Trending

6/recent/ticker-posts

मोमीन यांच्या नियुक्तीस भिवंडी महानगरपालिकेतील नगरसेवकांसह पदाधिकारी यांचा विरोध

मोमीन यांच्या नियुक्तीस भिवंडी महानगरपालिकेतील नगरसेवकांसह पदाधिकारी यांचा विरोधभिवंडी
भिवंडी शहर जिल्हाध्यक्षपदावर तब्बल 9 वर्षांपासून कार्यरत शोएब खान गुड्डू यांची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस पक्षाने पदावरून उचलबांगडी करून प्रभारी अध्यक्ष म्हणून माजी आमदार रशीद ताहीर मोमीन यांची नियुक्ती केली आहे . रशीद ताहीर मोमीन यांच्या नियुक्तीस   भिवंडी महानगरपालितील नगरसेवकांसह पदाधिकारी यांच्याकडून विरोध केला जात असून त्याविरोधात बंड पुकारले असून पदाधिकाऱ्यांसह 21 नगरसेवकांनी राजीनामा दिला आहे. नगरसेवक पदाचा राजीनामा प्रदेश काँग्रेस अध्यक्ष महसूल मंत्री बाळासाहेब थोरात ,महानगरपालिका आयुक्त डॉ पंकज आशिया यांना पाठविला आहे. दीड वर्षानंतर महानगरपालिका निवडणुका असून त्या वेळेस पक्षाला याची किंमत मोजावी लागणार आहे. प्रदेश काँग्रेसने अध्यक्ष पदावरील रशीद ताहीर यांच्या नियुक्तीचा फेरविचार न केल्यास सर्व नगरसेवक काँग्रेस पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा देणार असल्याची घोषणा नगरसेवक फराज बहाउद्दीन यांनी केली आहे.


भिवंडी महानगरपालिकेत सध्या काँग्रेसचे 47 नगरसेवक असून त्यापैकी 18 नगरसेवकांनी डिसेंबर 2019 मधील महापौर निवडणुकीत काँग्रेस उमेदवाराविरोधात मतदान करीत बंडखोरी केली होती. त्यानंतर प्रदेश काँग्रेसने भिवंडी शहरातील या घटनेची गांभीर्याने दखल घेत शोएब खान गुड्डू यांची पदावरून मुक्तता केली आहे .शोएब खान गुड्डू यांची 2012 मध्ये शहर काँग्रेस पदावर नियुक्ती केल्या पासून महानगरपालिका सभागृहात काँग्रेस पक्षाचे संख्याबळ वाढविण्यात महत्वाची भूमिका बजावली. शहरात काँग्रेस मजबूत करण्यात त्यांचा सिंहाचा वाटा असून त्यांना पदावरून दूर करताना प्रभारी म्हणून केलेली नेमणूक ही चुकीची असल्याचा आरोप नगरसेविका फरजाना इस्माईल रंगरेज यांनी केला आहे.  रशीद ताहीर यांच्या नियुक्तीविरोधात काँग्रेस नगरसेवक पदाधिकारी यांच्या एका गटात प्रचंड रोष असून त्यांनी नेहमीच काँग्रेसविरोधात भूमिका घेत पक्षाच्या उमेदवारा विरोधात काम केले असल्याने त्यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाची शहरात वाढ न होता अधोगती होणार असल्याचा दावा करण्यात येत आहे.


 


 

Post a Comment

0 Comments