Top Post Ad

 मीरा भाईंदर महानगर  शहराला कमी प्रमाणात होणाऱ्या पाणी प्रश्नाबाबत बैठक संपन्न

 मीरा भाईंदर महानगर  शहराला कमी प्रमाणात होणाऱ्या पाणी प्रश्नाबाबत बैठक संपन्नभाईंदर
मिरा भाईंदर महानगरपालिकेस महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून 150 द.ल.ली. पाणी मिळण्याबाबत  शिवसेनेचे पक्ष प्रवक्ते मीरा-भाईंदर संपर्कप्रमुख आमदार प्रताप सरनाईक यांनी उद्योग मंत्री सुभाष देसाई यांची १४ ऑक्टोबर मंत्रालयात भेट घेतली.  सुर्या प्रकल्पाचे पाणी शहरास उपलब्ध होईतोपर्यंत शहराची सदयाची पाण्याची मागणी पूर्ण होण्यासाठी अधिकचे 25 द.ल.ली. असे एकूण 150 द.ल.ली. पाणी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून मिळणेबाबत संबंधीत आधिकाऱ्यांसोबत शासनस्तरावर बैठक आयोजित करण्यासाठी सरनाईक यांनी विनंती केली. त्या विषयान्वये आज १९ ऑक्टोबर रोजी मंत्री  सुभाष देसाई यांच्या मंत्रालयातील दालनातील सकारात्मक बैठक पार पडली . या बैठकीला खासदार राजन विचारे , आमदार गीता जैन , महापौर ज्योत्सना हसनाळे , विरोधी पक्ष नेता  प्रविण पाटील , शिवसेना गटनेत्या निलम ढवण , स्थायी समिती सभापतीपद अशोक तिवारी नगरसेवक झुबेर इमानदार , नगरसेवक आनंद मांजरेकर नगरसेवक प्रशांत दळवी ,आयुक्त डाॅ . विजय राठोड अतिरिक्त आयुक्त दिलिप ढोले कार्यकारी अभियंता सुरेश वाकोडे , काॅंग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रमोद सावंत व पाणी पुरवठा विभाग व महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे अधिकारी उपस्थित होते .


मिरा भाईदर शहर हे मुंबईलगत असल्याने मुंबई काम करणारा कर्मचारी वर्ग वास्तव्यासाठी शहरामध्ये स्थलांतरीत होत असल्याने तसेच शहरामध्ये उद्योगधंदयामध्ये वेगाने वाढ होत आहे. त्यामुळे शहराची लोकसंख्या दिवसागणिक वाढतच आहे. सदयाची लोकसंख्या व उपलब्ध पाणी पुरवठा पाहता सदयस्थितीत सुमारे 50 दे.ल.ली. पाणी अपुरे पडत असल्याचे त्यांनी मंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले होते. शहरासाठी सदया सुमारे 236 द.ल.ली. पाण्याची आवश्यकता आहे व मंजूर पाण्याचा कोटा 86 द.ल.ली. स्टेम प्राधिकरण व 125 द.ल.ली. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ यांचे कडून असा एकत्रित 211 द.ल.ली. पाणी मंजूर आहे. मात्र महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ फक्त् 100 द.ल.ली. पाणी पुरवठा करत आहे. यास्तव शहरास एकंदरीत 50 द.ल.ली. पाणी पुरवठा मागणीपैक्षा कमी होत आहे. शहराची भविष्यातील पाण्याची मागणी पूर्ण होण्यासाठी सुर्या प्रकल्पातून 218 द.ल.ली. पाणी आरक्षीत आहे. मात्र सदरचे पाणी उपलब्ध होण्यासाठी अदयाप दोन ते तीन वर्षाचा कालावधी अपेक्षीत आहे: तो पर्यंत महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून मंजूर कोटयापेक्षा कमी होत असलेला 25 द.ल.ली. व वाढीव 25 द.ल.ली. असा एकूण 50 द.ल.ली. पाणी पुरवठा शहरास करण्यात येण्याबाबत यावेळी चर्चा झाली.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com