Top Post Ad

सर्व नियम पाळून शिवसेनेचा दसरा मेळावा होणार

सर्व नियम पाळून शिवसेनेचा दसरा मेळावा होणारच



मुंबई
कोरोनामुळे यंदाचा शिवसेनेचा दसरा मेळावा हा ऑनलाइन घेण्यात येईल अशा चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू होत्या. मात्र या सर्व चर्चांना शिवसेना खासदार संजय राऊतांनी पूर्णविराम दिला.  राज्यभरात कोरोनाचा प्रादुर्भाव सुरुच आहे. खबरदारी म्हणून राज्यभरात सार्वजनिक कार्यक्रम घेणे टाळले जात आहेत. त्यामुळे आता शिवसेनेचा यंदाचा दसरा मेळावा ऑनलाइन होणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या. मात्र आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे भाषण हे व्यासपीठावरुनच होणार असल्याचे संजय राऊतांनी स्पष्ट केले आहे. टीव्ही 9 या वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी हे स्पष्ट केले आहे.


कुणी सांगितले की, शिवसेनेचा दसरा मेळावा ऑनलाइन होईल? उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री असले तरी ते पक्षप्रमुख आहेत. त्यामुळे त्यांचे भाषण हे व्यासपीठावरूनच होईल. त्याबाबत सकारात्मक चर्चा सुरू आहे. असे म्हणत संजय राऊतांनी दसरा मेळावा व्यासपीठावरुनच होण्याविषयी संकेत दिले आहेत. दसरा मेळावा हा शिवसेनेची अनेक वर्षांपासून सुरू असलेली परंपरा आहे. मात्र यंदा कोरोनामुळे ही परंपरा ऑनलाइन पध्दतीने सुरू ठेवण्यात येणार असल्याचे बोलले जात आहे. याविषयी वृत्तवाहिनीशी बोलताना राऊत म्हणाले की, सांस्कृतिक आणि राजकीयदृष्ट्या हा मेळावा महत्त्वाचा आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सगळ्या गोष्टी ऑनलाइन होत आहेत. मात्र मी आजच वाचले की पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बिहारमध्ये 12 सभा घेणार आहेत. त्या कशाप्रकारे सभा घेतात त्याचा आम्ही अभ्यास करणार आहोत. सर्व नियम वगैरे पाळूनच सभेचे आयोजन करण्यात येईल.





येत्या २५ ऑक्टोबरला दसरा आहे. हा दसरा मेळावा समाज माध्यमाच्या माध्यमातून होणार आहे.  यंदाचा दसरा मेळावा हा ऑनलाईन घेण्याचे ठरविण्यात आले आहे.  कोरोना संकटामुळं यंदाचा शिवसेनेचा दसरा मेळावा अपेक्षेप्रमाणे ऑनलाईन होणार आहे. शिवसेनेच्या इतिहासात पहिल्यांदाच दसरा मेळावा हा ऑनलाईन घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दरवर्षी शिवाजी पार्कवर होणाऱ्या दसरा मेळाव्याला हजारो शिवसैनिक उपस्थित असतात. मात्र कोरोनामुळं यंदा दसरा मेळावा होणार नाही, दसरा मेळाव्याची शिवसेनेची परंपरा मोठी आहे. महाराष्ट्र राज्यात ठाकरे घराण्यातील पहिलीच व्यक्ती मुख्यमंत्रीपदी विराजमान झाली आहे. त्यामुळे हा आनंदोत्सव साजरा करण्यासाठी दसरा मेळावा धुमधडाक्यात साजरा करण्याचे नियोजन करण्यात आले होते. मात्र, कोरोनामुळे होणारी गर्दी लक्षात घेवून हा मेळावा रद्द करण्यात आल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्यामुळे राऊत यांनी यावर स्पष्टीकरण केले आहे. 





 

 

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com