Top Post Ad

 महात्मा गांधी एक विचार असून तो कायम आमच्यात राहणार  - ना.  वडेट्टीवार 

 महात्मा गांधी एक विचार असून तो कायम आमच्यात राहणार  - ना.  वडेट्टीवार 



चंद्रपूर
महात्मा गांधी केवळ अट्टल राजकारणीच नव्हते तर जीवनाच्या विविध पैलूवर त्यांचा चांगलाच प्रभाव होता. ते चांगले समाज सुधारक, कुशल अर्थज्ज्ञ होतेच याबरोबरच त्यांचा उत्कृष्ट जनसंपर्क होता. ज्यावेळी मुद्रण माध्यम इंग्रजांच्या आधिपत्याखाली होते, अशा वेळी गांधीजींनी आपल्या विचारांची लाट गावागावात आणि शहराशहरात पोहचवली. विसाव्या शतकातील सर्वात लोकप्रिय व जगावर प्रभाव टाकणारे व्यक्तिमत्व म्हणून महात्मा गांधींची नोंद संपूर्ण जगाने घेतली आहे. महात्मा गांधी एक विचार असून तो कायम आमच्यात राहणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे मदत व पुनर्वसन आपत्ती व्यवस्थापन इतर मागास बहुजन कल्याण मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी केले. यावेळी पालकमंत्री ना.विजय वडेट्टीवार यांच्या समवेत, खासदार सुरेश उपाख्य बाळू धानोरकर ,माजी प्रधान सचिव तथा काँग्रेस पक्षाचे चंद्रपूर जिल्हा प्रभारी किशोर गजभिये, जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष प्रकाश देवतळे, शर काँग्रेस अध्यक्ष रामू तिवारी,  प्राधान्याने उपस्थित होते.


  चंद्रपूर महानगरपालिकेमध्ये आयोजित कार्यक्रमात त्यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि देशाचे माजी पंतप्रधान लालबहाद्दूर शास्त्री यांच्या प्रतिमेला हार अर्पण करून अभिवादन केले.यावेळी ते म्हणाले, अहिंसेच्या माध्यमातून संपूर्ण जगाला  प्रेम करायला शिकवणारा महात्मा म्हणून  महात्मा गांधींची ओळख आहे. भारतातच नाही तर जगभरात या दोन्ही महान नेत्यांची जयंती साजरी केली जात आहे. केंद्र व राज्य सरकार हे वर्ष महात्मा गांधींचे १५० वी जयंती वर्ष म्हणून साजरे करीत असून या आमच्या आधीची पिढी या महामानवाच्या परीस स्पर्शाने पावन झाली आहे. त्यांची शिकवण ही कायम प्रेरणादायी असून मानवतेच्या इतिहासात अहिंसेच्या मार्गाने त्यांनी दिलेला स्वातंत्र्याचा लढा अजरामर झाला आहे.


‘गांधी नावाची हाडामांसांची व्यक्ती अस्तित्वात होती, यावर नवीन पिढीला विश्वासच बसणार नाही. कारण असा आदर्श पुरुष पुन्हा होणे नाही’ असे सुप्रसिद्ध वैज्ञानिक अल्बर्ट आईन्सस्टाईन, म्हणाले होते. त्या काळात एका वैज्ञानिकाच्यादृष्टीने गांधींचे महत्त्व विषद केले होते. आजच्या काळातही अमेरिकेसारख्या बलाढय़ राष्ट्राचे माजी प्रमुख बराक ओबामा हे सुद्धा गांधींना त्यांचे आदर्श मानतात. यातूनच गांधी विचाराची व्याप्ती स्पष्ट होते. ग्रामस्वराज्य असो की ग्रामोद्योग, व्यक्तिगत आचरण असो की राहणीमान, पर्यावरण, आरोग्य, सर्वधर्म समभाव, एक नव्हे तर अनेक विषयांवर त्यांनी मांडलेली मते आजच्या बदलत्या काळात सुसंगत असल्याचे दिसून येते.


२ ऑक्टोबर हा दिवस जगभरात जागतिक अहिंसा दिवस म्हणून साजरा केला जातो. अहिंसेचा मार्ग अनुसरून स्वातंत्र्य मिळवता येऊ शकते असे महात्मा गांधी यांनी जगाला शिकवले. जेव्हा आपण अहिंसेबाबत बोलतो तेव्हा सर्वप्रथम आपल्याला 'बापू' हे नाव आठवते. महात्मा गांधी यांनी केवळ भारतालाच नव्हे, तर संपूर्ण जगाला अहिंसेचा अर्थ समजावून सांगितला. अहिंसा ही एक व्यक्तीगत सवय असून कोणत्याही परिस्थितीत स्वत:ला किंवा दुसऱ्याला नुकसान पोहोचवले जाऊ नये असा यामागचा उद्देश आहे, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. खासदार बाळू धानोरकर यांनी देखील या वेळी महात्मा गांधी यांना आदरांजली व्यक्त केली.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com