फुलशेतीचा रोजगार हमीत समावेश करण्याची विवेक पंडित यांची मागणी

फुलशेतीचा रोजगार हमीत समावेश करण्याची  विवेक पंडित यांची मागणीउसगाव
ठाणे पालघर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात मोगरा आणि चाफा या फुलांची लागवड होते, जर रोजगार हमी  योजनेत काही आवश्यक बदल केले आणि रोजगार हमी कामात फुलशेतीचा समावेश केला तर येथील आदिवासी मजुरांसोबतच इतर शेतकऱ्यांनाही मोठा दिलासा मिळेल असे सांगत तातडीने फुलशेतीचा रोहयो मध्ये समावेश करावा अशी मागणी श्रमजीवी संघटनेचे संस्थापक तथा अनुसूचित क्षेत्र आढावा समिती अध्यक्ष (राज्यमंत्री दर्जा) विवेक पंडित यांनी मुख्यमंत्री उद्ध‌व ठाकरे यांच्याकडे केली आहे.  मजुरांना आपल्या गावातच हाताला काम देणारी रोजगार हमी योजना अधिक प्रभावी झाली तर अधिकाधिक रोजगार निर्माण होण्यास मदत होऊ शकेल. या पार्श्वभूमीवर ही मागणी पंडीत यांनी लावून धरली आहे. 


पालघर, ठाणे इत्यादी जिल्ह्यांमध्ये मोगरा आणि चाफा या फुलांची लागवड यशस्वी झालेली दिसत आहे. परिणामी शेतकऱ्यांच्या या लागवडीकडे कल आहे, आपण रोजगार हमी योजनेत फळबाग लागवडीप्रमाणे फुलशेतीचाही समावेश केला तर फुलशेती मधील शेतकरी आणि शेतमजूर याना मोठा दिलासा मिळेल. यामुळे आदिवासीच नव्हे तर बिगर आदिवासी शेतकऱ्यांना देखील रोजगाराचा पर्याय निर्माण होईल आणि रोजगार हमी योजना खऱ्या अर्थाने सर्वसमावेश रोजगार निर्मितीचे साधन बनू शकेल.असे पंडित यांनी स्पष्ट केले आहे. यापूर्वीही पंडित यांनी याबाबत शासनाचे लक्ष वेधले होते, वेळोवेळो होणाऱ्या शासन स्तरावरील बैठकीत पंडित यांनी याबाबत आपली भूमिका मंडली आहे. 3 वर्षांपूर्वी नागपूर येथे याबाबत झालेल्या शासकीय बैठकीतही विवेक पंडित यांनी याबाबत मागणी करत या बदलाने होणारे सकारात्मक परिणाम विशद केले होते.


आता लॉकडाऊन काळात रोजगार नसल्याने मजूर हतबल झाला आहे, तर अवकाळी पावसाने बिगरआदिवासी शेतकरीही उद्धवस्त झाला आहे.या काळात फुलशेती जर रोजगार हमी योजनेत समाविष्ट झाली तर सर्वच शेतकरी हा पर्याय निवडून रोजगाराचे आणि उदरनिर्वाहाचे साधन सक्षम करू शकतील आणि आदिवासी मजुरांनाही हक्काचे काम आपापल्या भागात मिळेल असा विश्वास पंडित यांनी व्यक्त केला आहे. या बाबतीत पंडित यांनी अनेकदा पत्रव्यवहार करूनही पाठपुरावा केला असून रोजगार हमी आयुक्तांनी तसा प्रस्ताव एक वर्षा पूर्वीच शासनाकडे पाठविला असल्याचे त्यांनी मुख्यमंत्रयांच्या निदर्शनास आणून दिले आहे


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 🙏दैनिक प्रजासत्ताक जनता नियमित वाचनासाठी

for latest updates...

Follow this link to join our WhatsApp group:

https://chat.whatsapp.com/Cf2s55RAfdQ0yVYSelRURA