Top Post Ad

गरीबांची श्रीमंती.......


10 वर्षाचा पेपर वाटणारा मुलगा एका घराचं गेट वाजवित आहे.
शिक्षिका - विचारते, काय रे?
मुलगा - काकू, मी तुमची बाग साफ करू का?
शिक्षिका - नको, आज नाही करायची आणि आज पेपर आणला नाहीस.
मुलगा - हात जोडून, ​​दयनीय आवाजात .. "प्लीज प्लीज काकू, मी ते व्यवस्थित साफ करीन, आज पेपर छापले नाही, काल दस-याचीची सुट्टी होती हो ."
शिक्षिका - "ठीक आहे, किती पैसे घेणार?"
मुलगा - पैसे नका काकू, खायला द्या. "
शिक्षिका- अरे ! चांगले काम कर.
( बिच्चारं, भूक लागलेली दिसतेय, पहीलं खायला देते......मालकीन मनातल्या मनात बोलली)
शिक्षिका- आरे मुला ... आधी जेवूण घे, मग काम कर.
मुलगा - नाही काकू, मी पहीलं काम करतो मग तुम्ही मला जेवायला द्या.
शिक्षिका - ठीक आहे, असे म्हणून ति तिच्या कामाला लागली.
मुलगा - एक तासानंतर, "काकू, सफाई योग्य प्रकारे झाली आहे की नाही ते पहा."
शिक्षिका - अरे व्वा! तू तर खूप चांगली साफसफाई केली आहे, भांडी व्यवस्थित ठेवले आहेत. इथे बस, मी जेवण आणते.
शिक्षिकेने त्याला अन्न दिल्यानंतर मुलगा ते अन्न खिशातून पिशवी काढून त्यात अन्न ठेवू लागला.
शिक्षिका - उपाशीपोटी काम केले आहेस, आता इथेच बसून खा, लागले तर आणखी देईल.
मुलगा - काकू नाही, माझी आजारी आई घरी आहे, मला शासकीय रुग्णालयातून औषध मिळाले आहे, परंतु डॉक्टर साहेब म्हणाले आहेत की औषध रिकाम्या पोटी खाऊ घालू नका.
शिक्षिकेच्या पापण्या ओल्या झाल्या ... आणि तीने त्या निरागस मुलाला त्याची दुसरी आई बनून खायला घातले, नंतर त्याच्या आईसाठी भाकरी बनवल्या आणि तिच्या घरी घेऊन गेली आणि त्या आईला दिल्या.
येतांना ती शिक्षीका म्हणाली, “बहिण, तू खूप श्रीमंत आहेस, आपण आपल्या मुलाला दिलेली संपत्ती आम्ही आमच्या मुलांना देऊ शकत नाही”.
आई डोळ्यात अश्रू आलेल्या नजरेने मुलाकडे पहात होती… आणी मुलगा त्याच्या आजारी आईला चिटकला....

आवडलं असेल तर कमेंट करा आणि शेअर करा.
( हिंदीतील शेअर करून मराठीत भाषांतर केले आहे.)


सागर जाधव यांच्या फेसबूक वरून.......


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com