हाथरस घटनेच्या निषेधार्थ काँग्रेसचे सत्याग्रह आंदोलन

हाथरस घटनेच्या निषेधार्थ काँग्रेसचे सत्याग्रह आंदोलन


ठाणे


उत्तर प्रदेशातील हाथरसच्या घटनेने देशाला शरमेने मान खाली घालायला लावली असून हे प्रकरण योगी सरकारने अत्यंत बेजबाबदारपणे पद्धतीने हाताळण्यात आल्याचा आरोप काँग्रेने केला आहे. तसेच हाथरसच्या पीडित कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी प्रदेश काँग्रेसच्या वतीने सोमवारी (दि. ५) राज्यभरात सत्याग्रह करण्याची भूमिका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी घेतली होती. त्यानुसार आज मिरा-भाईंदर येथे आंदोलन करण्यात आले या आंदोलनात अनेक नागरिक आणि पक्षाचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. याच पार्श्वभूमीवर  ठाणे शहर काँग्रेस कमिटीच्या पदाधिका-यांनी ठाणे काँग्रेसच्या मध्यवर्ती कार्यालयाबाहेर शहराध्यक्ष अॅड विक्रांत चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली सत्याग्रह करण्यात आला, कार्यकर्त्यानी हाताला काळे पट्ट्या  बाधून या सत्याग्रहात सहभागी होउन मूक निदर्शने केले या प्रसंगी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे रत्नागिरी जिल्हा प्रभारी मनोज शिंदे,माजी गटनेते संजय घाडीगावकर,शहर काँग्रेस सरचिटणीस व प्रवक्ते सचिन शिंदे,काँग्रेस नेते रविंद्र आग्रे,सेवादल काँग्रेस अध्यक्ष शेखर पाटील, महिला काँग्रेस अध्यक्षा शिल्पा सोनोने प्रदेश काँग्रेस सदस्य. शहर काँग्रेस पदाधिकारी व सर्व विभाग अध्यक्ष, ब्लाॅक अध्यक्ष सहभागी झाले होते. भाजपशासीत राज्यात महिला व मुली सुरक्षित नाहीत. ‘बेटी बचाओ’चा नारा देणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी मात्र मूग गिळून गप्प आहेत. काँग्रेस पक्ष उत्तर प्रदेशातील भाजपाच्या अहंकारी सरकारला जाब विचारण्यासाठी व पीडितेला न्याय मिळवून देण्यासाठी सोमवारी राज्यव्यापी सत्याग्रह करण्यात आला.  योगी आदित्यनाथांच्या अहंकारी व हुकुमशाही प्रवृत्तीने लोकशाहीची लक्तरे वेशीवर टांगली आहेत. काँग्रेस नेते राहुल गांधी व सरचिटणीस प्रियंका गांधी यांना हाथरसला जाताना धक्काबुक्की करण्यात आली. उत्तर प्रदेश सरकारच्या या दडपशाहीचा निषेध करत महाराष्ट्रासह देशभरात काँग्रेस कार्यकर्ते रस्त्यावर उतरले. शेवटी भानावर आलेल्या युपी सरकारने राहुल व प्रियंका यांना पीडित कुटुंबाला भेटण्याची परवानगी दिली. पीडित कुटुंबीयांना भेटून जाताना काँग्रेस कार्यकर्त्यांवर लाठीहल्ला करण्यात आला. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांच्या कपड्याला हात घालण्यापर्यंत मस्तवाल पुरुष पोलिस अधिकाऱ्यांची मजल गेली. महिलांबद्दल योगी आदित्यनाथ सरकारची मानसिकता किती हीन पातळीची आहे, हेच यातून दिसले. हा सत्तेचा माज असून भाजपाचा हा माज जनता उतरवल्याशिवाय राहणार नाही, असे बाळासाहेब थोरात म्हणाले.


 

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad