Top Post Ad

वन्यजीव सप्ताह निमित्त आयोजित स्पर्धेचे बक्षीस वितरण उत्साहात संपन्न 
वन्यजीव सप्ताह निमित्त आयोजित स्पर्धेचे बक्षीस वितरण उत्साहात संपन्न 

 


 

उरण 

महाराष्ट्र शासन ठाणे वन्यजीव विभागा अंतर्गत वनपरिक्षेत्र अधिकारी कर्नाळा पक्षी अभयारण्य यांच्या तर्फे वन्यजीव सप्ताह 2020 साजरा करण्यात आला या वन्यजीव सप्ताह 2020 चे औचित्य साधून कर्नाळा पक्षी अभयारण्य कर्मचारी, रोटरी क्लब ऑफ पनवेल सनराईज, केअर ऑफ नेचर सामाजिक संस्था वेश्वी, सारडे विकास मंच-सारडे, अजय मोकल ग्रुप यांच्या सहकार्याने 1 ऑक्टोबर ते 4 ऑक्टोबर दरम्यान ऑनलाईन चित्रकला स्पर्धा व निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. त्या स्पर्धेचा निकाल लागला असून विजेत्या उमेदवारांना कर्नाळा पक्षी अभयारण्य पनवेल येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमात प्रमाणपत्र, बक्षिसे देऊन गौरविण्यात आले आहे.

 

* पशुपक्षी वाचवा, निसर्ग सजवा,   * वन्यजीव आणि मानव संघर्ष,   * वन्यप्राणी संवर्धन - काळाची गरज 

असे एकूण महत्वाचे 3 विषय चित्रकला व निबंध स्पर्धेसाठी स्पर्धकांना देण्यात आले होते. यामध्ये निबंध स्पर्धेत हेमाली बगाराम म्हात्रे (प्रथम )  रंजना संजय केणी (द्वितीय)   ऋचा धीरेंद्र ठाकूर (तृतीय ) तर  

चित्रकला स्पर्धेत  तेजस म्हात्रे (प्रथम )  आशिष कृष्णा थळी (द्वितीय)  प्रियांशु जयेंद्र मिठागरी(तृतीय )यांनी बक्षीस  पटकाविले . विजेत्यांचे गुलाबपुष प्रमाणपत्र सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. 

 

निसरसंवर्धन कार्याची दखल घेत महाराष्ट्र राज्य वन्य विभाग ठाणे तर्फे निसर्गसंवर्धनाचे कार्य करणाऱ्या हरीश पाटील-रावे,सर्पमित्र राजेश पाटील-मोठे भोम चिरनेर ,रायगड भूषण राजु मुंबईकर-वेश्वी,  अमोल आंबोलकर-पनवेल,  अजय मोकळ -चिरनेर,  नागेंद्र  म्हात्रे-सारडे,  स्नेहल पालकर-वेश्वी,   रूपेश गावंड-चिंचपाडा,   देवाण ठाकूर-केळवणे या पर्यावरणप्रेमी, निसर्गप्रेमी व्यक्तींचा निसर्गरक्षक म्हणून  यावेळी सत्कार करण्यात आला. उप वनरक्षक वन्यजीव विभाग ठाणे चे  बी एन पिगळे, RFO चव्हाण  साहेब आदी  मान्यवर यावेळी उपस्थित होते.


 

 
टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com