उरण कोटनाका येथील शेतक-यांची सिडको व रेल्वे प्रशासना कडून फसवणूक

काळाधोंडा येथील शेतकरी नुकसान भरपाईच्या प्रतिक्षेत.
उरण कोटनाका येथील काळा धोंडा हद्दीतील शेतक-यांची सिडको व रेल्वे प्रशासना कडून फसवणूक.
मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा.
कोटनाका येथील बैठकीमध्ये एकमुखी निर्णय.उरण
उरण तालुक्यातील काळा धोंडा येथील शेतकऱ्यांची जमीन रेल्वे व सिडको प्रशासना तर्फे संपादित करण्यात आली होती मात्र संपादित प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना आजपर्यंत कोणतेही नुकसान भरपाई,मोबदला मिळाली नाही.अनेक वेळा पत्रव्यवहार करून सुद्धा सिडको व रेल्वे प्रशासन प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या या महत्वाच्या समस्याकडे जाणून बुजुन दुर्लक्ष करीत असल्याने आपल्या मागण्यांच्या पुर्ततेसाठी व शेतकऱ्यांच्या समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी स्थानिक रेल्वे प्रकल्पग्रस्त शेतकरी कृती सेवा संस्था काळा धोंडा या संस्थेच्या वतीने पुढील रूपरेषा ठरविण्यासाठी कोटनाका येथील   राघोबा मंदिर येथे २७ ऑक्टोबर रोजी  दुपारी ४ वाजता झालेल्या बैठकीत प्रकल्पग्रस्त शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


1963 साली केंद्र शासनाच्या रेल्वे प्रशासना तर्फे उरण तालुक्यातील काळाधोंडा कोटनाका हद्दीतील 129 एकर जागा संपादित करण्यात आली. ही जागा रेल्वे ट्रेकसाठी नसुन रेल्वे स्टेशन व सर्विसिंग सेंटर ह्या दोन प्रोजेक्टसाठी संपादित केलेली आहे. त्यावेळी ज्यांच्या ज्यांच्या जमीनी संपादित करण्यात आल्या होत्या त्या शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारे नुकसान भरपाई देण्यात आले नव्हते. या संदर्भात स्थानिक रेल्वे प्रकल्पग्रस्त शेतकरी कृती सेवा संस्था काळा धोंडा या संस्थेच्या माध्यमातून दि 6/4/2013 रोजी रेल्वे प्रशासनाला पत्र देण्यात आले होते त्यामध्ये विविध समस्या व मागण्याही नमुद करण्यात आले होते. त्याची दखल घेतली गेली नाही.


स्थानिक रेल्वे संस्थेच्या वतीने कार्यकारी अभियंता पी सेवतकर, मध्य रेल्वेचे आशुतोष गुप्ता, ए व्ही कुलकर्णी, लोकनेते माजी खासदार रामशेठ ठाकुर यांच्या संयुक्त माध्यमातून ११ मे २०१३ रोजी जुईनगर रेल्वे कार्यालयात बैठक घेण्यात आली होती. त्यावेळी नुकसान भरपाई बाबत करण्यात आलेल्या चर्चेमध्ये प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई व इतर मागण्या मान्य करण्यात आले होते. ६ महींन्याच्या आत सर्व मागण्या पूर्ण होतील असे वचन रेल्वे प्रशासना कडून प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या वारसांना देण्यात आले होते. मात्र आजतागायत कोणतेही नुकसान भरपाई अथवा मोबदला येथील शेतकऱ्यांना मिळाला नाही तसेच कोणत्याही मागण्या मान्य झाल्या नाहीत. त्यामुळे उदरनिर्वाहाचे,उपजिविकेचे एकमेव साधन असलेल्या शेतीवर येथील नागरिक आपले पोट भरत होते. मात्र जमीन संपादना नंतर येथील शेतकरी व त्यांचे कुटुंब बेरोजगार झाले.आता पोट कसे भरावे ? मुलांचे शिक्षण कसे भरावे ? आरोग्याचा,दवाखान्याचा दवा पाण्याचा प्रश्न कसा सोडवावा,घरखर्च कसा चालवावा असे अनेक प्रश्न, समस्या येथील शेतकऱ्यांना सतावत आहेत.


रेल्वे प्रशासनाकडून शेतकऱ्यांच्या मागण्या सहा महिन्यात पूर्ण करण्यात येतील त्याबाबत वचन देण्यात आले होते. ते विषय, मागण्या पुढील प्रमाणे.
1)काळाधोंडा उरण कोटनाका हद्दीतील 129 एकर जमीन संपादित केलेली आहे ती रेल्वे ट्रेकसाठी नसुन रेल्वे स्टेशनसाठी व सर्विसिंग सेंटर ह्या दोन प्रोजेक्ट साठी जागा संपादित केलेली आहे. सदर जागेचे कलेक्टर मार्फत सर्वे करून सर्व शेतकऱ्यांच्या वारसांना P.A.P म्हणून सर्टिफिकेट व अवार्ड कॉपी देण्यात यावी.
2)भविष्यात प्रकल्पग्रस्तांना उदर निर्वाहासाठी म्हणून रेल्वे स्टेशन मध्ये निघना-या गाळयाचे वाटप सरकारी फि आकारुन करण्यात यावे
3)रेल्वे प्रकल्पासाठी संपादित केलेल्या जमिनीला आजच्या बाजार भावा प्रमाणे जागेची किंमत देण्यात यावी.
4)सदर संपादित जमीनीसाठी 22.50 % व विकसित योजने मध्ये जमिनीचा लाभ द्यावा.
5)विकासाच्या कामामध्ये प्रकल्पग्रस्तांना 50 % कामे वाटप करण्यात यावी.
6)जी घरे 3/2/1990 पूर्वी बांधलेली आहेत त्यांचे पहिले पुनर्वसन करूनच नंतर कामे सुरु करण्यात यावी.
7)रेल्वे प्रोजेक्ट मध्ये निघनारि हाउस कीपिंग मध्ये तसेच गार्डनिंग आणि ऑफिस मध्ये पहिले प्राधान्य PAP च्या वारसांना देण्यात यावे.
8)सिडको माध्यमातून काळा धोंडा हद्दीत जे रेल्वेचे काम सुरु केलेले आहे. त्याबाबतीत सिडको व रेल्वेच्या कार्यालयातर्फे शेतकऱ्यांना कोणतेही नोटिस न देता बेकायदेशिर बांधकाम सुरु केले आहे असे पुन्हा होवु नये.शेतकऱ्यांना कल्पना देउन, नोटिस देउनच इतर कामे सुरु करण्यात यावित.याबाबत २७ ऑक्टोबर रोजी कोटनाका येथे राघोबा मंदिरात  प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांची वरिल विषय व मागण्या संदर्भात बैठक संपन्न झाली. येत्या सहा महिन्यात कलेक्टर मार्फत सर्वे करून सर्व प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना नोटिस बजावन्यात येवून सिडको मार्फत 22.50%  साठी अवॉर्ड कॉपी देण्यात येणार होती मात्र 5 ते 6 वर्षे झाली परंतु आजपर्यंत कलेक्टर मार्फत कोनत्याच जागेचे सर्वे झाले नसुन सिडको तर्फे कोणत्याही स्वरूपाची नोटिस प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना देण्यात आलेली नाही.व अवॉर्ड कॉपीही देण्यात आलेली नाही. परंतु रेल्वेचे काम जोरात सुरु आहे.


अश्या प्रकारे सिडको व रेल्वेच्या माध्यमातून संयुक्तपणे उरण मधील शेतकऱ्यांची महा फसवणूक चालू आहे. हयाबाबत काळा धोंडा हद्दीतील सर्व रहीवाशी व शेतकरी यांच्यामध्ये तीव्र नाराजी पसरली असून ह्या विरोधात येत्या 15 ते 20 दिवसा मध्ये सर्व शेतकरी व प्रकल्पग्रस्तांच्या वतीने सिडको व रेल्वेचे काम पूर्णपणे बंद करण्यात येणार आहे. काम पूर्ण होण्याच्या अगोदर सदर जागेचे कलेक्टर मार्फत व सिडको मार्फत सर्वे करून सर्व प्रकलग्रस्त शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा अन्यथा जे काही  बरे वाईट होईल त्याला सिडको व रेल्वे प्रशासनच जबाबदार राहिल असा इशारा कोटनाका येथील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या आयोजित केलेल्या सभेमध्ये प्रकल्पग्रस्त शेतकरी नवनीत भोईर यांनी दिला आहे. स्थानिक रेल्वे प्रकल्पग्रस्त शेतकरी कृती सेवा संस्था काळा धोंडा या संस्थेचे पदाधिकारी सदस्य, प्रकल्पग्रस्त शेतकरी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 🙏दैनिक प्रजासत्ताक जनता नियमित वाचनासाठी

for latest updates...

Follow this link to join our WhatsApp group:

https://chat.whatsapp.com/Cf2s55RAfdQ0yVYSelRURA