Trending

6/recent/ticker-posts

कसं कसं घडलं उरणचे प्रकाशन संपन्न
" कसं कसं घडलं उरण !"चे प्रकाशन


 

उरण 
           कोकणातील सुप्रसिध्द साहित्यिक रायगडभूषण प्रा.एल.बी.पाटील यांच्या " कसं कसं घडलं उरण " या पुस्तकाचं प्रकाशन समर्थ दास मेघशाम भगत यांच्या शुभहस्ते झाले.  प्रा.एल बीचे हे 33 सा वे पुस्तक आहे. या प्रसंगी आपले मनोगत व्यक्त

करताना रायगडभूषण प्रा.एल.बी.म्हणाले की "उरण तालुका हा मागील 25/30 वर्षात प्रचंड वेगाने बदललेला आहे.जुन्या पिढीलाही हा बदल आश्चर्यजनक वाटत आहे आणि आजच्या नव्या पिढीला भूतकाळ  न अनुभवल्यामुळे तो चकचकीत केवळ आनंद घेत आहे. त्याला आणि येणा-या पिढ्यांना मागचही  वैभवशाली उरण आजच्या बदलात दाखवायचे आहे".

कोरोनाच्या दिवसात कौटुंबिक वातावरणात देखणा सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला.यावेळी गंधार पाटील,धर्मेन्द्र कडू,विनय तांडेल,संगीता भगत,श्रेया तांडेल इत्यादींनी लेखकाला सदिच्छा दिल्या.कार्यक्रमाचे सुरेख सूत्रसंचालन भैरवी पाटील यांनी केले आणि कविलेखक गुंजार पाटील यांनी आभार मानले.

--------------------------------------------------------------------

 

 

उरणमध्ये धम्म चक्र प्रवर्तन दिन साजरा.


 

उरण

बौध्दजन पंचायत समिती उरण शाखा नं ८४३ उरण बौध्द वाडी येथे ६४ वा धम्म चक्र प्रवर्तन दिन साजरा करण्यात आला.यावेळी  नगरसेवक रवी भोईर,नगरसेवक कौशिक शहा,  उद्योगपती जितेंद्र पडते,उद्योजक राजेंद्र पडते, निलेश पाटील भा ज प उरण शहर अध्यक्ष,समाजसेवक हितेश शहा,बौद्धजन पंचायत समितीचे अध्यक्ष-प्रकाश कांबळे,चिटणीस विजय पवार,सहचिटणीस रोशन गाढे, विनोद कांबळे, मारुती तांबे, बौध्दचारी महेंद्र साळवी, प्रमोद कांबळे,हर्षद कांबळे, आखिलेश जाधव, धनाजी ठाकुर, विजय भिंगावडे आदि समितीचे पदाधिकारी सदस्य उपस्थित होते.दरवर्षी प्रमाणे याही वर्षी धम्मचक्र प्रवर्तन दिन मोठ्या उत्साहात यावेळी साजरा करण्यात आला.


 

   

  

Post a Comment

0 Comments