Top Post Ad

`क्लस्टर'च्या सर्व्हेला नागरिकांचा विरोध

`क्लस्टर'च्या सर्व्हेला नागरिकांचा विरोध

 

ठाणे

ठाणे जिल्हा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचा `क्लस्टर' हा ड्रीम प्रोजेक्ट आहे. मात्र या योजनेविरोधातच शिवसैनिकांनी `आवाज' उठवला आहे. कॅसरमील जवळील आझादनगर नं.1 (मसाणवाडा) येथे बायोमेट्रीक सर्व्हेक्षण सुरु असून या सर्व्हेला स्थानिक चंद्रकांत सुर्वे आणि अमित जैसवाल यांनी विरोध केला आहे. स्थानिक नागरिकांची बैठक घेऊन त्यांना प्रस्तावित प्रकल्पाबाबत वास्तविक माहिती देण्यास प्रशासन टाळाटाळ करीत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. यामध्ये अनेक शिवसैनिकांचाही समावेश असल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. पालकमंत्री यांचे क्लस्टरच्या माध्यामातून सर्वसामान्यांना मालकी हक्काचे अधिकृत घर देण्याचे स्वप्न आहे पण हे स्वप्नाला खिळ घालण्याचे काम  होत असल्याचे दिसत आहे.


कॅसरमील जवळ असलेला आणि आनंद पार्कची मागील बाजू असलेल्या आझादनगर नं.1 (मसाणपाडा) येथे समूह विकास योजनेअंतर्गत येथील झोपडपट्टीचा विकास करण्याचे नियोजित आहे.  आझादनगर 1 येथील विभागाचाही या योजनेत समावेश आहे. या संदर्भात या विभागात मागील काही महिन्यांपासून बैठका सुरु आहेत. तसेच महापालिकेने तसे येथिल नागरिकांना कळवून बायोमेट्रीक सर्व्हेक्षणाचे कामही सुरु केले आहे. मात्र आज अचानक येथील स्थानिक चंद्रकांत सुर्वे आणि अमित जैसवाल यांच्यासह अनेक नागरिकांनी सर्व्हेक्षणाला विरोध केल्याची माहिती नगरसेवक कृष्णा पाटील यांनी दिली. आमच्या शंकांचे प्रथम निरसन करा नंतर सर्व्हेक्षण करा अशी त्यांची मागणी होती. वास्तविक यापुर्वी या संदर्भात बैठका झाल्या असून नागरिकांचे हित साधण्यापेक्षा काही जण स्वत:ची पोळी भाजत असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला.

 

यावेळी पोलिस प्रशासनाने शासकीय कामात अडथळा आणणे तसेच कोव्हीडच्या गंभीर परिस्थीतीत जमावबंदी मोडून गोंधळ घालणे अशा आरोपाचे गु्न्हे दाखल करण्याची तंबी संबंधितांना दिली. लोकांना विश्वासात घ्या, अन्यथा आमच्या अंगावर बुलडोझर फिरवा आम्ही मरायला तयार आहोत अशी संतप्त प्रतिक्रिया येथील नागरिकांनी दिली. विशेष म्हणजे आजच मुंबई येथील जनता दरबारात महाराष्ट्र राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी अशा समस्यांग्रस्त झोपडपट्टीधारकांचे प्रश्न सोडवून त्यांचे योग्य पुनर्वसन तसेच यामध्ये समन्वय घडवून आणण्याकरिता झोपडपट्टी पुनर्वसन संघर्ष समन्वय समितीची घोषणा केली आहे.   ठाण्यातील प्रतिनिधी राज राजापूरकर (राष्ट्रवादी पक्षाचे ओबीसी सेल महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस) तसेच बीआरएसपीचे ठाणे जिल्हा प्रभारी प्रा.चंद्रभान आझाद यांनी आझाद नगर झोपडपट्टीवासीयांसोबत संवाद साधून मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्याकडे हा प्रश्न मांडून कायदेशीर प्रक्रिया व पुनर्वसन करण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले.  

 

सवँ स्थानिक रहिवाशांनी संघटितपणे प्रकषाँने लढा दिला पाहिजे। या संदर्भात सवँ राजकीय पक्ष नेते मंडळी यांनी हरकती व रहिवाशांच्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी प्रशासनाला भाग पाडले। अन्यथा नागरिकांच्या जनआंदोलनाला सामोरे जावे लागेल।  काही वषाँपुवाँ रिडेव्हलपमेंट च्या नावाखाली शिवसेनेच्याच नेते मंडळींनी एकवीरा आईची शपथ घेऊन आझाद नगर नं१ येथील रहिवाशांना बिल्डिंग चे स्वप्न दाखवले होते तेही जमिनीच्या, विकासकाच्या आणि कायदेशीर त्रुटींमुळे भंगले! 
रहिवाशांकडून फाईल्स जमा करण्यात आल्या, घरांवर नं टाकण्यात आले! ते सवँ कागदावरच राहिले। असे केवळ तोंडि आश्वासन देऊन बर्‍याच वेळा आझाद नगर येथील रहिवाशांची बोळवण केली आहे। वेळ मारून नेली आहे। 
SRA योजना, क्लस्टर योजना तसेच विकासाच्या नावाखाली राबविण्यात येणाऱ्या कोणत्याही योजना राबवताना त्याबाबतची  सखोल माहिती देण्यात यावी, परंतु तसे न करता महापालिका प्रशासन क्लस्टर योजना जबरदस्तीने रेटण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे। आज देखील क्लस्टर योजनेची टांगती तलवार ठाणेकरांवर आहे। 


आझाद नगर नं १ (मसाणवाडा) येथील रहिवाशांच्या मनात काही प्रश्न निर्माण झाले असून त्यांनी बोलताना व्यक्त केले, ते असे, की  काही रहिवाश्यांची घरे मोठी,डबल माळ्यांची आहेत त्यांना किती FSI मिळणार, अन्य जणांकडे कागदपत्रे गहाळ, काही  घरे भाडेतत्त्वावर आहेत। लाँकडाऊन मूळे अनेकजण बाहेर आहेत। त्यातच बायोमेट्रिक करताना घरमालक तिथे काही कारणास्तव उपस्थित नसेल तर! किंवा सरतेशेवटी योजनेच्या अंतर्गत येणार्‍या पात्र आणि अपात्रतेची यादि त्याचा तपशील या सर्व शंकांचे निरसन होणे गरजेचे आहे। कारण या आधीच्या योजनांमध्ये या प्रश्नांविषयी बराच गदारोळ माजला होता। आणि त्याचा बर्‍याच अंशी फायदा, पाठिवर थाप मारणाऱ्यांनी, पुढारपण करणार्‍यांनी अतिहावपणे करुन घेतलेला आहे। मात्र आझाद नगर नं १ येथील रहिवाशांच्या बाबतीत तसे घडता कामा नये?  या विषयावर चर्चा पालिकेच्या सर्वसाधारण सभेत झाली आहे। 
COVID 19 ची आपत्कालीन परिस्थिती संपूर्ण देशात असताना आणि ठाणे शहर पण त्याला अपवाद नसताना आणि मुख्य म्हणजे जनतेच्या आरोग्याचा, संरक्षणाचा, सुरक्षिततेचा गंभीर असताना देशात अनेक ठिकाणी तसेच ठाण्यात साथरोग प्रतिबंधक अधिनियम १८९७व आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ व कडक निर्बंध असताना ठाणे महापालिका क्लस्टर योजनेच्या कामाला घाई का करत आहे? ही योजना प्रशासनातील काही अधिकारी व आपल्या हितसंबंधीच्या सांगण्यावरून कोणाच्या तरी स्वाथाँसाठी जबरदस्तीने आझादनगरवासीयांच्या माथी रेटण्याचा प्रयत्न तर करत नाही ना? असा तकँवितकँ रहिवाशांच्या मनात आहे।  COVID 19 च्या  आपात्कालीन परिस्थितीत ईतर अनेक समस्यांना ठाणेकर जनता सामोरे जात आहे, ठाणेकर जनतेचे मानसिक संतुलन (स्वास्थ) ठिक नसताना, आझादनगर वासीयांना त्यांच्या कुटुंबीयांचे, आरोग्याचे प्रश्न व आथिँक अस्थिरतेचे वातावरण निर्माण झाले असताना सध्याच्या कोरोनाभय परिस्थितीत आझादनगर नं १ येथील जनतेला क्लस्टर योजनेच्या संभ्रमात पाडणे कितपत योग्य आहे? 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com