सक्ती व बेशिस्त कर्जवसुली थांबवा अन्यथा हातपाय तोडू:- पँथर डॉ राजन माकणीकर
मुंबई
कोरोना महामारी संसर्गजन्य आजाराच्या पार्श्वभूमीवर वित्तीय संस्थांनी सक्त बेशिस्त दमनकारी कर्जवसुली थांबवावी अन्यथा शारीरिक व मानसिक छळ करणाऱ्या वसुली गुंडाचे हातपाय तोडू असा सणसणीत इशारा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रॅटिक पक्षाचे राष्ट्रीय महासचिव व पँथर ऑफ सम्यक योद्धा या सामाजिक संघटनेचे संस्थापक महासचिव पँथर डॉ राजन माकणीकर यांनी वित्त मंत्रालयाला ईमेलद्वारे दिला आहे.
प्रसिद्दीस दिलेल्या पत्रकात असे म्हटले आहे की, जगासह संपूर्ण भारतात व महाराष्ट्रात कोविड 19 चा प्रादुर्भाव होऊन सरकारने 23 मार्चपासून प्रतिबंधात्मक उपाय म्हणून लॉकडाउन केला, यामध्ये छोटे-मोठे उद्योग, शेती जोडधंदे, व्यवसाय , दळणवळण, आर्थिक व्यवहार बंद होऊन अनेक संसारे उध्वस्त झाली आहेत, मंदी मूळे अनेकांचे रोजगार गेले यामुळे देशातील बहुतांश जनता आर्थिक संकटात सापडली आहे, कोणतेच उत्पन्न नाही आणि त्यात गॅसबिल विद्युतबील मेंटेनन्स, घर व नळपट्टी व अन्य दैनंदिन जवाबदाऱ्या शिवाय वाढती महागाई यामुळे जनता हवालदिल झाली आहे.
या परिस्तिथी मध्ये बऱ्याच कर्जदारांना उत्पन्नाचे साधन नसल्यामुळे, व्यवसाय शेती व पूरक उद्योगधंदे अडचणीत आल्यामुळे कर्जाचे मासिक हप्ते भरण्यास कर्जदार असमर्थ ठरत आहेत.
वित्तीय संस्थांना कर्ज वसुली करणे विधीसंमत असले तरी अभूतपूर्व आर्थिक परिस्तिथी लक्षात घेता वसुलीसाठी मानहाणीच्या वसुली करणे, वारंवार तगादा लावणे, बळाचा वापर करणे, धमकावणे, अर्वाच्य भाषेत बोलणे व शिवीगाळ करणे, फोन करणे अशाप्रकारचे प्रकरणे आमच्या निदर्शनात आले आहेत, यामुळे कर्जदार हतबल होऊन आत्महत्या करण्यास प्रवृत्त होऊ शकतो (?) अश्यावेळी त्याच्या परिवाराचे काय? असा प्रश्न डॉ माकणीकर यांनी उभारला आहे.
वित्तीय संस्थांवर आवश्यक ते निर्बंध आणून सक्तीची वसुली थांबवली पाहिजे किंबहुना पुढे 6 महिने पर्यंत सरसकट वसुली थांबवून कर्जदाराला कर्जभरण्या ईतपत सक्षम होण्यासाठी वेळ देने आवश्यक असल्याचेही डॉ माकणीकर यांनी सांगितले.
सरकारने त्वरित यावर कारवाई करून वित्तीय संस्थांनी कर्जदारांना 6 महिने मुभा देण्याचे निर्देश जारी करावेत अन्यथा हताश झालेला कर्जदार सक्तीने कर्ज वसुली करणाऱ्या गुंडाचे हातपाय तोडल्याखेरीज गप्प बसणार नाही असाही इशारा डॉ. माकणीकर यांनी दिला.
कर्जदाराला कोणती वित्तीय संस्था व संस्थेचे वसुली गुंड त्रास देत असतील तर अस्यांनी आरपीआय डेमोक्रॅटिक पक्षाचे महाराष्ट्र राज्य सचिव व पँथर ऑफ सम्यक योद्धच्या संस्थापक कार्याध्यक्ष पँथर श्रावण गायकवाड यांच्याशी संपर्क साधावा जेणेकरून सम्यक योद्धा अध्यक्ष पूज्य भदंत शिलबोधी व राष्ट्रीय युवाध्यक्ष कनिष्क कांबळे आरपीआय यांच्या मार्गदर्शनाखाली कर्जदाराला पुरेसे संरक्षण पुरविण्यात येईल. असा आशावाद डॉ माकनीकर यांनी व्यक्त केला आहे.
0 टिप्पण्या