Top Post Ad

ठाण्यातील जलवाहतुक प्रकल्प लवकरच मार्गी लागणार  

ठाण्यातील जलवाहतुक प्रकल्प लवकरच मार्गी लागणार  


 

ठाणे

प्रवासाचा ताण पाहता जलवाहतूक एक प्रभावी पर्याय म्हणून आणि महापालिकेस ३२ किमी लांबीचा खाडीकिनारा उपलब्ध असल्याने त्याचा अंतर्गत जलवाहतुकीसाठी वापर करता येईल असा अहवाल ठाणे महानगरपालिकेने २०१६ साली केंद्राकडे सादर केला होता. यामध्ये वसई -ठाणे - कल्याण हा ५४ किमी लांबीचा जलवाहतूक मार्ग प्रस्तावित असून यामध्ये १० ठिकाणी जेट्टी बांधून सुविधा पुरविण्याचा प्रस्ताव आहे. तसेच दुसऱ्या टप्प्यात ठाणे - मुंबई व ठाणे - नवी मुंबई या दोहो जलवाहतूक मार्गाचे देखील नियोजन करण्यात आले आहे. यामध्ये ठाणे - मुंबई १० ठिकाणी व ठाणे - नवी मुंबई ८ ठिकाणी जेट्टींचा समावेश आहे. आणखी ज्याप्रकारे मुंबई मांडवा फेरी व रोरो सेवा सुरु आहे. तसेच नवी मुंबई - मांडवा व नवीमुंबई ते गेट वे आफ इंडिया (मुंबई) हा मार्ग प्रस्तावित आहे. याबाबत शनिवार दि.२८ एप्रिल २०१८ रोजी तत्कालिन महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांच्यासोबत झालेल्या बैठकीत वसई-ठाणे-कल्याण या 54 किमी लांबीच्या जलवाहतूक मार्गाला तसेच कोलशेत येथे मल्टीमोड ट्रान्सपोर्ट हब व 9 ठिकाणी जेट्टी बांधून अनुषंगिक सुविधा पुरविण्यास शासनातर्फे तत्वत मंजुरी देण्यात आली असल्याचे जाहीर करण्यात आले होते.

 

त्यानंतर तब्बल दोन वर्षानंतर ५ ऑक्टोबर २०२० रोजी केंद्रीय जल बांधणी राज्यमंत्री मनसुख मांडवीया यांनी महाराष्ट्रातील अंतर्गत जलवाहतूक विकास कामांच्या प्रगतीबाबत ऑनलाईन बैठक घेतली. सदर चर्चेमध्ये ठाणे, मुंबई नवी. मुंबई, कल्याण-डोंबिवली, वसई-विरार,  मीरा भाईंदर व भिवंडी या ७ महानगरपालिका क्षेत्रातील जलवाहतूक मार्ग क्रमांक 53 ठाणे-मुंबई, ठाणे-नवी मुंबई या दोहो मार्गाबाबत माहिती देताना ठाणे महानगरपालिका देशभरातील प्रथम महानगरपालिका आहे. ज्या महापालिकेने सुमारे 21 कोटी रुपये खर्च करून सविस्तर प्रकल्प अहवाल सादर करून संबंधित प्रकल्प लवकरात लावकर मान्य करून सुरु करण्याची विनंती केली आहे. केंद्रीय मंत्र्यांनी या कामी दुजोरा देताना या सर्व प्रकल्पाचे सादरीकरण आपणाकडून झाले आहे व महाराष्ट्रातील जल मार्ग विकास प्रकल्पांना केंद्र शासन व राज्य शासनाच्या संयुक्त विद्यमाने निधी उपलब्द करावयाचा असून केंद्र शासन महाराष्ट्रासाठी केंद्रीय निधी राखून ठेवला आहे असे सांगितले. यातून वरील जलमार्गातील जेट्टीचे काम होणार आहे व संचलनाचे काम पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप मध्ये ऑपरेटरची नियुक्ती करून राज्य शासनामार्फत करण्याचे नियोजन केले आहे. तसेच महाराष्ट्रातील या जलमार्गावर पुढील पावसाळ्यापूर्वी म्हणजेच जून 2021 पूर्वी सर्व सुविधांसह फेरीबोट सुरू होणार असे माननीय केंद्रीय जल बांधणी  राज्यमंत्री मनसुख मांडवीयानी आश्वासन दिले. 


 नवी मुंबई येथील नेरूळ जवळ जेट्टी बांधकाम सुरू असून मांडवा ते मुंबई या धर्तीवर मांडवा ते नेरूळ फेरी सुरू करणे बाबत केंद्र शासनाने पुढाकार घ्यावा अशी सूचना यावेळी केली. याबाबत केंद्रीय मंत्र्यांनी सदर काम लवकरात लवकर मार्गी लावून संबंधित जेट्टी वरून लवकरच बोट सुरु होणार असून  संबंधित सर्व प्रकल्पांना गती मिळावी व प्रकल्प पूर्णत्वास यावा यासाठी केंद्रीय मंत्री महोदयांना आपल्या स्तरावर बैठक आयोजित करावी अशी विनंती केली असता त्यासाठी लगेच केंद्रीय मंत्र्यांनी मान्यता दिली.

 

दोन वर्षापूर्वी २८ एप्रिल २०१८ रोजी  ठाणे महानगरपालिका अंतर्गत वाढत जाणार्या वाहतूक समस्येला पर्याय म्हणून स्वस्त आणि पर्यावरणपूरक पर्यायी अंतर्गत जलवाहतुकीबाबत चर्चा करण्यासाठी तसेच ठाणे शहर अंतर्गत मेट्रो अशा दोन्ही  प्रकल्पांच्या एकात्मिक अंतिम मार्गिका आराखड्याचे सादरीकरण  महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांच्यासमोर करण्यात आले होते. या बैठकीला महाराष्ट्र मेट्रोचे सह महाप्रबंधक मनोज दंडारे, वैयक्तिक जलद वाहतूक यंत्रणा(पीआरटीएस)साठी अल्ट्रा फेअरवुडस् इंडिया लि. या कंपनीचे सहयोगी संचालक प्रफुल्ल चौधरी, नगर अभियंता अनिल पाटील, शहर विकास विभागाचे सहा. संचालक देशमुख, कार्यकारी अभियंता मोहन कलाल आदी उपस्थित होते.  यावेळी जयस्वाल यांनी महाराष्ट्र मेट्रो, अंतर्गत मेट्रोसह वैयक्तिक जलद वाहतूक यंत्रणा यांचा अंतीम एकत्रित मार्गिका आराखडा सुचविण्यात आलेल्या बदलांसह पुढील बैठकीत सादर करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.  वसई-ठाणे-कल्याण या 54 किमी लांबीच्या जलवाहतूक मार्गाला तसेच कोलशेत येथे मल्टीमोड ट्रान्सपोर्ट हब व 9 ठिकाणी जेट्टी बांधून अनुषंगिक सुविधा पुरविण्यास शासनातर्फे तत्वत मंजुरी देण्यात आली.

 

वसई, मिरा भाईंदर, घोडबंदर, नागला काल्हेर, अंजूर दिवे, पारसिक, डोंबिवली (ठाकुर्ली) व कल्याण या भागातून ही जलवाहतूक होणार आहे. यामुळे रस्त्यावरिल रहदारीचा सुमारे 20 टक्के भार हलका होणार आहे. तर जलमार्गाचा वापर केल्याने 33 टक्के इंधन बचत आणि 42 टक्के प्रदूषणास आळा बसणार आहे. यामुळे ठाणे शहरातच नव्हे तर लगतच्या मिरा भाईंदर, वसई विरार, भिवंडी-निजामपूर, कल्याण-डोंबिवली, नवी मुंबई व मुंबई यामधील महापालिका क्षेत्रात वाहतूक कोंडी होते. यावर पर्याय म्हणून वेळ आणि इंधनाची बचत होऊन वाहतुकीसाठी 32 किलो मिटरचा लांबीचा किनारा उपलब्ध असल्याने त्याचा अंतर्गत जल वाहतुकीसाठी वापर करता येणार आहे. या टप्प्याचा खर्च सुमारे 661 कोटी रुपये एवढा असणार आहे. मेरी टाईम बोर्ड, ठाणे, मिरा-भाईंदर, वसई- विरार, भिवंडी-निजामपूर, कल्याण-डोंबिवली महानगर पालिका इत्यादी संस्थांची कंपनी स्थापन करुन त्यासाठी संयुक्त करार करुन प्रकल्पाची अंमलबजावणी होणार असल्याचे बैठकीत स्पष्ट करण्यात आले होते. 

 

 

 

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com