करोना काळातील हाल आणि गैरप्रकार यावर चर्चा, ३१ ऑक्टो सायं ७ वाजता, ऑनलाईन
करोना काळातील हाल आणि गैरप्रकार यावर चर्चा, ३१ ऑक्टो सायं ७ वाजता, ऑनलाईन

 


ठाणे

गेल्या सात महिन्यात करोनाच्या साथीने थैमान घातले, अनेकांना संसर्ग झाला. सरकारी यंत्रणा पण या काळात ढासळली म्हणून खूप त्रास झाला, प्रचंड मनस्ताप झाला. अनेकांचे आई, बाबा, मुलगा, मुलगी, काका, मामा, मावशी, आजी आजोबा असे जिवलग नातेवाईक मृत्यू पावले, आजार जीवघेणा होताच पण....

या सगळ्या प्रकाराचं रोख ठोक विश्लेषण आपण कधी करणार ? हे का झालं?? आमच्या जिवलगांच्या मृत्यूला जबाबदार कोण ? फक्त व्हायरस ? सरकारने आपले कर्तव्य योग्य रीतीने निभावले का ? औषधांचा काळा बाजार का झाला ? सरकारी यंत्रणा ढेपाळली का ? आरोग्य व्यवस्थाच गंभीर आजारी पडली आहे का ? खुलेआम रुग्णांची लूट का झाली ? पैसा खर्च करूनही त्रास का झाला ? मृतदेह बघू न देणे, प्लास्टिक उघडू न देणे, यामुळे काही प्रतिथयश रुग्णालयांत किडनी, लिव्हर, डोळे काढण्याचे अमानवी प्रकार झाले हे खरं आहे का ? काही खाजगी रुग्णालयात चालत गेलेले धडधाकट रुग्ण दोन दिवसात मृत्यू पावले याची चौकशी होऊ शकेल काय ? आजार जीवघेणा होता तरी फार कमी राजकारणी...
 

आमच्या मते.. महाराष्ट्रातील, भारतातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्था खूप ढासळली आहे - आजारी पडली आहे, सरकारे बजेट मध्ये 3 टक्के देखील खर्च करीत नाही म्हणून पाकिस्तान, अफगाणिस्थान पेक्षा भारतातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्था भकास आहे, खाजगी व्यवस्था खुलेआम् लुटणारी आहे आणि या साथीच्या काळात सरकारी आरोग्य व्यवस्था पार ढेपाळली आणि खाजगी व्यवस्थेने परिस्थितीचा, रुग्णांच्या हताश स्थितीचा प्रचंड फायदा घेतला, बहुसंख्य खाजगी इस्पितळात लूट झाली.. सरकारी यंत्रणेने जाणून बुजून त्याकडे दुर्लक्ष केले.. ही सर्व परिस्थिती योग्य रीतीने हाताळता आली असती पण ....

यावर चर्चा होणे गरजेचे आहे, विश्लेषण करायलाच हवे, देशातील आरोग्य व्यवस्था सुधारायलाच हवी, पण सरकार, अधिकारी व राजकारणी हे बोलत नाहीत..

 

सर्वांना माफक दरात (खरं तर मोफत) व आधुनिक उपचार देणारी आरोग्य व्यवस्था हे सरकारचे कर्तव्य आणि नागरिकांचा अधिकार आहे, म्हणून आम्ही गावोगाव रुग्णांना झालेल्या त्रासाला वाचा फोडण्यासाठी व भविष्यात देशात, राज्यात व गावागावांत सर्वंकष सक्षम आरोग्य व्यवस्था कशी येईल, त्यासाठी काय करायला हवे हा विचार करण्यासाठी येत्या काही महिन्यात अनेक रुग्ण हक्क परिषदा घेणार आहोत, त्याची सुरुवात 31 ऑक्टोबर ठाण्यात ऑनलाईन रुग्ण हक्क परिषद घेऊन करीत आहोत

शनिवारी 31 ऑक्टोबर रोजी संध्या 6 वाजता होणाऱ्या या रुग्ण हक्क परिषदेत रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांनी बोलावे, त्रास काय झाला ते सांगावे व ही परिस्थिती का आली व ती सुधारावी म्हणून काय करावे, ज्या रुग्णांना भरमसाठ बिल आले, त्यांना महात्मा फुले जन आरोग्य योजनेतून पूर्ण परतावा मिळावा, यासाठी काय करता येईल, याची चर्चा होईल, यातून एक मोठे जनआंदोलन उभे राहावे ही आमची दिशा असेल

 


 


ही परिषद कशासाठी ??  

-1- जास्त बिले आलेल्यांना सरकारने म. फुले जन-आरोग्य योजनेअंतर्गत पूर्ण भरपाई द्यावी म्हणून...

-2- प्रचंड मनस्ताप झालेल्या सामान्य नागरिकांना  झालेल्या त्रास व अन्यायाला वाचा फुटावी म्हणून...

-3- सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेत सुधारणा व्हावी व खाजगी रुग्णालयांच्या लुटीवर चाप बसावा म्हणून... 

आपण बोलायलाच हवे, प्रश्न उपस्थित करायलाच हवे तरच जनतेचा दबाव वाढेल, खाजगी डॉक्टरांची लूट थांबेल व सरकारी आरोग्य व्यवस्था सुधारेल... गप्प राहून प्रश्न सुटत नाही


करोना काळातील हाल आणि गैर प्रकार यावर चर्चा आणि सक्षम व मोफत सार्वजनिक आरोग्य व्यवस्थे साठी मंथन व मार्गदर्शन. सहभाग - डॉ महेश बेडेकर, डॉ विकास हजरनीस, डॉ अभय शुक्ला (जन-आरोग्य अभियान) 


 रुग्णांनी व नातेवाईकांनी 9867100199/ 7045793416 या नंबरवर संपर्क साधावा


रुग्ण हक्क परिषद, ठाणे

शनि 31 ऑक्टो संध्या 6 वाजता, ऑनलाईन खालील लिंकवर क्लिक करून सामील व्हा, बोला आणि इतरांचे ऐका, चला विचार करुया आरोग्य व्यवस्था सुधारण्यासाठी.....हाच कार्यक्रम  फेसबूक पेजवर थेट - http://www.facebook.com/Thane.Matdata

 

ज्यांना करोना काळात जास्त बिले आली, ज्यांची फसवणूक झाली अशी भावना आहे किंवा सरकारी अनास्थेचा ज्यांना प्रचंड राग आला आहे, ही व्यवस्था सुधारली पाहिजे असे ज्यांना वाटते अशा तुमच्या संपर्कातील रुग्ण किंवा त्यांच्या नातेवाईकांना संदेश पाठवा,

उन्मेष बागवे, अध्यक्ष (ठाणे मतदाता जागरण अभियान) 7045793416

 


 

   
  टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 🙏दैनिक प्रजासत्ताक जनता नियमित वाचनासाठी

for latest updates...

Follow this link to join our WhatsApp group:

https://chat.whatsapp.com/Cf2s55RAfdQ0yVYSelRURA