महाराष्ट्र कर्मचारी युनियनच्या वतीने सुरक्षा कामगारांना मिठाई वाटप
ठाणे
ब्ल्यू पॆन्थर- सामाजिक संघटन व महाराष्ट्र म्युनिसिपल कर्मचारी युनियन व अभियंता संघाचे अध्यक्ष रविंद्र चांगो शिंदे यांच्या वतीने सुरक्षा कर्मचाऱयांना मिठाचे वाटप करण्यात आले. ठाण्यातील आपल्या राहत्या गृहसंकुलातील सर्व सुरक्षा कर्मचाऱयांना शिंदे यांनी विजयादशमीनिमित्त मिठाईचे वाटप केले.याबद्दल अनेक कर्मचाऱयांनी शिंदे यांचे आभार मानले. कोरोना महामारीमुळे सध्या कर्मचारी वर्ग अतिशय बिकट आर्थिक स्थितीत आहे. त्यांच्या जीवनात काही क्षण आनंदाचे यावे या उद्देशाने कर्मचारी युनियनचा अध्यक्ष या नात्याने मी मिठाचे वाटप केले असल्याचे मत रविंद्र शिंदे यांनी यावेळी व्यक्त केले.
0 टिप्पण्या