केंद्रातील काळे इंग्रज शेतकऱ्यांना मजूर बनविण्याचा प्रयत्न करीत आहेत- खासदार ॲड. सातव

देशातून गोरे इंग्रज गेले व पण केंद्रातील काळे इंग्रज शेतकऱ्यांना मजूर बनविण्याचा प्रयत्न करीत आहेतहिंगोली
शेतकऱ्यांनी पिकविलेला शेतीमाल खाजगी कंपनीलाच विकला पाहिजे हि सरकारची भुमीका आहे. त्यामुळे पुढील काळात खाजगी कंपनीच्या माध्यमातूनच शेतीमाल खरेदी होणार असून सदर कंपनी अंबानी किंवा आदानी यांचीच असेल. देशातून गोरे इंग्रज गेले व पण केंद्रातील काळे इंग्रज शेतकऱ्यांना मजूर बनविण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप काँग्रेसचे राज्यसभेचे खासदार ॲड. राजीव सातव केला.  सर्वच क्षेत्रात खाजगीकरण करण्याचा प्रयत्न केंद्र सरकारने चालविला असून रेल्वेचे खाजगीकरण झाल्यास पुढील काळात अंबानी, अदानी एक्सप्रेस रेल्वे धावल्यास नवल वाटायला नको असा खोचक टोलाही त्यांनी  २ सप्टेंबर रोजी हिंगोलीत धरणे आंदोलनात बोलतांना केंद्र सरकारला लगावला आहे.


 केंद्र सरकारने शेतकरी व कामगार विरोधी धोरण मागे घेण्याच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आयोजित धरणे आंदोलनात ते बोलत होते. यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संजय बोंढारे, माजी आमदार डॉ. संतोष टारफे, जिल्हा परिषद सदस्य डॉ. सतीष पाचपुते, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक ॲड. गयबाराव नाईक यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


खासदार ॲड. सातव पुढे म्हणाले की, अच्छे दिनचा वादा करणाऱ्या भाजपच्या मोदी सरकारने अद्यापही अच्छे दिन दाखवलेच नाही. त्यामुळे आता अच्छे दिन नको तर जूने दिवस तरी परत द्या असे म्हणण्याची वेळ आली आहे. केंद्रातील भाजप सरकारकडून शेतकरी व कामगार विरोधी धोरण राबविले जात असल्याचा आरोप त्यांनी केला. नवीन शेतीधोरण आणून शेतकऱ्यांना शेतमजूर होण्याची वेळ केंद्र सरकारकडून आणली जात आहे. या धोरणामुळे देशात कुठेही शेतीमाल विक्री करता येणार असल्याचे सांगून फसविले जात आहे. इतकेच नव्हे तर  देशात जिओचे सिमकार्ड आल्यानंतर मोफत बोलणे व डाटा मिळू लागला होता. त्यामुळे बीएसएनएलचे मोठे नुकसान झाले आहे. मात्र आता जिओ चे सिमकार्ड वापरण्यासाठी पैसे मोजावे लागत असून त्यांचे वाढलेले दर पाहता जिओ ला आता जिने दो म्हणण्याची वेळी आली असल्याचे खासदार ॲड. सातव यांनी यावेळी सांगितले.


 

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad