नवी मुंबई महापालिका रुग्णालयातील कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलननवी मुंबई महापालिका रुग्णालयातील कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन

 

नवी मुंबई
उपचाराकरिता महापालिका रुग्णालयात आणलेला रुग्ण दगावल्याने संतप्त नातेवाईकांनी रुग्णालयात घुसून तोडफोड केल्याची घटना बुधवारी पहाटेच्या सुमारास घडली. डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांच्या दुर्लक्षितपणामुळे रुग्णाचा मृत्यू झाल्याचा आरोप करीत या नातेवाईकांनी डॉक्टरांसह  नर्स , वाॅर्डबाॅय व इतर कर्मचाऱ्यांना मारहाण केली.  याप्रकरणी पोलिसांनी काही नातेवाईकांना ताब्यात घेतले आहे. डॉक्टरांवर झालेल्या या हल्ल्याचा निषेध करत नवी मुंबई महापालिका रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन केले आहे. रुग्णालयातील कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी पोलीस बंदोबस्ताची मागणी करण्यात आली आहे.मंगळवारी दुपारी नवी मुंबईतील जुहूगाव येथील 48 वर्षीय व्यक्तीला अत्यवस्थ अवस्थेत वाशी येथील पालिका रुग्णालयातील नॉन कोविड विभागात दाखल केले होते. तत्पूर्वी रुग्णावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र मंगळवारी मध्यरात्री अडीच वाजता रुग्णाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. ही माहिती रुग्णाच्या नातेवाईकांना कळवताच ते संतप्त झाले व त्यांनी  बुधवारी पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास पालिका रुग्णालयावर हल्ला केला. तसेच सुरक्षारक्षक, परिचारिका आणि डॉक्टरांनाही मारहाण करत त्यांनी रुग्णालयाची तोडफोड केली. अशी माहिती रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी दिली आहे. नातेवाईकांनी केलेल्या हल्ल्यात रुग्णालयाचे कर्मचारी जखमी झाले आहेत. या घटनेची माहिती मिळताच वाशी पोलिसांनी त्याठिकाणी धाव घेतली. त्यानंतर घटनास्थळावरून काही नातेवाईकांना ताब्यात घेण्यात आले आहे.


 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 🙏दैनिक प्रजासत्ताक जनता नियमित वाचनासाठी

for latest updates...

Follow this link to join our WhatsApp group:

https://chat.whatsapp.com/Cf2s55RAfdQ0yVYSelRURA