Top Post Ad

आता दर महिन्याच्या पहिल्या तारखेला सिंलिंडरच्या किमती ठऱणार

आता दर महिन्याच्या पहिल्या तारखेला सिंलिंडरच्या किमती ठऱणारनवी दिल्ली
गॅस सिलिंडरच्या किंमती बदल राज्यातील तेल कंपन्यांनी दर महिन्याच्या पहिल्या तारखेला एलपीजी सिलिंडरच्या किंमती ठरवल्या जातील. किंमती वाढू शकतात किंवा दिलासादेखील मिळू शकतो. अशा परिस्थितीत १ नोव्हेंबरला सिलिंडरच्या किंमती बदलण्याची शक्यता आहे. ऑक्टोबरमध्ये तेल कंपन्यांनी व्यावसायिक सिलिंडर्सच्या किंमतीत वाढ केली. तसेच तेल कंपन्याकडून डिलिव्हरी ऑथेंटिकेशन कोड (डीएसी) प्रणाली लागू करण्यात येणार असल्याने १ नोव्हेंबरपासून एलपीजी सिलिंडरच्या वितरण नियमात बदल होणार आहेत.  यानुसार गॅस वितरणापूर्वी ग्राहकांच्या नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावर ओटीपी पाठविला जाईल. जेव्हा सिलिंडर आपल्या घरी येईल तेव्हा ओटीपी डिलिव्हरी बॉयबरोबर शेअर करावा लागेल. जेव्हा ओटीपी सिस्टम एकमेकांशी जुळेल तेव्हाच सिलिंडर वितरित केला जाईल.  तसेच इंडेनच्या ग्राहकांना जुन्या क्रमांकावर गॅस बुक करता येणार नाही.  इंडेनने आपल्या एलपीजी ग्राहकांना त्यांच्या नोंदणीकृत मोबाइल नंबरवर गॅस बुकिंगसाठी एक नवीन नंबर पाठविला आहे. आता इंडेन गॅसच्या ग्राहकांना एलपीजी सिलिंडर बुक करण्यासाठी ७७१८९५५५५५ वर कॉल किंवा एसएमएस पाठवावा लागेल.  


 भारतीय रेल्वे देशभरातील गाड्यांचे वेळापत्रक बदलणार आहे.  या निर्णयामुळे १३ हजार प्रवासी आणि ७ हजार मालवाहतूक करणान्यां गाड्यांच्या वेळेत बदल करण्यात येणार आहेत. १ नोव्हेंबरपासून गाड्यांचे नवीन वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात येणार आहे ज्यामध्ये देशातील ३० राजधानी गाड्यांचे वेळापत्रकदेखील बदलणार आहे. त्याचबरोबर तेजस एक्स्प्रेस चंदिगड ते नवी दिल्ली दरम्यान धावेल आणि दर बुधवारी सुटेल. तसेच सर्वात महत्वाचे म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडीयाचे  काही महत्त्वपूर्ण नियम बदलणार आहेत.  एसबीआय बचत खात्यांवर आता कमी व्याज मिळेल. १ नोव्हेंबरपासून बचत खात्यावर १ लाख रुपयांपर्यंत ०.२५ टक्के व्याजदर कमी करून ३.२५ टक्के केले जाईल. तर १ लाखाहून अधिक रकमेच्या ठेवींवर आता रेपो रेटनुसार व्याज मिळेल.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com