धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त online  गीत स्पर्धा संपन्न

धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त online  गीत स्पर्धा संपन्न


मुंबई
बुध्दीस्ट सिंगर्स ग्रुप स्टारमेकर तर्फे धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त online  बुध्द-भीम गीत स्पर्धा स्टारमेकर वरील party room 167407 सुरो के सरताज मध्ये  23 oct to 25 oct घेण्यात आली होती.या स्पर्धेचे ऊद्घाटन बुध्द ही बुध्द है CD चे music composer ,singer,तथा बार्टीचे संचालक मा.राजेश ढाबरे सर यांच्या हस्ते करण्यात आले. २४ ऑक्टोबर रोजी मा.कडूबाई खरात यांच्या प्रबोधन पर गीतांचा कार्यक्रम घेण्यात आला होता.तर या  स्पर्धेचा समारोप ऊत्कर्ष शिंदे यांच्या  हस्ते पार पडला.याप्रसंगी विजयी ऊमेदवारांना सिंगिंग करण्यासाठी माईक ,मानचिन्हे आणी प्रमाणपञे बहाल करण्यात आली.
पन्नासच्या वर सिंगर्सनी या स्पर्धेमध्ये ऊत्स्फूर्तपणे सहभाग घेतला होता. सहभागी प्रतिस्पर्धी मध्ये पहिल्या  पंचवीस प्रतिस्पर्धींचा विशेष प्रमाणपञ देऊन गौरव करण्यात आला असून पहिल्या चार विजेत्यांना माईक व प्रमाणपञे तर ऊत्तेजनार्थ बक्शिस मानकरी ला स्मृतीचिन्ह आणी विशेष भेटवस्तू प्रदान करण्यात आली.


या स्पर्धेमध्ये  प्रदिप साबळे यांचा प्रथम क्रमाःक ,प्रतिमा वाकोडे यांचा द्वितीय क्रमांक, किशोर रोकडे याःचा तृतीय क्रमांक आणी प्रगती शेगोकर यांचा चौथा क्रमांक  आलेला असून प्रविण मेश्राम व गीतल बस्ते हे ऊत्तेजनार्थ सिंगर्स म्हणून घोषित  करण्यात आले.सर्वच विजयी सिंगर्सचे आणी सहभागी कलावंतांचे सामाजिक आणी music online social platforms वरून अभिनंदन  होत आहे. या स्पर्धेचे आयोजन स्टारमेकरवरील Party Room 16707 च्या Owner ॲड.मनस्वी तायडे ,तुषार खंडेराव, आदिल खान, प्रविण भाऊ ( मी मराठी भुसावळ)  गीतल बस्ते यांनी केले होते.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अमित दादा तोरवे, कुमार गनू,पायल ताई,सुकेशनीताई,आम्रपाली ताई,शीलाताई,घनश्याम भाई,जयाभावी,संदिपभाई पवार, शेख  अब्बासभाई, करदमभाई, सुषमाताई,रसिकाभावी,ब्रिजेंदर भाई,शेरा अंकल, अनिलभाई, सतिश राऊत आणी प्रीयाताई  प्रिति, पूनम दिदि या व इतर सर्व मान्यवर सिंगर्सने अथक परीश्रम घेतले.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 🙏दैनिक प्रजासत्ताक जनता नियमित वाचनासाठी

for latest updates...

Follow this link to join our WhatsApp group:

https://chat.whatsapp.com/Cf2s55RAfdQ0yVYSelRURA