Top Post Ad

द्रोणागिरी किल्ल्यावर दसरा उत्साहात साजरा




द्रोणागिरी किल्ल्यावर दसरा उत्साहात साजरा


 

उरण 

दरवर्षी प्रमाणे याहीवर्षी नवपरिवर्तन ग्रुप, दुर्गमावळा प्रतिष्ठान, सह्याद्रि प्रतिष्ठान, छत्रपती शिवाजी महाराज सेना, शिवप्रतिष्ठान संघटना-कोप्रोली, शिवा अखिल भारतीय वीरशैव युवक संघटना, जरि मरि आई नवरात्रोत्सव मंडळ-भेंडखळ या संघटने मार्फत उरण तालुक्यातील ऐतिहासिक व धार्मिक पार्श्वभूमी असलेल्या द्रोणागिरी किल्ल्यावर विविध उपक्रम साजरे करून दसरा सण साजरा करण्यात आला. दसरा सणाचे औचित्य साधुन अनेक दिवसांपासून दुर्गमावळा प्रतिष्ठान, नवपरिवर्तन ग्रुप, सह्याद्रि प्रतिष्ठान आदि संघटनेच्या माध्यमातून साफसफाई करण्याचे काम चालू होते.

 

दसरा या सणानिमित्त सकाळी द्रोणागिरी किल्ल्याच्या इतिहासाची माहिती सांगणारे माहिती फलकाचे अनावरण शिवशाहीर रायगड भूषण वैभव घरत यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी प्रवेशद्वारचे नवीन ऊभारणीच्या कामा संदर्भात प्रत्येक शिवभक्तांना माहिती देण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज यांचे कार्य व विचारांवर आधारित अतिशय सुंदर पोवाडा शिवशाहीर तथा रायगड भूषण वैभव घरत यांनी सर्वां समोर सादर केले.अनेक शिव भक्तांनी देशभक्तिपर गाणी,शिवरायांवर गाणी गायली. तर काही शिव भक्तांनी शिवाजी महाराजांवर त्यांच्या पराक्रमावर कथा सादर केली.

 

दस-याचे औचित्य साधुन छत्रपती शिवाजी महाराज सेना व शिवप्रतिष्ठान उरण तालुका तर्फे पर्यावरणाचे संरक्षण व संवर्धन करण्याच्या दृष्टिकोणातुन किल्ल्यावर वृक्षारोपण करण्यात आले.जरी मरी आई नवरात्रोत्सव मंडळ भेंडखळ यांच्या तर्फे सह्याद्रि प्रतिष्ठान या संघटनेला किल्ल्यावर साफसफाई करण्यासाठी घमेले, हैंडगलौज,फावडे,टिकाव(कुदळ)आदि सामान भेट स्वरूपात सामाजिक बांधिलकितुन देण्यात आले. तसेच आर्थिक सहकार्यही केले.नेहमी प्रमाणे, प्रथेप्रमाणे दरवर्षी प्रमाणे याहीवर्षी विविध सामाजिक, धार्मिक उपक्रमांने द्रोणागिरी किल्ल्यावर दसरा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

 

यावेळी द्रोणागिरी किल्ल्यावर दुर्गमावळा प्रतिष्ठान, सह्याद्रि प्रतिष्ठान, नवपरिवर्तन ग्रुप, छत्रपती शिवाजी महाराज सेना हिंदुस्तान, शिवप्रतिष्ठान उरण तालुका, जरी मरी आई नवरात्रोत्सव मंडळ भेंडखळ, शिवा अखिल भारतीय वीरशैव युवक संघटना आदि शिवप्रेमी संघटनेचे पदाधिकारी-कार्यकर्ते, विविध शहरातुन, खेडया पाड्यातुन आलेले शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. द्रोणागिरी किल्ल्यावर विविध उपक्रमांचे आयोजन करून या सर्व शिवप्रेमी संघटनांनी, शिव भक्तांनी एक चांगली प्रथा व परंपरा जपण्याचे व भारतीय संस्कृतीचे संवर्धन, संरक्षण करण्याचे काम या संघटने कडून दरवर्षी चालू असून या सर्व संघटनेच्या सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक, सांस्कृतिक आदि विविध उपक्रमांचे त्यांच्या कार्याचे कौतुक सर्व स्तरातुन नागरिकांनी, विविध सामाजिक संघटनांनी केले आहे.


 

 




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com