Top Post Ad

कृषि बील संमत होण्याआधीच अदानीची शेतजमीनी खरेदी आणि साठवण गोदामाची निर्मिती

विमान आणि रेल्वे नंतर आता कृषीक्षेत्रातही अदानी समुहाचे वर्चस्व 

भाजप प्रणित मोदीं सरकारच्या कार्पोरेट कृषी कायद्यामुळे हपापाचा माल गपापा होणार याची प्रचिती यायला सुरुवात झाली आहे. मात्र कृषि बील संमत होण्याआधीच याची तयारी सुरु होती हे अदानी सारख्या व्यापाऱयाने केलेल्या शेतजमीनी खरेदी आणि साठवण गोदामाची निर्मिती यावरून दिसून येते. रेल्वे आणि विमानसेवेवर अधिपत्य मिळवल्यानंतर आता आदानी भारतातील शेतीही गिळंकृत करणार असल्याचे प्रथमदर्शनी दिसत असूनही पुरोगामित्वाचा बुरखा पाघरणारे गप्प बसून आहेत  नखाला माती न लागू देता अदानी आता देशातला सर्वात मोठा शेतकरी ठरणार आहे. नुकत्याच झालेल्या कायद्याआधीच आदानीसारख्या कॉर्पोरेट फंडांनी त्याची पूर्वतयारी फार आधीपासून केलेली आहे.

या कायद्याच्या समर्थकांकडून आता कृषिक्षेत्राला उद्योगाचा दर्जा मिळेल.व्यापारी दलाली खाणारे मध्यस्थ दूर केले जातील, असा दावा केला जात आहे. व्यापारी नसणार तर मग शेतक्रयांचा माल कोण खरेदी करणार? ग्राहक एकावेळी किती धान्य,भाजीपाला,फळे किंवा अन्य माल खरेदी करणार वस्तुस्थिती अशी आहे की, माल एजंटच खरेदी करेल, फक्त आता गाव-तालुक्यातला नसेल.तो असेल अदानीसारखा मोठा कॉर्पोरेट ग्रुप.  मागील पाच वर्षापासून अदानी ग्रुप शेतकन्यांकडून माल खरेदी करण्याची पूर्व तयारी करत आहे. यासाठी अदानींनी अत्यंत आधुनिक पद्धतीने अन्न साठवण प्रणालीची निर्मिती केलेली आहे.

पीपीपी अर्थात सरकारबरोबर सार्वजनिक खाजगी भागीदारीच्या नावाखाली धान्य साठवण्यासाठी सायली स्टोरेज नावाच्या मोठ्या स्टीलच्या टाक्या तयार केल्या आहेत. सायलो स्टोरेज ही स्टीलच्या टाक्यांची अशी एक प्रणाली आहे की, ज्यात मोठ्या प्रमाणात धान्य साठवता येते. त्यात अनेक मोठ्या आकाराच्या दंडगोलाकार टाक्या असतात. त्यात ओलावा आणि तापमानामुळे धान्यावर वाईट परिणाम न होता ते ब्रयाच दिवसांपर्यंत साठवले जाऊ शकते. तसेच या अद्ययावत सायलो टाक्यांतून रेल्वेच्या साईडिंगद्वारे मोठ्या प्रमाणात धान्याची चढ-उतार करणे सहज शक्य आहे. यामुळे साठवण आणि वाहतुकीदरम्यान होणारे नुकसानही कमी होते.  

विमान आणि रेल्वे प्रमाणेच मोदी सरकारने सार्वजनिक खाजगी भागीदारी धोरणाअंतर्गत 100 लाख टन साठवण करू शकणान्या स्टीलच्या सायलो टाक्या तयार करण्याचे लक्ष्य ठेवले आहे,आणि त्यांचे निर्मिती व देखभालीचे कंत्राट अदानी ग्रुपलाच दिले आहे. अशा प्रकारच्या दीर्घकाळ धान्य साठवण्याची क्षमता असणान्या सायलो टाक्या जगात प्रथम कॅनडामध्ये तयार केल्या गेल्या. त्यानंतर कॅनडा आणि भारत सरकार यांच्यात झालेल्या कराराअंतर्गत पंजाब, गुजरात आणि पश्चिम बंगालमध्ये अदानी ग्रुप सायलो स्टोअरेज बांधत आहे. 'अंग्री लॉजिस्टिक लिमिटेड' या नावाने अदानी यांनी ही नवीन कंपनी स्थापन केली असून त्यांनी भारतीय खाद्य महामंडळाशी विशेष सेवा करार केला आहे. त्यांच्या सहकार्याने पंजाबमधील मोगा आणि हरियाणामधील कैथलमध्ये अवाढव्य सायलो टाक्या निर्माण केल्या जात आहेत. जे कोणी शेतकरी या सायली टाक्यामध्ये आपला गहू साठवायला पाठवतील त्यांना नाममात्र भाडे भरावे लागेल. ते वाटेल तेव्हा हा गहू विकू शकतात. त्यांना त्याची किंमत ऑनलाईन मिळेल.दिलेता गह परत मात्र कोणत्याही परिस्थितीत मिळणार नाही.  

म्हणजेच तो आज अथवा उद्या अदानी ग्रुपलाच विकावा लागेल. अदानी देशभरात अन्नधान्य साठवणुकीचे असे सत्तावीस तळ आणि फील्ड डेपो उभारणार असल्याचे म्हटले जात आहे. त्यासाठी अदानी समूहाने तीन मुख्य कृषी कंपन्या स्थापन केल्या आहेत. अदानी विल्मर लिमिटेड, अदानी अंग्री लॉजिस्टिक लिमिटेड आणि अदानी अंग्री फ्रेश लिमिटेड अशी या कंपन्यांची नावे आहेत.. अदानी अंग्री लॉजिस्टिक ही अन्नधान्यांचा मोठ्या प्रमाणात साठा करण्याची आणि तो हाताळण्याची यंत्रणा असेल.हीच कंपनी भारतीय खाद्य महामंडळाला यापुढे 'एंड टू एंड होलसेल सप्लाय' चेन पुरवेल.या मालवाहतूक,संकलन आणि वितरणासाठी अदानी देशभरात मोठ्या प्रमाणात जमिनी घेऊन स्वतचे रेल्वे रंक आणि टर्मिनल देखील उभारणार आहे. थोडक्यात नखाला माती न लागू देता आता अदानी समूह देशातला सर्वात मोठा शेतमालक ठरणार आहे.  

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com