वंचित बहुजन महिला आघाडीच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयावर निषेध आंदोलन

वंचित बहुजन महिला आघाडीच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयावर निषेध आंदोलनमुंबई


उत्तर प्रदेशात महिलांवर वाढत असलेल्या हिंसाचाराबद्दल वंचित बहुजन आघाडीच्या महिला अध्यक्षा सीमा तांबे  बोध्दजन पंचायत समिती सचिव भगत, अनिल शिवराम कासारे, अंधेरी तालुका अध्यक्ष शैलेश मोरे  यांनी याबाबत आपला तीव्र संताप व्यक्त केला आहे. हाथरसमधील दलित युवतीच्या सामूहिक बलात्कार व हत्येचे निर्घृण कृत्य करणाऱ्यांच्या विरोधात जास्तीत जास्त कडक कारवाई करण्याची मागणी करण्यासाठी ५ सप्टेंबर रोजी उपनगरीय जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन करण्यात आले. 


उत्तर प्रदेश हे राज्य महिलांच्या विरुद्ध होणाऱ्या गुन्ह्यांचे साम्राज्य बनले असून, अपहरण, बलात्कार आणि हत्या हा तिथला नित्यक्रम बनला आहे. उत्तर प्रदेशात गुन्हेगारांना मिळणाऱ्या राजकीय आश्रयामुळे तिथे जंगलराज निर्माण झाले असून गुंड उघडपणे फिरत असतात. उन्नाव प्रकरणाच्या वेळेस सीबीआयने स्पष्ट विधान केले होते की दोन आयपीएस आणि एक आयएएस अधिकारी कर्तव्यात कसूर केल्याचे दोषी असून त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. पण उत्तर प्रदेशच्या राज्य सरकारने अजूनही त्यांच्यावर कोणतीही कारवाई न करून गुन्हेगारांना हा संदेशच दिला आहे की महिलांविरुद्धच्या गुन्ह्यांना जास्त गांभिर्यांने घेण्याची गरज नाही. याविरोधात तात्काळ कारवाई व्हावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad