष असायचे तोअनेकांच्या हिटलिस्ट वर होता परंतु दोन कुत्र्यां सोबत तो एकटाच झोपायचा त्याच्या दाराला कडी नसायची तो खूप कमी बोलायचा तरीही त्याच्या सोबत भरपूर आंतरिक संवाद व्हायचा तो उग्र ही होता अन्याय शोषण याविरुद्ध तो बोलायचा नाही, थेट क्रुती करायचा तो भाषण देत नव्हता दुष्ट त्याला वचकून असायचे तो प्रचंड धाडसी होता लोकांच्या देव्हाऱ्यात देवापेक्षा त्याचा फोटो मोठा असायचा.
त्याच्या पायाला स्पर्श करण्या साठी रांग लागायची आठवड्यातून एकदाच रात्री तो आईला भेटायला जायचा सोबत त्याच्याकडे साधी जीप असायची मोठमोठे सिध्द साधक त्याला लवून अभिवादन करायचे तो थोरामोठ्यां समोर नत व्हायचा आमदार खासदार मंत्री संत्री त्याच्या पायावर पडायचे तो परदु:ख ओळखायचा ते दूर करण्याचा प्रयत्न नव्हे प्रत्यक्षात दूर करायचा त्याला असाध्य काहीच नाही अशी भावना त्याच्या डोळ्यात पहाताच निर्माण व्हायची
तो निवडणूक लढवत नव्हता, परंतु त्याचं नाव लावताच कुणीही पराभूत होत नव्हतं. तो स्वत:ला विसरलेला होता. म्हणूनच आजही तो प्रत्येकाला आठवतो त्याचा शब्द कुणी मोडला नाही त्याच्या उपयोगी पडण्याची संधी प्रत्येकजण शोधायचा त्याच्यावर लोकांचा विश्वास होता श्रद्धा होती त्याच्या विषयी संशय कधीच निर्माण झाला नाही इतरांना त्याने सर्व भौतिक सुखे दिली, परंतु तो स्वत: त्यात रमला नाही.
त्याचा स्वत:चा असा एक कायदा होता लोकां साठी तो फायद्याचा होता अनेकदा कायदाही त्याच्या समोर कमरेवर हात ठेवून मौन उभा राहिला, तो लोकशाहीतला राजा नव्हता,परंतु लोकांच्या दिलावरचा अनभिषिक्त सम्राट होता तहानभूक झोप नसतानाही त्याची मुद्रा तेजस्वी दिसायची त्याचाही एक पक्ष होता परंतु त्याचं लक्ष लोकसेवा व लक्ष्य त्याही पलिकडे पारलौकिक होतं. तो दिसला की निराशा पळून जायची तो हसला की मन आनंदानं भरुन जायचं तो फक्त तोच होता ज्याचा भक्त म्हणून मिरवणं हा आमच्या साठी सन्मान होता आजही आहे आम्ही त्या उत्तम देवाचे भक्त आहोत, हा माझ्या सहित हजारो कार्यकर्त्यांना अभिमान आहे.
धर्मवीर खरंच तुम्ही आज हवे होतात...
अशोक कुलकर्णी (वर्तकनगर ठाणे )
0 टिप्पण्या